माझी आई वर निबंध
Essay on my mother in MarathiMazi aai marathi nibandh: आईचा विचार येताच हृदय प्रेमाच्या सागरात डुंबू लागते. कारण आपण कित्तेक वर्ष तिच्या प्रेमळ कुशीमध्ये घालवलेली असतात. आपल्या आईने आपल्याला नऊ महिने तिच्या गर्भात, आणि आयुष्यभरासाठी तिच्या हृदयात ठेवलेले असते. आपल्या जीवनात आपल्या आई वडिलांची महत्वाची भूमिका असते. एका बाजूने आपले वडील आपल्याला या जगाशी लढण्यास सक्षम बनवतात. तर दुसरी कडे आपली आई आपले प्रेमाने संगोपन करते. आयुष्यात आईच्या प्रेमाची जितकी गरज असते तितकी कदाचित इतर कोणत्याही व्यक्तीची नसते. ज्यांनी आपली आई गमावली आहे ते माझे शब्द चांगले समजू शकतील. म्हणूनच तर ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या …