मराठी भाषण
शिवजयंती २०२४ (भाषण) | Shivjayanti Speech In Marathi : आजच्या या लेखात आपण शिवजयंती चे शिवाजी महाराज भाषण मराठी व shivaji maharaj speech in marathi ऑर Shivjayanti Speech In Marathi मिळवणार आहोत. या शिवाजी महाराज मराठी भाषणाला आपण 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या कार्यक्रमात वापरू शकतात. तर चला सुरू करू…
1) शिवाजी महाराज भाषण मराठी
आजच्या या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, तसेच सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींना.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशात व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्यात उत्साहाने साजरी होत आहे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अश्या अनेक उपक्रमाने आज जयंती साजरी होताना दिसत आहे. (Shivjayanti Speech In Marathi)
गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे महाराष्ट्राच्या अनेक संघटनांनी आपापल्या परीने शिवचरित्र जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते.आजचे राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा उपयोग करताना दिसत आहेत. तारीख, तिथीच्या वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमतो आहे, दुर्दैव या मातीच आज त्यांच्याच मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरलेले आहे. आजचे रजनेते शिवरायांच्या नावाने मतपेटीत मतांची भीक मागत फिरत आहेत.
मावळ्यांनो छत्रपती शिवाजी महाराज राजकीय लढवय्ये नक्कीच होते. परंतु, विशिष्ट एखाद्या पक्षांसाठी मर्यादित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी संघर्ष करणारे राजे नव्हते. आपल्याच महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या (Shivjayanti Speech In Marathi)महापुरुषांच्या जन्मतारखे वरून वाद पेटवला जातो, जाती-धर्मात शिवरायांना गुंतवून ठेवले जाते, ही लाजिरवाणी बाब आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्म संघर्ष नव्हता. तर शिवाजी महाराजांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता. शिवराय सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता.
जगात शिवनीतीचा वापर करून अनेक योद्धे लढाई जिंकण्याची उदाहरणे आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर शिवाजी महाराजांच्या देशात जन्माला आले असते, तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते. या महाराष्ट्रात शिवरायांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे.
इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. परंतु, जाताजाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जर आणखी 10 वर्षे जगले असते, तर इंग्रजांना हिंदुस्तानच्या चेहरा पाहता आला नसता.. असे होते आमचे रयतेचे राजा छत्रपती शिवराय.!
आजच्या युवा वर्गाने वरील गोष्टींचे चिंतन करावे. केवळ दाढीमिशी वाढवून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसते, शिवाजी होण्यासाठी जिजाऊंचे संस्कार, इतरांविषयी प्रेम व महिलांविषयी आदर हवा. मावळ्यांनो आज गरज आहे हे समजून घेण्याची कि मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझ आहे. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
2) छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी
“हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता,
अन्यायाविरुध्द लढण्याचा इरादा नेक होता,
असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तरजगात एक होता”
सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा !
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर व येथे उपस्थित सर्व रसिकहो, सह्याद्रीच्या कड्याकपारींनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील, विशाल नभालाही त्यांच्यासमोर झुकावं वाटेल असा रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा, मावळ्यांचा सोबती, बहुजनांचा कैवारी, शेतकयांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.(shivaji maharaj speech in marathi)
इतिहासाचे साक्षीदार, उभे तुमच्या समोर किल्ला एक-एक न्याहळा, आठवा शिवबांचा कारभार …
दिली उभारी मनाला, झाले वाऱ्यावरती स्वार, हर-हर महादेव गर्जले ते चार मावळ्यांच्या जोरावर …
अवघ्या मूठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले ते राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी राजे होय.
शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले. साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. शहाजी राजे भोसले व जिजाऊला हर्ष झाला. त्यांच्या पोटी शिवबाचा जन्म झाला.
माता जिजाऊंनी शिवबांवर लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्त्व घडवले. शिवरायांनी बालवयात स्वराज्याचे स्वप्न पाहिले व प्रत्यक्षात त्यादृष्टीने विजयी घोडदौड केली. (Shivjayanti Speech In Marathi) स्वराज्यनिर्मिती करताना त्यांना अनेक अडथळे आले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी आपले स्वराज्यनिर्मिती करण्याचे कार्य अविरतणे चालूच ठेवले.
शिवाजी महाराजांनी तानाजी, बाजीप्रभू, सूर्याजी, मुरारबाजी, जिवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा, स्वराज्यचि तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रताप गडावरील पराक्रम, आग्राहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात.
शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते, तर ते एक युगपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय करणा-यांचा चोख बंदोबस्त केला. त्यांनी भावनेपेक्षा नेहमी कर्तव्य श्रेष्ठ मानले. शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले. शेतक-यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले. सर्वधर्मसमभाव, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने ते वागले.
सिंहाची चाल, गरूडाची नजर,
स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन,
असेच असाव मावळ्यांचे वर्तन,
हीच शिवरायांची शिकवण ..
दुर्देवाने, ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला व एक महान, आदर्श, प्रजाहितदक्ष, पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. मित्र हो, शिवरायांचे कार्य, (shivaji maharaj speech in marathi) विचार आजही आपल्याला नवी प्रेरणा, उत्साह देतात. अशा कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात. अशा या थोर महापुरुषाचा जयजयकार झालाच पाहिजे.
बोला – छत्रपती शिवाजी महाराज की जय !
जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ !!
धन्यवाद !
