हा खेळ सावल्यांचा ( अंतिम भाग-४ )
सिमा रडत रडत घराबाहेर पडली … कुठे जाव काय कराव तिला काहिच कळत नव्हत … ति मनोमन देवाच्या धावा करत होती … आजची रात्र गावच्या शंकर मंदिरात घालवायची असे तिने ठरवले… तिथे आपन सुरक्षितही राहु आणी थोडा आसरा हि मिळेल … सिमा जड पावलांनी डोळ्यात पाणी आणत हळु हळु चालत मंदिराच्या दिशेने निघाली …सांजवेळ होत आली … सिमा मंदिराच्या गाभार्यात पोचली आपल गाठोड टाकल आणी रडत बसली … “महादेवा काय हे माझा पदरात पडल…. तुझी रोज आराधना करते आणी माझा वर आलेल्या संकटाच्या वेळी तु कुठे गेलास ….? ये आपल्या भक्तासाठी धाउन आणि माझ्या कुटुंबाच रक्षण …