मोहिनी-EK Marathi bhaykatha

मी संदीप कुलथे माझ्या मित्राची सत्य घटना घेऊन येत आहे. घटना थोडी विचित्र वाटेल थोडी प्रौढांसाठी आणि भीतीदायक आहे. त्यामुळे आपल्या पैकी कोणी वय १८ च्या खाली असेल त्यांनी वाचू नये. आणि कोणी चेष्टा करू नये यात माझ्या मित्राची डेथ झालीय तर कथेचे नाव आहे ” मोहिनी ” माझा मित्र अतुल अत्यंत हुशार आणि इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेला.. तो त्याच्या सातव्या सेम च्या परीक्षा झाल्यानंतर तो घरी गेला होता. आणि १५ दिवसांनी पुन्हा कॉलेजला परत जाणर होता.. सुट्ट्या संपल्या..

आणि कॉलेज सुरु झाले त्याने आईबाबांना सांगितले कि तो कार घेऊन पुण्याला जाणार आहे. आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता हा शेवटी कार घेऊन निघालाच कारण त्याला मित्रांना घेऊन फिरायचं होत आपल्या शेवटच्या वर्षाचे मोजके राहिलेलं दिवस त्याला एन्जोय करायचे होते.कार घेतली आणि एकता निघाला…. मध्ये नाशिकमध्ये असलेल्या आपल्या मित्रांना भेटून तो पुढे निघाला…रात्री १०:३० -११ ची वेळ होती कसारा घाट चालु झाला…. आणि वाटेत त्याला एक मुलगी उभी असलेली दिसली…त्याने विचार केला एवढ्या रात्री हि मुलगी इथे का उभी असावी

थोड पुढे जाऊन त्याने पहिले तर तिची गाडी बंद पडली होती.. आणि तिच्यावर नजर टाकली तर अतुल पूर्ण शुद्ध हरपून बसला होता. पोर्णीमाची रात्र होती आणि चंद्राच्या उजेडात ती मुलगी त्याला स्वर्गातील अप्सराच वाटू लागली तिचे लावण्य पूर्ण रूप पाहून तो ओशाळून गेला होता…

तिचे गोरे गाल , लालबुंद ओठ , लांब सरळ नाक तिला पाहून कुठलाही तरून थांबला नसता तर हे नवलच असते. त्याने गाडी बाजूला लावली आणि विचारले

.. “काय झाले ?” ती म्हणाली “गाडी अचानक बंद पडलीय ड्रायव्हर मेकानिक आणायला गेला आहे पण उद्या माझा फेशन शो आहे मला उद्या पुण्याला पोहोचणे गरजेचे आहे ” अतुलच्या मनात चिमणी पाखरे उडू लागली…

एरवी खबरदारी घेणारा अतुल त्या मुलीला झटकन बस म्हणाला …. त्यच्या मनात कुठलीही शंका आली नाही प्रवास सुरु झाला…..अतुलने रोमांटीक गाणे लावण्यास सुरुवात केली आणि ती मोडलिंग करतेय म्हणल्यास तो तिच्याशी फ्लर्ट करण्यास सुरु झाला…तो तिच्या वर स्तुतिसुमने वाहू लागला…रस्त्यात त्याने एका ठिकाणी चहा पिण्यासाठी आपली गाडी थांबवली चहा घेतला आणि परत आपला प्रवास सुरु केला…त्यांच्या गप्पा चालू होत्या कि अचानक ती मुलगी रडू लागली आणि म्हणाली मला माझ्या प्रियकराची खूप आठवण येतेय…त्याने मला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न केल…मग काय अतुलने सहानुभूती दाखवत गाडी बाजूला लावली आणि तिचे सांत्वन करू लागला..

तेव्हा ती अचानक अतुलच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडू लागली…म्हणू लागली मला आधाराची खूप गरज आहे,,,…मला हा एकटे पण नकोसा झालाय आधीच अतुल तिच्या सौंदर्यवर फिदा झाला होता तिच्या मिठीने तो पाघळला आणि दोघांचाही सय्यम तुटला .. आणि त्या नंतर त्या मुलीने ..

अतुल कडून वचन घेतले कि .. तो तिच्या शिवाय कधीच पर स्त्रीशी जवळीक साधणार नाही आणि त्याने अस जर केल तर ती त्याच्या अख्या परिवाराला संपवेल ,,,…कारण ती एक मोहिनी होती.

एका पिशाचिनी चा गूढ प्रकार हे अतुल ला कळल्याने त्याच्या अंगाचा थरकाप उडाला ….. तेव्हा अतुलला त्याची चूक समजली आणि ती म्हणाली “मी तुला जेव्हा जेव्हा बोलवेल तुला तेव्हा येऊन मला संतुष्ट करावे लागेल …त्या बदल्यात मी तुझी इच्छा पूर्ण करेल ” असे बोलून ती गायब झाली …

आणि अतुल पुण्याला आला …आणि १५ दिवसानंतर आणि त्याच्या स्वप्नात तीच आली आणि म्हणाली मला भेट मला गरज आहे तुझी नाहीतर परिणाम वाईट होतील ,…आणि अतुल ने तडक गाडी काढली आणि कसारा घाट येथे गेला .. तिला भेटून झाल्यानंतर अतुल ने तिला एक मोबाईल मागितला फक्त हे पाहण्यासाठी कि ती त्याची इच्छा पूर्ण करू शकते का नाही ते…आणि तिने चक्क त्याला हवा तो मोबाईल दिला आणि गायब झाली..

आता अतुल एखादी लोटरी लागल्यासारखा खुश झाला तो नेहमी तिला संतुष्ट करी आणि ती त्याला हवी ती गोष्ट देई असेच दोन वर्ष झाले .. अतुलला जॉब लागला आणि त्याच्या घरी लग्नाची बोलणी सुरु झाली …. आईने मुलगी पसंत केली होती पण त्याला कसलीच इच्छा नव्हती लग्न करण्याची …पण आईच्या हट्टा पायी त्याने लग्न केलेच अखेरीस पण लग्नानंतर तो आपल्या बायकोच्या जवळ जात नव्हता

आणि दर १५-२० दिवसांनी तो मोहिनीला भेटायला जायचा.. त्याच्या पत्नीला काही उमजेना तीही माणूसच शेवटी शरीराची भूक भागवण्यासाठी ती अतुलशी जवळीक साधू लागली .. तिच्या हि हट्टापायी अतुल मोहिनीला दिलेलं वचन विसरला आणि तो त्याच्या पत्नीमध्ये विलीन झाला.. आणि आपले सर्वस्व गमावून बसला त्याला दुसऱ्या दिवशी फोन आला कि कसारा घाट येथे एक अपघात झाला आहे आणि त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तुम्ही ताबडतोब या तो तेथे गेला तेव्हा त्याला दिसले कि त्याची लहान बहिण आई आणि वडील दोघे हि …

मरण पावले होते..त्याला त्या गोष्टीचा इतका धक्का बसला कि त्याने तो वेडा झाला…आणि त्याने स्वतःच्या पत्नीला मारून आपण हि आत्महत्या केली.. मित्रहो त्यामुळे दिलेलं वचन पाळा .. एखाद्याला पिशाचलाच नाही तर प्रत्येकाला दिलेलं…धन्यवाद !!!

Leave a Comment

error: Content is protected !!