3) शिवाजी महाराज भाषण मराठी शायरी –
ताशे तडकणार, हृदय धडकणार….
मन थाडे भडकणार….
पण या देशावरच काय….
अख्या जगावर….
१९ फेब्रुवारीला भगवा झंडा फडकणार !!
अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणीनों….
सर्वांना माझा नमस्कार !
आज १९ फेब्रुवारी ! छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ! ही जयंती आपण ‘शिवजयंती’ म्हणून उत्साहाने साजरी करीत आहोत. सर्वप्रथम, सर्वांना शिवजयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा!
रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा !
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. (Shivjayanti Speech In Marathi) छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच शूर व धाडसी होते.
माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली. वडिलांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला तर दादोजी कोंडदेव यांनी त्यांना युद्ध कौशल्य व नीतिशास्त्र शिकवले.
शिवरायांनी वयाच्या केवळ १५ व्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याच तोरण बांधले.
त्यांनी अफलजखान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा बलाढ्य शत्रूचा पराभव केला. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी माता जिजाऊंचे स्वप्न पूर्ण केले.
त्यांनी स्वराज्यात अनेक नवीन योजना आखल्या. (shivaji maharaj speech in marathi) गोरगरीब जनतेला सुखी केले. स्त्रियांचा व सर्व धर्मांचा सन्मान केला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३ एप्रिल १६८० रोजी शेवटचा श्वास घेतला. शिवरायांचे महान कार्य आपल्या सर्वांना प्रेरणा देते.
शब्दही अपुरे पडती,
अशी शिवबांची किर्ती !
राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचे शिवछत्रपती !!
बोला –
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
जय जिजाऊ, जय शिवाजी,
जय महाराष्ट्र !
सह्याद्रीच्या कुशीतून,
एक हिरा चमकला,
भगवा टिळा चंदनाचा,
शिवनेरीवर प्रकटला,
हातात घेऊन तलवार,
शत्रूवर गरजला,
महाराष्ट्रात असा एकच,
शिवाजी राजा होऊन गेला ….
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरूजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त रसिकहो, सर्वांना माझा नमस्कार.
आज १९ फेब्रुवारी, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. प्रथम, या आदर्श राजे छत्रपती (Shivjayanti Speech In Marathi) शिवाजीं महाराज यांना माझा मानाचा मुजरा !
तो १९ फेब्रुवारी १६३० चा सोन्याचा दिवस ! या मंगलदिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यांवर माता जिजाऊंच्या पोटी एका शूर सिंहांचा जन्म झाला. तो शूर सिंह म्हणजेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होय.
शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. माता जिजाऊकडून शिवबां राजेंने उत्तम संस्कार मिळाले. पिता शहाजी राजेंकडून शौर्याचा अनमोल वारसा मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत हुशार, धाडसी आणि कुशाग्र बुध्दीचे होते. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले. स्वराज्यरक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा मावळ्यांनी आपले प्राण पणास लावले.
शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गड-किल्ले जिंकले. त्यांनी अफजलखान, औरगंजेब, शाहिस्तेखान अशा अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. अनके वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. रयतेला सुखी केले. शेतक-यांचा मान राखला. स्त्रियांचा आदर-सत्कार केला.
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला. गोरगरिब-सामान्य रयतेला लोककल्याणकारी राजे मिळाले. (Shivjayanti Speech In Marathi) ३ एप्रिल १६८० रोजी असे हे महान-आदर्श छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे आज प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान व महाराष्ट्राची शान आहेत. ते संपूर्ण विश्वासाठी वंदनीय आहेत. अशा या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजेना माझे कोटी कोटी प्रणाम !
बोला –
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
जय भवानी, जय जिजाऊ,
जय महाराष्ट्र !
धन्यवाद !!
6) शिवजयंती भाषण मराठी –
सहयाद्रीच्या रांगावरती….
सदा मुघलांच्या नजरा !
बोट छाटली तयांची….
त्या शिवबांना माझा मुजरा !!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व एक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा….
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणीनी….
मी सुहानी (विदयार्थ्याचे नाव)
आज एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
आज १९ फेब्रुवारी ! छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील (Shivjayanti Speech In Marathi) शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते.
माता जिजाऊ शिवरायांना शूर वीरांच्या व रामायण, महाभारतातील गोष्टी सांगत. माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली तर वडिलांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला.
शिवराय अवघे १४ वर्षाचे असताना शहाजी राजांनी त्यांना पुण्याची जहागीर सुपूर्त केली आणि वयाच्या १५ व्या वर्षी शिवाजी महाराजांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
मूठभर मावळ्यांच्या बळावर शिवरायांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले. शिवरायांनी गनिमी कावा व इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक गड व किल्ले जिंकले. (Shivjayanti Speech In Marathi) हिंदवी स्वराज्याची स्थापना करून माता जिजाऊंचे स्वप्न पूर्ण केले.
६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. शिवाजी महाराज कुशल राजकर्ते होते. त्यांनी गोरगरीब प्रजा सुखी केली. सर्वांना समान न्याय दिला. स्त्रियांचा आदर केला. ते प्रजेवर मुलाप्रमाणे प्रिम करणारे राजा होते.
३ एप्रिल १६८० मध्ये आपल्या राजांची प्राणज्योत मालवली. शिवरायांचे कार्य आजही आपणास प्रेरणा देते. आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझे कोटी-कोटी प्रणाम !!
जय जिजाऊ ! जय शिवाजी