ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा । आरती कालीका अंबा।
मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।।
अदि मध्य अवसानी व्यापक होसी । अंबे व्यापक होसी ।
अणू रेणू जीव तुझा तया न त्यागिसी ।।1।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।
भास हा अभास जिचा सौरस सारा । अंबे सौरस सारा ।
सारासार निवडू जाता न दिसे थारा ।।2।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।
काळातील कळानिधी पर्वती ठाण । अंबे पर्वती ठाण ।
भत्त* शिवाजीसी दिधले पूर्ण वरदान ।।3।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।
चिच्छत्ते, चिन्मात्रे, चित्त, चैतन्य बाळे । अंबे चैतन्य बाळे ।
विठ्ठल सुतात्माजी दावी पुर्ण सोहाळे ।। 4 ।।
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।।