Marathi bhaykatha
महाराष्ट्र राज्यातील नांदेड गावाजवळील रायपूर परिसरात आजही रक्तपिपासू चेटकिनीचा वावर आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की येथे डायन मध्य रात्री येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवते आणि नंतर त्या व्यक्तीचे रक्त पिऊन स्वतःला अमर बनवते. त्यामुळे येथील पूर्ण भाग हा चेटकिणीचा असल्याचे मानले जाते. इथे माणसाचे पाऊल ठेवणे देखील धोकादायक ठरू शकते.
आणि जर तुम्ही या गावात गेलात तर कोणतीही छोटीशी चूक तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते. तुमचा यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही इथल्या कोणत्याही झाडावर खिळे ठोकून स्वतः बघू शकता. पण त्यानांतर तुम्हाला नक्कीच मृत्यूला सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हा लोकांना ही अंधश्रद्धा किंवा अविश्वास वाटत असेल तर तुम्ही या गावाला एकदा भेट देऊन बघा.
हे झपाटलेले गाव शापित असल्याचे मानले जाते. येथे एक-दोन नव्हे तर सर्वच भागात चेटकीणी जमा झाल्या आहेत. नांदेड जवळच्या या छोट्याशा गावात आता चेटकीनांचे संपूर्ण साम्राज्य वसले आहे. येथे असे मानले जाते की पूर्वी इथे एक डायन राहत असे. पण त्या चेटकिणीने गावातील काही मुलींचे आत्मे आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना स्वतःसोबत जोडले.
आज त्याच मुली या चेटकिणींसह स्वतःला अमर ठेवण्याचा प्रयत्न करतात. ही गावची तीच जागा आहे जिथे प्रत्यक्षात इथल्या पुरुषांना रात्री बाहेर पडायला बंदी आहे. चेटकिणीने त्यांना कधी आणि कोणत्या ठिकाणी आपल्या ताब्यात घेइल हे कोणालाच माहीत नाही. आतापर्यंत अशी एकूण 42 प्रकरणे येथे झाली आहेत .ज्यामध्ये अनेक पुरुष बेपत्ता झाले आहेत.
मात्र त्यांचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. चेटकिणीने त्या माणसांना मारले असावे असे मानले जाते.
नांदेड मधील या रायपूर मध्ये झाडे तोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. येथे असे म्हणतात की झाडांवर चेटकीण राहतात. एकदा एक झाड कापल्यामुळे गावातील एका माणसाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून असे मानले जाते की चेटकिणीचे झाड कापल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असेल.
इथे एका तुटलेल्या वाड्याच्या आत एक लहानशी कोठडी आहे. ज्यामध्ये कोणीही येत जात नाही आणि इथे असे मानले जाते की या अंधाऱ्या कोठडीत कोणीही गेले तर ते कधीच परत आले नाही. 16 जणांच्या मृत्यूचा साक्षीदार असलेला हा पछाडलेला वाडा प्रशासनाने सील केला आहे. चेटकिणींना आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी अनेक तांत्रिकांनी येथे आपली पूर्ण शक्ती वापरली.
पण मधल्या काळात पाच-सहा तांत्रिकांचाही मृत्यू झाला. त्यानंतर इथल्या चेटकिणींवर नियंत्रण आणण्याची भीती तांत्रिकांनाही वाटू लागली. प्रत्येक अमावस्येला व पौर्णिमेच्या रात्री गावात कोणी बाहेर पडत नाही असे म्हणतात.
आता लोक आपली घरे व्यवस्थित बंद करून घरात राहतात. रस्त्याने चालताना अनेकदा विचित्र आवाज ऐकू येत असल्याचा अनुभव गावातील काही लोकांनी घेतला आहे .पण पाठी वळून पाहिले तर तिथे कोणीही नसते.
गावातील रणजीत नावाच्या व्यक्तीने तर बाईक वर डायनला लिफ्ट दिली होती. खूप पुढे गेल्यावर त्याला आपल्या मागे कोणीतरी बसल्याची जाणीव झाली पण त्याने मागे वळून पाहिले तर कुणीच नव्हते असे रायपूरच्या लोकांचे हे मानणे आहे.
इथे अनेक वर्षांपूर्वी एका सुंदर स्त्रीवर गावातील काही लोकांनी बलात्कार केला होता. तिला कैद केले होते आणि नंतर त्या महिलेचा निर्गुण हत्या केली. यानंतर ती डायन बनुन येथे आपला बदला पूर्ण करत आहे असे येथील स्थानिक लोकांचे मत आहे.