श्री गजानन महाराजां विषयी माहिती


जन्म ज्ञात नाही, माघ वद्य ७, १८७८ दिनांक २३-२-१८७८ रोजी शेगाव मध्ये प्रकट झाले
आई/वडील ज्ञात नाही
वेष दिगंबर
कार्यकाळ १८७८ ते १९१०
समाधी/निर्वाण ऋषीपंचमी ८-९-१९१०, भाद्रपद शुक्ल पंचमी
चरित्र ग्रंथ श्री गजानन विजय चरित्र ग्रंथ (लेखक: दासगणू महाराज )


महाराजांचे प्रथम दर्शन
महाराज प्रथमता 23 फेब्रुवारी 1878 रोजी प्रथम तारुण्य अवस्थेत शेगावी दिसले. शेगाव येथे असताना त्या दिवशी भर दुपारी वडाच्या झाडाखाली विचित्र वाटणाऱ्या परंतु तेजस्वी दिसणारा असा, हा फेकून दिलेल्या उष्ट्या पत्रवाड्या मधील अन्नाचे कण वेचून खात होता. त्यांच्या तोंडातून “गण गण गणात बोते” असा मंत्राचा जप चालला होता. त्या उन्हात बसलेल्या व या मंत्राचा जप करत असताना त्यांना त्या कडक उन्हाची थोडी ही जाणीव होत नव्हती. अशाप्रकारे गजानन महाराजांचे पहिले दर्शन काही लोकांना झाले.

महाराजांची ओळख
बंकटलाल आणि दामोदर या दोन तरुणांनी महाराजांना प्रथम पाहिलं आणि त्यांच्या त्या विचित्र वागणे यापेक्षा ही त्यांच्या चेहर्‍यावरील तेजस्वी भावाने हे त्यांच्याकडे आकर्षित झाले, हे कोणी दिव्य पुरुष आहेत. याची त्यांना खात्री झाली म्हणून ते त्यांना गावात घेऊन आलेत व लोकही त्यांना पाहायला गर्दी करू लागले आहेत.

त्यांना पंचपक्वान, कपडे देत असे सर्वच वस्तू त्यांना दान करू लागली. परंतु महाराज ते सगळं फेकून देत असत. त्यांच्या वागण्याचा अंदाज कोणालाही येत नव्हता. ते कुठेही झोपत, काहीही खात व कपडे घालत नव्हते ते दिगंबर अवस्थेत ही राहत असत. जगापासून ते स्वतःला तोडण्याचा प्रयत्न नेहमी करत असत.

त्यांच्यामध्ये एक अतिशय विद्वान दिव्य पुरुष लपलेला आहे. याची जाणीव हळूहळू सर्वांना होऊ लागली. त्यांनी वेदशास्त्र संपन्न जातीचा दाखला लोकांनाही मिळाला. त्यांची तपश्चर्या ही मोठी असल्याची लोकांना जाणीव झाली. त्यांच्यातला योगी ही दिसून आला ते प्राणिमात्रांची भाषाही जाणत होते. त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागल्या नंतर मोठमोठी मंडळी त्यांना भेटायला येऊ लागली. लोकमान्य टिळक यांनीही गजानन महाराजांची भेट घेतली.

महाराजांचे चमत्कार
महाराजांनी लोक कल्याणाकरिता बरेच चमत्कार करून दाखवले आहेत. एकदा मुलांनी गजानन महाराजांना (Gajanan Maharaj Information in Marathi) चिलिम करून दिली आणि विस्तव आणण्यास बंकटलाल यांना गजानन महाराजांनी गल्लीतल्या जानकीराम सोनाराकडे पाठवले. सोन्या-चांदीचा त्याचा मोठा धंदा होता. सोनार नळी फुंकत तो बसला होता. मुलांनी त्याच्या दुकानात जाऊन विस्तव मागितला विस्तव देत नाही, असे त्याने मुलांना स्पष्ट सांगितले आणि महाराजांची त्याने निंदा केली. मुलांना त्याने हाकलून दिले, मुले रिकामी परत आली.

सोनार विस्तव देत नाही म्हणू लागले, तेव्हा महाराज म्हणाले, “अरे चिलमीवर काडी धरा विस्तव येईल” बंकटलाल यांनी महाराजांच्या चिलीमवर काडी धरतच तात्काळ विस्तव पेटला. महाराजांच्या मुखातून धूर निघाला. श्री गजानन महाराज (Gajanan Maharaj Information in Marathi) यांना, कोणी राम अवतार म्हणतात, तर कोणी कृष्ण अवतार, तर कोणी शिवशंकर शेगावी प्रगटले असे म्हणत. असे अनेक महाराजांनी चमत्कार दाखवून दिले लोकांच्या मनातील अहंकार नष्ट केला होता.

शेगावचा खंडू पाटील महाराजांकडे गेला. त्याला मूलबाळ नव्हते. त्याने महाराजांचे पाय धरून गळ घातली स्वामी मला एक पुत्र द्या. तेव्हा महाराज म्हणाले, “अरे तू श्रीमंत पाटील माझ्याजवळ भीक मागतोय, जा घरी, तुला बाळ होईल ! नाव त्याचे भीक्या ठेव.” काही काळात खंडू पाटलाला पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले पाटलाने आमरस पुरीचे जेवण गावात घातले.

महाराजांची कीर्ती
अकोल्यात शिवजयंती झालेल्या एका सभेत गजानन महाराज हि इतर लोकांबरोबर व्यासपीठांवर बसले होते. अकोल्यातील रामचंद्र प्रभूंच्या मंदिरात दर्शनासाठी ही श्री संत गजानन महाराज गेले होते. श्री वासू नंद सरस्वती ही गजानन महाराजांना भेटण्यासाठी शेगावी आले होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी महाराजांना भेटण्यासाठी शेगावला आले होते.

