नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात . नमांची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय . सर्वनामांना स्वत:चा अर्थ नसतो . ती ज्या नामासाठी वापरली जातात , त्यांचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो .
सर्वनामांचे खालील सहा प्रकार पडतात
पुरुषवाचक 1
दर्शक
संबंधी
प्रश्नार्थक
सामान्य/अनिश्चित
आत्मवाचक
Table of Contents
सर्वनामाची वैशिष्ठ्ये :
मराठीत एकूण सर्वनामे खालीलप्रमाणे 9 आहेत .
1) पुरुषवाचक सर्वनामे :
अ) प्रथम पुरुषवाचक :
ब) द्वितीय पुरुषवाचक :
क) तृतीय पुरुषवाचक :
2) दर्शक सर्वनाम :
3) संबंधी सर्वनामे :
4) प्रश्नार्थक सर्वनामे :
5) सामान्य/अनिश्चित सर्वनामे :
6 ) आत्मवाचक सर्वनामे :
सर्वनामोत्पन्न सर्वनामे :
मराठीत एकूण किती सर्वनामे आहेत ?
सर्वनामाचे किती प्रकार पडतात ?
सर्वनामाचे कोणते प्रकार पडतात ?
सर्वनामाची वैशिष्ठ्ये :
सर्वनाम ही विकारी शब्दजाती आहे .
सर्वनामांना लिंग , वचन , विभक्ती असे विकार होतात .
सर्वनामांना स्वत:चा अर्थ नाही .
सर्वनामांना प्रतिनामे असेसुद्धा म्हणतात .
अधिक वाचा मराठी नाम व नामाचे प्रकार |
मराठीत एकूण सर्वनामे खालीलप्रमाणे 9 आहेत .
मी . कोण
तू . आपण
तो/ती/त्या/ते . काय
हा /ही/हे/ह्या . स्वत:
जो/जी/जे/ज्या
1) पुरुषवाचक सर्वनामे :
व्याकरणात पुरुष ही संकल्पना व्यापक आहे . प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत . फक्त तृतीय सर्वनामे मात्र बदलतात .
अ) प्रथम पुरुषवाचक :
बोलणारा स्वत:चा उल्लेख करताना स्वत:च्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो , ती प्रथम पुरुषवाचक असतात .
उदा . मी , आम्ही , आपण , स्वत:
मी उद्या सातरला जाणार आहे .
आपण सहलीला जाऊ .
आम्ही तुला मदत करू .
स्वत: खात्री करून घेतो .
अधिक वाचा विभक्ती व त्याचे प्रकार
ब) द्वितीय पुरुषवाचक :
समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात , ती द्वितीय पुरुष वाचक असतात .
उदा . तू , तुम्ही , आपण , स्वत:
तू एवढी चकली खाऊन टाक .
तुम्ही एवढे काम कराच .
आपण आलात , बरे वाटले .
स्वत: जाऊन आलात हे बरे झाले .
अधिक वाचा 100+ समानार्थी शब्द मराठी
क) तृतीय पुरुषवाचक :
ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे , त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषी सर्वनामे म्हणतात . अशी व्यक्ती शक्यतो समोर नसते .
उदा . तो , ती , ते , त्या .
तो म्हणे आजारी होता .
ती अतिशय सुंदर होती .
त्या चांगले गात .
अधिक वाचा 100+ विरुद्धार्थी शब्द मराठी
2) दर्शक सर्वनाम :
हा/ ही/ हे/ह्या/तो/ती/ते/त्या + विशेषण + नाम = दर्शक सर्वनाम
हा/ ही/ हे/ह्या/तो/ती/ते/त्या +नाम + विशेषण = दर्शक विशेषण
दर्शक सर्वनाम दर्शक विशेषण
1) ती चलाख मुलगी आहे . 1) ती मुलगी चलाख आहे .
2) तो मठ्ठ मुलगा आहे . 2) तो मुलगा मठ्ठ आहे .
3) तो गोरा मुलगा आहे . 3) तो मुलगा गोरा आहे .
4) हा रानटी हत्ती आहे . 4) हा हत्ती रानटी आहे .
3) संबंधी सर्वनामे :
जो , जी , जे , ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत .
उदा .
जे चकाकते , ते सोने नसते .
जो करेल , तो भरेल .
ज्याने हे भांडण उकरले , तो माघार घेईल .
जे पेरावे , ते उगवते .
4) प्रश्नार्थक सर्वनामे :
एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात .
उदा . कोण, काय , कोणास , कोणाला , कोणी .
5) सामान्य/अनिश्चित सर्वनामे :
कोण / काय या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर ती अनिश्चित सर्वनामे असतात .
कोणी यावे टिकली मारून जावे .
कोणी ,कोणास काय म्हणावे !
कोण ही गर्दी !
माझ्या मुठीत काय ते सांग पाहू .
अधिक वाचा 150 + मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
6 ) आत्मवाचक सर्वनामे :
आत्मवाचक सर्वनामे वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाहीत , कारण ती स्वत: असा अर्थ व्यक्त करत असल्यामुळे ती नेहमी नामानंतरच वापरावे लागतात . तीन आत्मवाचक सर्वनामांपैकी निज हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे , तर स्वत: / आपण ही पुरुषवाचक शब्दाची जात विचारल्यास पुरुषवाचक सांगावी तर स्वत: शब्दाची मात्र आत्मवाचक सांगावी .
कर्ता आपण / स्वत: / निज ( आत्मवाचक )
उदा .
मी स्वत: त्याला पाहिले .
तो आपणहून माझ्याकडे आला .
तू स्वत: मोटार हाकशील का ?
पक्षी निज बाळांसह बागडती .
अधिक वाचा ChatGpt म्हणजे काय?
सर्वनामोत्पन्न सर्वनामे :
मूळ सर्वनामांना प्रत्यय जोडून सर्वनामांची जी विविध रुपे तयार केली जातात त्यांना सर्वनामोत्पन्न सर्वनामे म्हणतात .
हा – असा , असला , इतका , एवढा
तो – तसा , तसला , तितका , तेवढा
मराठीत एकूण किती सर्वनामे आहेत ?
मराठीत एकूण 9 सर्वनामे आहेत
सर्वनामाचे किती प्रकार पडतात ?
सर्वनामाचे 6 प्रकार पडतात ?
सर्वनामाचे कोणते प्रकार पडतात ?
1) पुरुषवाचक सर्वनामे , 2) दर्शक सर्वनाम , 3) संबंधी सर्वनामे , 4) प्रश्नार्थक सर्वनामे , 5) सामान्य/अनिश्चित सर्वनामे , 6 ) आत्मवाचक सर्वनामे