रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे म्हणजे काय ? त्यांचे परिणाम

| What is Menopause ?7 January 2024 रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे म्हणजे काय ? त्यांचे परिणाम | What is Menopause ?रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे ही जैविक घटना आहे . रजोनिवृत्ती हा स्त्री शरीराच्या निसर्गचक्राचा एक भाग आहे . सर्व स्त्रियांना या निसर्गचक्राला सामोरे जावे लागते . स्त्रीच्या लैंगिक जीवनातील किंवा लैंगिकतेविषयी सर्वात महत्वाचे असे परिवर्तन म्हणजे ऋतुस्त्राव बंद होणे होयी .

स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या 12 ते 14 वर्षाच्या दरम्यान चालू होते आणि सुमारे 45 ते 50 व्या वर्षी ती बंद होते . ही दोन्ही परिवर्तने अगदी नैसर्गिक असतात . प्रत्येक स्त्रीला या अवस्थेतून जावे लागते . मासिक पाळी बंद झाल्याने मुले होण्याची क्षमता संपते . ऋतुस्त्राव बंद होण्याच्या सुमारास काही सर्वसाधारण शारीरिक व मानसिक बदल होतात . सर्वसाधरणपणे स्त्रीच्या वयाच्या 49 व्या वर्षी मासिक पाळी बंद होते . पण या बाबतीत स्त्रियांमध्ये व्यक्तिभिन्नता दिसते . स्त्रीचे आरोग्य , वय , अनुवंश , हवामानातील भिन्नता व बाह्य वातावरण यावर मासिक पाळी बंद होण्याचा काल अवलंबून असतो . पाश्चात्य देशातील स्त्रियांच्या बाबतीत असे आढळून आले आहे की , अतिरिक्त धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळी लवकर बंद होते . सर्वसाधारणपणे स्त्रीच्या शेवटच्या मासिक पाळीनंतर एक वर्षाचा कालावधी उलटल्यावर मासिक पाळी बंद झाली असे मानले जाते . म्हणजेच संपूर्ण वर्षभर जर मासिक पाळी आली नाही तर ऋतुस्त्राव बंद झाला व रजोनिवृत्ती झाले असे समजण्यास हरकत नाही . काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीतील हे बदल व ऋतुस्त्राव बंद होणे या गोष्टी वयाच्या 30 व्या वर्षीच अनुभवास येतात . तर काहींच्या बाबतीत वयाच्या 60 व्या वर्षीसुद्धा मासिक पाळी बंद झालेली नसते . ज्या मुली लवकर वयात येतात आणि लवकर लैंगिक परिपक्वता प्राप्त करतात . त्यांची मासिक पाळी उशिरा बंद होते . आणि ज्या मुली उशिरा वयात येतात त्यांची मासिक पाळी लवकर बंद होते .woman in red and green zip up jacket wearing eyeglassesरजोनिवृत्तीचे शारीरिक परिणाममासिक पाळी बंद होण्याच्या काळात सुमारे 40 ते 50 वर्षे या वयादरम्यान रजोनिवृत्तीच्या आधी 2 ते 5 वर्षे स्त्रीच्या शरीरांतर्गत अनेक स्वरूपाचे बदल घडून येतात . त्यातून ऋतुस्त्राव बंद होण्याची अवस्था येते . यालाच कामक्षीणन कालावधी असे म्हणतात .या काळात जननक्षमतेशी संबंधित अवयवांचे कार्य हळूहळू मंदावते . अंडग्रंथीचे कार्य मंदावते . अंत:स्त्रावी ग्रंथीमधून निर्माण होणारे स्त्राव कमी प्रमाणात निर्माण होतो . त्यामुळे स्त्री-बीज निर्माण करणाऱ्या ग्रंथीचे कार्य थांबते . एस्ट्रोजनच्या अभावामुळे व काही अशी परिस्थितीजन्य अशा ताणामुळे या काळात स्त्रीच्या शरीरात काही बदल होतात . ते खालीलप्रमाणे –काही स्त्रियांची मासिक पाळी अचानक बंद होते . काहींची पाळी नियमित होते पान रक्त जाण्याचे प्रमाण कमी होते . त्यानंतर ऋतुस्त्राव अनियमितपणे होऊ लागतो व मासिक पाळीचा कालावधी हळूहळू लांबत जातो .पुनरुत्पादन संस्थेच्या इंद्रियांचे कार्य थांबत्ते .

योनीमार्गाचा व पुनरुत्पादन यंत्रणेचा ऱ्हास झाल्याने परिपक्व अंडपेशी किंवा लैंगिक अंत:स्त्राव निर्माण होत नाही .लैंगिक स्त्रावांच्या कमतरतेमुळे स्त्रीत्व निर्माण करणाऱ्या लक्षणात घट होते . दुय्यम लैंगिक गुणवैशिष्ट्य कमी दिसू लागतात . स्त्रियांच्या चेहऱ्यावरील केस राठ बनतात . आवाजात बदल होतो . स्तनांचा घट्टपणा कमी होऊन त्यात सैलपणा येतो . जननेंद्रियावरील व काखेतील केस विरळ होतात . अवयवांचा गोलाकार कमी होतो व शरीर लठ्ठ होते .रजोनिवृत्तीच्या काळात शारीरिक अस्वस्थता व शारीरिक वेदना अधिक जाणवतात . रात्री घाम फुटणे , डोके दुखणे , थकवा , भीती वाटणे , उदासीनता , हृदयाची धडधड होणे इत्यादी शारीरिक अवस्थता दर्शविणारी लक्षणे आढळतात .बऱ्याच वेळा मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्त्रियांचे वजन वाढते . पोटाजवळचा भाग व पार्श्वभागात चरबीचे प्रमाण वाढते . स्त्रिया अधिक जाड दिसतात .हाताच्या बोटांचे सांधे दुखू लागतात व बोटे सुजल्यासारखी दिसतात .बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी बंद झाल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बदल दिसून येतो . स्त्रिया अधिक उदास , खिन्न , चिडचिड्या व रागीट बनतात . त्यांची वृत्ती अतिशय चंचल बनते .मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्त्रियांच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात . घाम येऊन नंतर लगेच शरीर गरम होणे , ताप येऊन संपूर्ण शरीरास झिणझिणल्यासारखे वाटते . तसेच एस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे हाडे अधिक ठिसूळ व पातळ बनतात .

Share

Leave a Comment

error: Content is protected !!