मानसोपचार ( Psychotherapy) म्हणजे मानवी वर्तनात होणाऱ्या बिघाडांमुळे किंवा मानसिक आजार बंद करण्यासाठी वापरण्यात येणारे एक प्रगत शास्त्र आहे . समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी तरी शारीरिक रोगाशी सामना करावा लागतो . पण काही व्यक्तींना मानसिक आजाराशी तोंड द्यावे लागते . शारीरिक आजारपण आणि औषधोपचार या गोष्टी अंगवळणी पडलेल्या आहेत . शरीरीक आजाराकडे लोक जागरुकतेने पाहतात . परंतु मानसिक आजाराकडे इतकी सहजपणे पाहवायस मिळत नाही .
मानसिक आजारपण आणि मानसिक रुग्ण यामध्ये फरक करायला हवा . नेहमीच्या दैनंदिन जीवनात कळत – नकळत अचानकपणे आपल्याकडून असे काही वर्तन घडते की त्या दिवसभराची घडी विस्कटून जाते . असे घडणे म्हणजे मानसिक रुग्ण नव्हे .
समाजविघातक वर्तन , मानसिक आजारपण आणि मानसिक विकृती या वर्तनाच्या विविध पातळ्या आहेत . एखादी घटना विक्षिप्तपणे घडली म्हणजे ती व्यक्ती मनोरुग्ण झाली असे म्हणता येणार नाही .व्याख्या ( Definition of Psychotherapy )“मानसोपचार ही मदतीची प्रक्रिया असून यामध्ये प्रशिक्षित उपचारक ( Therapist ) खात्रीपूर्वक आणि सुलभतेने मनोरुग्णांच्या ( client ) अभिवृत्ती आणि वर्तनामध्ये बदल करू शकतो . “पूर्वी मनोरुग्णांना विकृत व्यक्ती असे संबोधले जायचे . परंतु जागतिक मानवी हक्क समिती आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी विकृत व्यक्तींना रुग्ण म्हणजे client असा शब्दप्रयोग वापरण्यास सुरुवात केली आहे .मानसिक आरोग्य समस्याग्रस्त असलेल्या फक्त निम्म्या बालकांनाच उपचार मिळतो .मानसिक आरोग्य समस्येसाठी सर्वात प्रचलित उपचार म्हणजे फक्त औषध घेणे हा आहे .प्रौढावस्थेतील लिंगभिन्नता ( Gender Difference in Adulthood )स्त्री आणि पुरुष या सामाजिक भिन्नतेमुळे पुरुषांपेक्षा स्त्रिया स्वत:च्या भावना स्वत:मधील चुका व्यक्त करून त्यातून बरे होतात . याशिवाय समाजाची अशीही अपेक्षा असते की पुरुष हे सशक्त स्वतंत्र , कठीण परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असतात. ज्या देशामध्ये आर्थिक प्रगती झाली आहे त्या देशातील स्त्री – पुरुषांपेक्षा गरीबी आणि निम्न आर्थिक दर्जा असणाऱ्या देशातील स्त्री – पुरुष मानसिक आरोग्य सेवा घेण्यात मागे असतात .बालकांवरील उपचार ( Treatment of Children )बाल्यावस्थेमध्येदेखील मानसोपचार घेण्यात लिंगभिन्नता दिसून येते . बाल्यावस्था आणि प्रौढावस्था यांची तुलना केल्यास मुलींपेक्षा मुलांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे .