मार्च 1947“आपण आता स्वातंत्र्यता द्यायचं ठरवलं आहे…. आणि… आपल्याला हा देश सोडून निघून जायचं आहे……” कार्ल टेलर जे की एक मोठे अधिकारी होते ते डेविड ला समजावून सांगत होता…..“नो सर… मला तो मणी मिळवायचा आहे……..” डेविड बोलला…“अरे आपण आधीच भरपूर लुटलय या देशाला…. या सोन्याचा चिमणीच प्रत्येक पीस ओरबाडून काढलय….आणि तू अजून कोणत्या मणी चा मागे लागलाय…..” कार्ल टेलर बोलले…… “खूप गूढ मणी आहे तो मला 4 महीने वेळ द्या… मी तो मणी मिळवेन…” डेविड बोलला…“अरे मूर्खा….. कोहिनूर सारखा हिरा आपल्याकडे असताना आणखी कसला मणी हवाय….?तुला महितीय का कोहिनूर ची किम्मत…??” कार्ल बोलले ‘’’’“कोहिनूर ची काही ना काही किम्मत आहे… पण ज्या मणी बद्दल मी बोलतोय तो अमूल्य आहे… कदाचित कोहिनूर पेक्षा कितीतरी पट महाग…..” डेविड अगदी डोळ्यात डोळे घालून बोलला….कार्ल ने सिगार पेटवली…. एक मोठा झुरका घेऊन हळूहळू हवेत सोडू लागला…. पण त्याची नजर अजूनही डेविड चे डोळे पाहत होती…“नक्की कसला मणी आहे तो… त्याचा इतिहास काय आहे…” कार्ल बोलला“सॉरी सर … मी याबद्दल तो मणी मिळाल्यावरच बोलेन… प्लीज गिव मी परमिशन…” डेविड विनंती करू लागला…….समोरचा ट्रे मध्ये सिगार ची राख टिचकी मारून झटकत कार्ल बोलला….“ओके यंग मॅन… कॅरी ऑन…बट यू हॅव ओन्ली 4 मंथ्स…….. ““थॅंक यू सर…. थॅंक यू सो मॅच………..” डेविड खूप खुश झाला आणि निघाला……..डेविड एंडर्सन एक तीस वर्षाचा तरुण होता…. खूप अभ्यासू आणि खूप हुशार… भारतीय संस्कृतीचा आणि इतिहासाचा तर पूर्ण अभ्यास केला होता त्याने……. पण तो अभ्यास फक्त इंग्रज सरकार चे खजाने भरण्यासाठी होता…. एका मागून एक अनेक दुर्मिळ मुर्त्या दुर्मिळ रत्न तो शोधून काढायचा आणि त्याला हस्तगत करून इंग्लंड ला पाठवायचा….. असाच एकदा अभ्यास करताना इतिहासाचा पानातच त्याला एक मणी दिसला होता…… ज्याला मिळवायचा आज पर्यन्त कोणी प्रयत्न तर सोडा साधा विचार ही केला नव्हता…. काहीही करून तो मणी मिळवायचा या जिद्दीने तो पेटलेला होता…… त्याची टीम सोबत घेऊन तो त्या जंगला कडे निघाला….. “शूळपाणी” चे जंगल… घनदाट जंगल होत… जंगली आणि हिंस्र प्राण्यांचा वावर होता तिथे… विषारी साप,अजगर तसेच नरभक्षी आदिवासी लोक पण तिथे राहायचे….तिथे डेविड त्याची टीम घेऊन निघाला होता…… सरकारी गाडी ने त्यांना जंगला पर्यन्त तर सोडलं पण पुढचा प्रवास हा त्यांना चालत करायचा होता….. जवळच एक वस्ती होती तिथे डेविड गेला…. वस्ती वरची लोक गोर्या इंग्रजला पाहून घाबरून पळू लागले… कारण त्यांना अनुभव होता की इंग्रज आले की विनाकारण छळ करतात…. डेविड ने त्याचा सोबत चा शिपायांना इशारा केला…. शिपायांनी पळत जाऊन दोघांना पकडून आणल….पूर्ण कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर इबुक डाउनलोड करा