दिव्य असल्याने ते अनेक चमत्कारही करून देत होते. कोणाचेही दुःख त्यांना पाहावत नसे, खरं तर त्यांच्याकडे येणारी भक्ती मार्गातील मंडळी पाहण्यातच त्यांचे दुःख विसरत असतात. त्यांना त्यांच्या दुःखावर उपाय सांगत असतात. लोकांच्या दुःखाची व्यथा त्यांना चांगलीच कळलेली असते. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याने ते त्या व्यक्तीचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे लोक महाराजांकडे भक्तिभावाने येत असत.

महाराजांची कीर्ती ही वाढतच गेले विदर्भात घराघरात माहिती होते. त्यानंतर इतर राज्यात व पूर्ण भारतात त्यांची कीर्ती वाढत गेली आणि महाराजांना गुरु मानले व त्यांची पूजा सुरू केली. महाराष्ट्रभर त्यांची मंदिर स्थापन केली. महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर स्वतः त्यांनी मठ स्थापन करायला सांगितले.


उपदेश – गजानन महाराज
महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये.

जेव्हा मुंडगावच्या भागीने भोळ्या पुंडलिकाला गजानन महाराजांनी त्याला कानमंत्र दिला नसल्याने ते योग्य सदगुरु नव्हेत असे सांगून् भ्रमित केले त्यावेळी गजानन महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसऱ्या दिवशी पूजा करण्यास सांगितले. आश्चर्य हे की दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्याला झ्यामसिंगाहस्ते पादुका पाठवून देऊन त्याला पथभ्रष्ट होऊ दिले नाही. महाराज हे अद्वैतसिध्दांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधिच मंत्रदीक्षा दिल्याचा पुरावा नाही.

महाराजांचा इतिहास
श्री संत गजानन महाराजांची भक्ती, श्रद्धात्मक इतिहास असा आहे की गजानन महाराज (Gajanan Maharaj Information in Marathi) हे तेलंगी ब्राह्मण होते असे म्हटले गेले परंतु त्याचे कारण म्हणजे श्री बीरुदुरजू राम राजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगुलु नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. परंतु 2004 साली प्रकाशित झालेल्या श्री गजानन महाराज चरित्रकोश या ‘दासभार्गव’ नावाच्या लेखकाने शेगावात राहून आठ वर्षाच्या संशोधनानंतर हे पुस्तक प्रकाशित केले, असे समजते.

हे पुस्तकात व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे. तर शिवानंद सरस्वती तपश्चर्या करिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळ कोणासही दिसले नाही. हा सर्व तपशील गजानन महाराज चरित्र कोश या दासभार्गव लिखित ग्रंथात 364-365 पृष्ठ क्रमांकावर आला आहे. यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की, श्री गजानन (महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते. ते कोणीही असले तरी ते उत्तम प्रकारे वेद पठण करीत. तसेच त्यांना वेद श्रवण देखील फार आवडे हे सत्य आहे.

अक्कलकोटचे श्री समर्थ स्वामी आणि श्री गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे आपल्याला साम्य दिसून येते. दोघेही परमहंस संन्यासी होते. दोघेही अचानक आले होते. दोघेही अत्यंत गुढ बोलत त्यांच्या बोलण्याचा समोरच्यांना काहीही अर्थ कळत नव्हता. गजानन महाराज स्वामी समर्थांच्या समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे. स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे (Gajanan Maharaj Information in Marathi) गुरु असावेत, असे काही लोकांचे म्हणणे असले तरी ते तसे नाही.

कारण गजानन महाराजांची सर्व लक्षणे स्वामी समर्थ प्रमाणेच पूर्ण अवताराचे आहेत. श्री गजानन महाराज हे स्वयंभू होते. कदाचित त्यांनी स्वामींची भेट घेतली असेल मात्र श्री स्वामी समर्थ हे त्यांचे गुरू नक्की नव्हते.

महाराजांची समाधी काळ
पंढरपूरच्या पांडुरंगाचा समोर सन 1910 मध्ये श्री गजानन महाराज यांनी हे जग सोडण्याचा निर्णय भक्तांना सांगितला. त्यापूर्वी 1908 मध्ये त्यांनीच भक्तांना नोंदणीकृत न्यास स्थापन करावा असेही सांगितले होते. (Gajanan Maharaj Information in Marathi) भक्तांच्या सोयीसाठी हा ट्रस्ट करण्यात आला. 1910 मध्ये त्यांनी समाधी घेण्याची तारीख, वार, दिवस भक्तांना सांगितला.

समाधीची जागाही निश्चित करून दाखवली दिनांक 8 सप्टेंबर 1910 मध्ये भाद्रपद शुद्ध पंचमीला गुरुवारी त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. विदर्भातील अनेक पंडित गुरू आचार्य त्यांची भेट घेत असत. ते विष्णूचे अवतारही मानले जात असतात. तसेच विदर्भाचे पंढरपूर शेगाव याचे वर्णन केले जाते.

भक्तांना मार्गदर्शन करणे, योग्य मार्ग दाखवणे, आशीर्वाद देणे आणि स्वतः सातत्याने फक्त साधना करणे अशी त्यांची दैनंदिनी असे . (Gajanan Maharaj Information in Marathi) गुरुवार हा वार असंख्य भाविकांचा शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा दिवस ठरून गेला आहे. शेगावमधील श्री राममंदिर देखील चैत्र महिन्यात रामनवमी दिवशी ऋषी पंचमी दिवशी भक्तांनी गजबजलेले असते. शेगावच्या संत गजानन महाराज स्मारक संस्थानच्या प्रयत्नांमुळे तिथे बर्‍याच शैक्षणिक संस्था सुरू झाले आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांचे ही अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!