किशोरावस्था म्हणजे काय ? किशोरवस्थेतील शारीरिक बदल

| What is Adolescence ?12 October 2023 by  Table of Contentsकिशोरावस्था म्हणजे काय ?शारीरिक बदलप्राथमिक लक्षणेदुय्यम लक्षणेसंप्रेरकांमधील बदल ( Hormonal Change )किशोरावस्था म्हणजे काय ?किशोरावस्था याला इंग्रजीत ” Adolescence ” असा असून तो लॅटिन “ Adolescere ” या क्रियापदापासून तयार झालेला आहे . त्याचा अर्थ ‘ परिपक्वता लाभणे ‘ असा आहे . प्राचीन विचारसारणीनुसार लैंगिक परिपक्वता प्राप्त होण्याचा कालावधी आणि किशोरावस्था यांच्यात फरकच केला जात नसे . पियाजे या संशोधकाच्या मतानुसार किशोरावस्था याचा मर्यादित अर्थ न घेता शरीरीक विकासाबरोबर मानसिक , भावनिक आणि सामाजिक विकसाचाही यात समावेश केला पाहिजे .बाल्य आणि तारुण्य यांना जोडणारा काळ म्हणून किशोरावस्थेकडे पहिले जाते .

किशोरवयीन अवस्था आणि लैंगिक परिपक्वता असे समीकरणच आपल्याला पाहवयास मिळते . या कालावधीत मूला-मुलींमध्ये लैंगिक बदल झपाट्याने होतात . किशोरावस्था म्हणजे १३ ते २१ वयापर्यंतचा विकासाचा कालखंड होय . किशोरवस्थेला कुमारावस्था किंवा पौगंडावस्था असेही म्हणतात किशोरावस्थेमध्ये वर्तनातील बदल , विचारसरणी आणि मूल्ये यांच्यात इतका फरक पडतो की , त्यानुसार पूर्व किशोरावस्था आणि उत्तर किशोरावस्था असे दोन टप्पे पडतात . 13 ते 17 वर्षे वयापर्यंतचा कालखंड म्हणजे पूर्व किशोरावस्था होय . आणि 17 ते 21 व वर्षे वयापर्यंतचा कालखंड म्हणजे उत्तर किशोरावस्था होय .boy standing beside girl outdoorsकिशोरावस्थेमध्ये होणार विकास हा अत्यंत गतिमान असतो . शारीरिक विकास खूपच झपाट्याने होत असतो . पाहता पाहता मुले – मुली झाडासारखी वाढू लागतात . त्यांचे रंग – रूप , आकारमान व चेहरा बदलून जातो . किशोरावस्थेत आलेल्या मुला – मुलींना ओळखणे फारसे अवघड नसते . या कालखंडात त्यांचे वर्तन , आदर्श , मूल्ये यात बदल होत असतो . शारीरिक बदलाबरोबर मानसिक , भावनिक बदल घडून येऊ लागतात . लैंगिक परिपक्वता हे किशोरावस्थेचे ठळक वैशिष्टे होय . अधिक वाचा मानसोपचार म्हणजे काय ? त्याचा वापर कोण करू शकतो ? Psychotherapy – What is it ? who uses it ?शारीरिक बदलकिशोरावस्थेच्या कालखंडात मुला-मुलींमध्ये घडून येणारे शारीरिक बदल हे अत्यंत वेगवान असतात .

एखादी नाट्यपूर्ण घटना घडून यावी त्याप्रमाणे किशोरांमध्ये शारीरिक बदल घडून येतात . लैंगिक ते बरोबर अनेक शारीरिक बदल होत असतात . लैंगिक विकासाबरोबरच मानसिक , भावनिक व सामाजिक विकासाचा किशोरावस्थेमध्ये समावेश केला जातो . लैंगिक परिपक्वता प्राप्त झाल्याने नजरेत भरणारा व झपाट्याने होणारा लैंगिक विकास आणि वाढणारी उंची हीच किशोरावस्थेची ठळक वैशिष्ट्ये होत .किशोरावस्थेदरम्यान घडून येणाऱ्या लैंगिक बदलांमुळे मुले बावरून जातात , मुली संकोचाने दबून जातात . शारीरिक बदलामुळे त्यांच्या वर्तनात बदल दिसू लागतो . सुरुवातीस मुलांची व मुलींची उंची , वजन समान गतीने वाढत असते . पण अचानक मुलींच्या वाढीचा वेग वाढतो . मुलांच्या तुलनेत अधिक गतीने त्यांच्या शरीरावर फरक दिसू लागतो संपूर्ण शरीररचनेत व आकारमानात फरक पडतो . मुलींमधील हे बदल मुलांच्या तुलनेत 1 -2 वर्षे अगोदर येतात .

