शूर आम्ही सरदार

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती?

देव, देस अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत

तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत

लाख संकटं झेलुन घेईल अशी पहाडी छाती

जिंकावे वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं

लढुन मरावं मरुन जगावं हेच आम्हाला ठावं

देसापायी सारी इसरू माया ममता नाती












x



Leave a Comment

error: Content is protected !!