rakhi-purnimaहाच दिवस राखीपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात.
भावाने आपले रक्षण करावे असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो.
व्रतबंध झालेले ब्राह्मण लोक या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करतात. याच दिवशी लोक श्रावणी करतात. या दिवशीचे मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात.
तसेच नारळाच्या/ खोब-याच्या वडया, नारळाची बर्फी, नारळाच्या करंज्या वगैरे पदार्थ करून हा सण साजरा करतात.