श्रीसत्यनारायणाची आरती
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा | पंचारति ओंवाळू श्रीपति तुज भक्तिभावा || धृ || विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून | घृतयुत्क शर्करामिश्रींत गोधूमचूर्ण | प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण || १ || शातानंदविप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें | दरिद्र दवडुनि अंती त्यातें मोक्षपदा नेलें || त्यापासूनि हे व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें | भावार्थे पूजितां सर्वा इच्छित लाधलें || २ || साधुवैश्यें संततिसाठी तुजला प्रार्थियलें | इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें | त्या पापानें संकटी पडुनी दु:खहि भोगिलें | स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उध्दरिलें || ३ || …