म्हणून एकाच वयाच्या मूला – मुलींचे वर्तन भिन्न असते . त्यांची लैंगिक इंद्रिये विकसित होतात . प्राथमिक व दुय्यम लैंगिक गुणवैशिष्ट्ये विकसित होतात . मुलींमध्ये मासिक स्त्राव सुरू होतो . मुलांमध्ये वीर्य निर्माण होण्यास सुरुवात होते .प्राथमिक लक्षणेमुलेमुलीवीर्य निर्माण होणाऱ्या ग्रंथीचा विकास पूर्ण होतोस्त्रियांमधील अंडपेशी पूर्णपणे विकसित होते .शीश्न आकाराने पुरेसे मोठे होते .गर्भनलिकेचा विकास पूर्ण होतो .अंडासहायगर्भाशयाची वाढ पूर्णपणे होते व अधिक सक्षम होते .वीर्यवाहक नालिकेचा विकास पूर्ण होतो वीर्यपतनास सुरुवात होते .जननेंद्रिये पूर्णपणे विकसित होऊन प्रजननास योग्य बनते .दुय्यम लक्षणेमुलेमुलीकाखेमध्ये व शिश्नाभोवती केस येऊ लागतात .स्तनांचा आकार मोठा होतो .दाढी-मिशा येऊ लागतात .काखेतमध्ये व जांघेमध्ये केस येतात .आवाजात बदल होतो .

आवाजात बदल होतो .आवाज अधिक मोठा व घोगरा होतो .नितंबाची गोलाई वाढते व त्याच्या आकरमानात बदल होतो .त्वचा राठ व जाड बनते . बाल्यावस्थेतील त्वचेचा मुलायमपणा निघून जातो . हाता – पायावर केस येतात .बाल्यावस्थेतील आवाजाच्या तुलनेत हा आवाज अधिक मोठा होता .छाती रुंद होते . खांदे रुंद होतात . धडाचा आकारमान वाढते .त्वचा पातळ व मुलायम बनते . रंग उजाळतो व तारुण्याची सर्व लक्षणे दिसू लागतात .अधिक वाचा मानसशास्त्र म्हणजे काय ? Psychology in Marathi ?यादरम्यान किशोरवयीन मुला-मुलींच्या शरीररचनेमध्ये खूप मोठे बदल दिसून येतात . उंची व वजनामध्ये एकदम वाढ झाल्याचे आढळते . सुरुवातीस मुलांच्या तुलनेत मुलींची उंची अधिक असते . पुढे – पुढे मात्र मुलांच्या उंचीचा वेग वाढतो आणि त्याच वयाच्या मुलींच्या तुलनेत मुलांची उंची अधिक आढळते . पान नंतर मात्र जेव्हा 14 वर्षाचे वय होताच हा क्रम आणि वेग बदलतो . मुलांचे वजन मुलींपेक्षा जास्त असल्याचे आढळते .

सर्व साधारणपणे मुलींमधील उंची आणि वजन यांचा विकास हा मुलांच्या तुलनेत 2 वर्षे अगोदर होतो .संप्रेरकांमधील बदल ( Hormonal Change )वाढत्या वयानुसार शारीरिक विकासाचा परिणाम म्हणून मुला- मुलींच्या शरीरभर वरीलप्रमाणे खाणाखुणा किंवा चिन्हे दिसू लागतात . शरीरांमध्ये विकास स्त्रावांच्या संप्रेरकांच्या निर्मितीस प्रारंभ झाल्याबरोबर मुलींची शरीररचना एकदम बदलते . त्यांचे वजन वाढते . अंडपेशींची वाढ पूर्ण होऊन त्यातून एस्त्रोजेन( Estrogen) नावाचे संप्रेरक निर्माण केले जाते . मुलांमधील रेतपेशींची वाढ पूर्ण होऊन त्यातून अँड्रोजेन व टेस्टोस्टेरॉन ही संप्रेरक निर्माण केली जातात . सर्वसाधरणपणे वयाच्या सातव्या वर्षापासून मुला-मुलींमध्ये ही संप्रेरक निर्माण होऊ लागतात .

याचा परिणाम म्हणून एस्त्रोजेनमुळे स्त्रियांच्या स्तनांचा आकार वाढू लागतो . जननेंद्रिये विकसित होऊ लागतात . तर अँड्रोजेनमुळे पुरुषाच्या अंगावर केस येऊ लागतात व जननेंद्रिये विकसित होतात . तसेच टेस्टोस्टेरॉन युय संप्रेरकमुळे मुलांची उंची वाढते , धडाचा आकार वाढतो , हाता-पायावर केस येतात , आवाज फुटतो व जननेंद्रिये कार्यक्षम होतात . मुलींमध्ये स्त्रवणाऱ्या संप्रेरकास एस्त्रोजेन असे म्हणतात . त्यामध्ये एस्त्राडिओलचे प्रमाण मुलींमध्ये 18 पट वाढते , तर मुलांमध्ये फक्त 2 पट वाढते . टेस्टोस्टेरॉन व एस्त्राडिओलच्या प्रभावामुळेच पुरुषांच्या शरीरावर केस उगवतात तर स्त्रियांच्या स्तनांचा गोलाकार प्राप्त होतो व नितंबाचा आकार वाढतो .

Leave a Comment

error: Content is protected !!