उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू
परक्यांचा येता हल्ला
प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटिकोटि भुजदंड
होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू
बलवंत उभा हिमवंत
करि हैवानांचा अंत
हा धवलगिरी, हा नंगा
हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली खिंड खिंड अडवू
देशाचा दृढ निर्धार
करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त
जाळील आसुरी तख्त