जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा |
पंचारति ओंवाळू श्रीपति तुज भक्तिभावा || धृ ||
विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण
परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून |
घृतयुत्क शर्करामिश्रींत गोधूमचूर्ण |
प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण || १ ||
शातानंदविप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें |
दरिद्र दवडुनि अंती त्यातें मोक्षपदा नेलें ||
त्यापासूनि हे व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें |
भावार्थे पूजितां सर्वा इच्छित लाधलें || २ ||
साधुवैश्यें संततिसाठी तुजला प्रार्थियलें |
इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें |
त्या पापानें संकटी पडुनी दु:खहि भोगिलें |
स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उध्दरिलें || ३ ||
प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली |
क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली |
अंगध्वजराजाची यापरि दु:खस्थिती आली |
मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसली || ४ ||
पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणी |
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं |
अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि |
ऐका भक्तां संकटि पावसि तुं चक्रापाणी || ५ ||
अनन्यभावे पूजुनि हें व्रत जे जन आचरति |
इच्छित पुरविसी त्यातें देउनि संतति संपत्ती |
संहरती भवदुरितें सर्वहि बंधने तुटती |
राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती || ६ ||
ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णू मी कैसा ||
भक्तीपुरस्सर आचरति त्यां पावसि जगदीशा |
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तुं सर्वेशा |
मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ||
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा || ७ ||
माझ्याकडे एक पुस्तक सापडले .त्यात ब्राह्मणाची आरती होती.कुठेही तशी वाचनात न येणारी किंवा ही आरती कधी न केली जाणारी.खुप जुनी आहे.खास फक्त आपल्याच ब्राहमण संस्कृती कुटुंबातील व्यक्तींसाठी पाठवत आहे.
ब्राह्मणाची आरती