वटपौर्णिमा (ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा)


भारतातील सर्वत्र आढळणा-या वृक्षांपैकी एक महत्त्वाचा वृक्ष म्हणजे वड

. या वृक्षाशी निगडीत असलेला हा सण आहे. या सणामागची पौराणिक कथा अशी की सावित्री या पुण्यवान व पतिपरायण स्त्रीने आपल्या पतीचे – सत्यवानाचे प्राण परत मिळवण्याकरिता, प्राण घेऊन जाणा-या यमराजाला आपल्या भक्तीने व युक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते.
त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजसुध्दा बायका वडाची पूजा करतात.

आपले सौभाग्य मरेपर्यंत अबाधित रहावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना स्त्रिया देवाला या दिवशी करतात.
म्हणून सौभाग्याचे लक्षण असेलेल्या हिरव्या बांगडया, शेंदूर, बुक्का, हळद-कुंकू, फुले, अक्षता, एक गळेसरी वडाच्या पूजेकरिता घेतात. याशिवाय अत्तर, कापूर, पंचामृत, वस्त्र, विडयाची पाने, सुपारी, पैसे, गूळ, खोब-याचा नैवेद्य, दुर्वा इ. साहित्य घेतात.
प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करतात. हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून त्याची पूजा करतात. शक्य असल्यास ब्राम्हण बोलवून पूजा करतात. या दिवशी बायका उपवास करतात.
पूजा झाल्यानंतर वडाला तीन प्रदक्षिणा घालतात. वडाच्या बुंध्याला सूत गुंडाळतात.

Leave a Comment

error: Content is protected !!