आपण सिग्नल वर थांबलेलो असतो अचानक एक गरीब बिचारी वाटणारी बाई कडेवर एक बाळाला घेऊन आपल्या समोर येते ,आपण सरल खिशात हात घालतो आणि दोन रुपये अथवा पाच रुपये काढून त्या बाई चा हातात देतो. पण कधी विचार केला आहे का त्या दोन अथवा पाच रूपयांचा मागचं मोठ अर्थकारण..??आपण मदत म्हणून दोन पाच रुपये देतो पण ते दोन पाच रुपये त्या कडेवरील बाळाचा आणि त्याचा सारख्या कित्येक मुलांचा आयुष्यावर उठलेले आहेत.. कदाचित कोणाला हे पटणार नाही.उगीच कशाला कोण भीक मागेल..??गरज नसती तर का भीक मागितली असती..??कोणती आई स्वत:चा मुलाला भीक मागायला लावेल का..??असे कित्येक प्रश्न मला तुम्ही विचाराल… पण काही प्रश्न मी विचारतो बघा जमत का उत्तर द्यायला…हात पाय धड-धाकट असताना या बायका भीक का मागतात..??यांचाशी बोलायचं प्रयत्न करा..बघा बोलतात का.. विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतात का..??साधारण दीड दोन वर्षांच बाळ किती दंगा मस्ती करत असत पण यांचाच कडेवरील बाळ कायम झोपलेलं का असत..??पाच सहा वर्षाची मुलं एकदा पाय पकडला की पैसे देत नाही तो पर्यन्त सोडत नाहीत त्यांना एवढं प्रशिक्षण कोण देत..??दर आठ पंधरा दिवसांनी नवनवीन चेहरे का दिसतात…???अजून बरेच प्रश्न आहेत…या छोट्याशा ईबुक मध्ये कथा आहे आर्यन नावाचा एका बॉक्सर ची… ज्याचा तीन वर्षाचा मुलीच अपहरण झालं आहे… मग मुलीच शोध घेत असताना चा प्रवास यात मांडला आहे..कथे मध्ये काही ठिकाणी हिंसक आणि बीभत्स वर्णन आहे जे कदाचित तुमचं मन विचलित करू शकतात.. पण गांभीर्य समजण्यासाठी ते आवश्यक होत.. मग आताच वाचा “पूतना-कलियुगाची राक्षसीण”खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. लिंक वर क्लिक करताच तुम्ही ebook वर जाल. जर तुम्ही किंडल वर आता नोंदणी केली तर तुम्हाला एक महिन्याचं फ्री सबस्क्रिपशन मिळत ,मग तर तुम्ही माझे हे आणि इतर काही eBook फ्री मध्ये वाचायला मिळतील…