दसरा म्हणजे काय ?

दसरा म्हणजे काय ? : दसरा शब्दाचा अर्थ आहे रावण . म्हणजेच दस + रा = १० तोंडे असलेला रावण असा हा दसरा शब्द तयार झालेला आहे . तसेच खरा शब्द हा दसहरा असा आहे . परंतु त्याला मराठी भाषेत दसरा असे बोलतात . दशहरा (दसहरा) म्हणजेच १० तोंडाचा रावण हरला असा ह्या शब्दाचा अर्थ होतो . विजया दशमी म्हणजे वाईटावर चांगल्या चा विजय म्हणजे विजयादशमी. आता वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे रावणाच्या गर्वावर श्री राम यांनी विजय मिळवला तसा विजय. म्हणजेच १० डोकी असलेल्या रावणाचा गर्व हरण केला . म्हणून दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण साजरी …

Read more

निरोप आरती

जाहले भजन आम्ही नमितो तव चरण । वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥ दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो प्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥ तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥ मागणे ते देवा एकची आहे आता एकची आहे तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥ जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया ऐशा या ठाया प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति गावया ॥४॥ सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा आमुच्या मनी हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥५॥ वारुनिया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी कृपेची …

Read more

बैल पोळा (श्रावण वद्य अमावास्या)

polaभारत हा शेतीप्रधान देश आहे. पारंपारिक पध्दतीने शेतीसाठी बैलाची अनमोल मदत घेतली जाते. बैल वर्षभर शेतात राबत असतो. त्याच्या कष्टामुळे धनधान्य मिळते. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्याने केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे म्हणून वर्षातून एक दिवस बैलपोळा साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा सण शेतकरी साजरा करतात. या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालून सजवतात. शिंगाना बेगड लावतात. पाठीवर झूल घालून सजवतात. बैलांना वाजत गाजत मारूतीच्या दर्शनाला नेतात. त्या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती देतात. संध्याकाळी बैल वाजत गाजत आले की त्यांची पूजा करतात व त्यांना पुरणपोळी खायला देतात. ज्यांचा शेती हा व्यवसाय नाही ते लोक या दिवशी मातीच्या …

Read more

हनुमान जयंती विषयी माहिती

या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म प्राप्त होतो. त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात. महाराष्ट्रात शनिवार तर उर्वरित भागात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल, तसेच रुईची फुले आणि पाणी अर्पण करण्याची प्रथा आहे. हनुमान जयंती भारतात आणि जगाच्या इतर भागात जिथे हिंदू राहतात तिथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.भक्त सकाळी लवकर उठतात, आंघोळ करतात आणि हनुमानाची प्रार्थना करण्यासाठी मंदिरांना भेट देतात.ते त्यांच्या भक्तीचे प्रतीक म्हणून देवतेला फुले, फळे आणि मिठाई देखील अर्पण करतात. हनुमान जयंती …

Read more

धन्य धन्य हो प्रदक्षिणा

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची। झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची।। धृ.।। पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी। सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरुनि काशी।। १।। मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती। नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती।। २।। कोटि ब्रह्महत्या हरिती करितां दंडवत। लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।। ३।। गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि। अनुभव जे जागति ते गुरुपदिचे अभिलाषी।। ४।। प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला। श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला।। ५।।

मंगळागौर ( श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी)

mangalagaurमंगळागौरीची पूजा म्हणजे उमा-शंकराची पूजा. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात. नवविवाहित स्त्रिया या दिवशी न्हाऊन, सोवळे नेसून पूजेला बसतात. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या पूजेकरिता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षता, पाच खारका, पाच सुपा-या, पाच बदाम, पाच खोब-याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री (पाने), दोन वस्त्र, आठ वाती, …

Read more

श्री हनुमानाची मराठी आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ||करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ||गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुवनी ||सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी || १ || जय देव जय देव जय हनुमंता ||तुमचेनी प्रसादें न भी कृतांता || जय || धृ || दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ||थरथरिला धरणीधर मानीला खेद ||कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ||रामी रामदासा शक्तपचा शोध ||जय देव जय देव जय हनुमंता || २ |

ब्राह्मणाची आरती

निगमागम विस्तारक तारक आहेसी केवळ तु अधिकारी जप तप यज्ञासी वरिष्ट उत्तम गुरु नाना वर्णासी सकळांचे द्वीज मन्त्र आहे तुजपासी॥१॥ जयदेव जयदेव जयदेव जयदेव जय भूदेवा ब्राह्मण तुझे दैवत करिती जन सेवा । जयदेव जयदेव॥धृ॥ श्री विष्णूने धरिले ह्रदयी पदकमळा म्हणुनीया वैकुंठी भोगिती सोहळा प्रसाद अवघा हाची स्वामी भूपाळा आशिर्वचने हरतील भवचिन्ता सकळा ॥२॥ जयदेव जयदेव द्विज वदने अर्पिता पावे देवासी पूजन केल्या हरतील पापांच्या राशी पदतीर्थांचा महिमा न कळे कोणासी गोसावी सूत स्वामी वंदे सहितासी॥३॥ जयदेव जयदेव

गोकुळ अष्टमी (श्रावण वद्य अष्टमी)

gokulashtamiराम, कृष्ण, विष्णू व शंकर ही भारतीयांची आराध्य दैवते आहेत. श्रीकृष्ण तर त्याच्या गोकुळातील बाललीला, यमुनेवरील रासलीला आणि भगवतगीतेतील उपदेशांमुळे सर्वांचे आवडते दैवत झाला आहे. त्या श्रीकृष्णाच्यासाठी हा सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे गोकुळ अष्टमी होय. या सणामागील पौराणिक कथा अशी की श्रीकृष्णाचा मामा कंस. कंसाने प्रजेला खूप छळले. श्रीकृष्णाच्या आई-वडिलांना त्याने तुरुंगात ठेवले कारण त्यांना होणा-या मुलांपैकी एकजण कंसाचा वध करणार अशी आकाशवाणी झालेली होती. कृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आई-वडिलांना बंदिवासातून मुक्त केले. ही कथा सर्वज्ञात आहेच. पुढे याच श्रीकृष्णाने कौरव-पांडव युध्दात …

Read more

महावीर जयंतीची माहिती

हा जैनांसाठी सर्वात शुभ दिवस आहे आणि जैन धर्माच्या शेवटच्या आध्यात्मिक गुरुच्या (महावीर) स्मरणार्थ जगभरातील जैन समुदाय पाळतात. यंदा तो 21 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते, ज्याला रथयात्रा म्हणून ओळखले जाते. भाविक जैन मंदिरांना भेट देतात, भगवान महावीरांच्या मूर्तीची पूजा करतात, धार्मिक गीते वाचतात आणि आशीर्वाद घेतात. भगवान महावीर: जीवनमूलतः महावीराचे नाव वर्धमान होते आणि त्यांचा जन्म सुमारे 599 ईसापूर्व झाला होता, अनेक विद्वानांच्या मते ही तारीख 100 वर्षे पूर्वीची आहे, तेव्हा महावीर बहुधा बुद्धाच्या जवळपास त्याच वेळी जगले होते, ज्यांच्या पारंपारिक जन्मतारखेचे देखील पुनर्मूल्यांकन केले गेले …

Read more

error: Content is protected !!