मित्र कि आत्मा मराठी कथा | Real horror story in Marathi



Real horror story in marathi
Real horror story in marathi
हि गोष्ट त्या वेळेची आहे जेव्हा मी माझ्या गावाला जात होतो. माझे गाव डोंगराच्या मध्यभागी वसलेले होते, दाट लोकसंख्येपासून वेगळेच. माझ्या गावात एक कच्चा रस्ता आहे, ज्यावर फक्त एकच बस चालते जी गावातल्या लोकांना बाहेर घेऊन जाते आणि तीच बस परत गावाकडे आणते. मी माझ्या आजीच्या घरी गेलो होतो आणि तिथून त्या रात्री मी परत येत होतो.

रात्रीची वेळ होती बसवाल्याने मला गावाच्या बाहेत उतरवले कारण माझ गाव हे रस्त्यापासून थोडे लांबच होते आणि ती बस दुसऱ्या दिशने चालली होती. परंतु हे मला काही नवीन न्हवते कारण मी यापूर्वी बर्‍याच वेळा या कच्च्या रस्त्यावरून गावापर्यंत चालत प्रवास केला होता. पण यावेळी मी रात्री उशिरा गावात पोहोचलो. मी माझे सामान काढले, ते उचलले आणि माझ्या घराकडे निघालो. त्यावेळी रात्रीचे साडेबारा वाजले होते.

आणि तुम्हाला माहिती आहे की गावातले लोक लवकरच झोपायला जातात. त्या रात्री संपूर्ण गाव निर्जन होते. असे वाटत होते कि मी जंगलात आलो आहे. आता मलाहि भीती वाटू लागली. मी फक्त पटकन घरी पोहोचण्यासाठी देवाला प्रार्थना करीत होतो, परंतु माझे घर थोडे दूर होते. पण थोड्या वेळाने मला रस्त्यात माझा मित्र सोमनाथ मिळाला.

त्याने मला दुरूनच हात केला. एवढ्या रात्री हा येथे काय करीत आहे याबद्दल मी विचार करीत होतो? पण जाऊदे, मला खूप आनंद झाला की मला कमीतकमी एक साथीदार मिळाला. आता माझी भीती कमी झाली आहे कारण या शांततेत शांतता मोडण्यासाठी माझ्याबरोबर कोणीतरी होते.

सोमनाथ माझ्याकडे आला आणि त्याने माझी बॅग उचलली आणि माझ्या पुढे चालण्यास सुरवात केली. चालत असताना, माझ्या लक्षात आले की हा इतके शांत का आहे. कारण माझा मित्र सोमनाथ खूप बोलणारा आहे आणि हा तर खूप गप्प गप्पच आहे.

माझे घर थोडेसे दूर होते, परंतु सोमनाथ ज्या रस्त्याने जायला निघाला, तो माझ्या घरचा कच्चा रास्ता सोडून शेतातून वाट काढायला सुरवात केली. मी त्याला म्हणालो, अरे भावा, कुठून जायला निघाला आहेस आणि मागासपासून बघतोय तू खूप शांत आहेस? बरा आहेस ना तू?

पण असे बोलतोयच तेवढ्यात त्याने माझा हात धरला आणि मला शेतात घेऊन जायला भाग पाडले. त्याचा हात खूप थंड होता, मला उशीर झाला नाही हे समजायला की तो माझा मित्र नाही. तो मला जवळच्या विहिरीकडे खेचत घेऊन जात होता आता मात्र मी मोठ्याने ओरडायला सुरवात केली.

माझा आवाज ऐकून, गावातील बरेच लोक जागे झाले आणि मला मदत करायला धावले. जेव्हा ते माझ्याकडे आले तोपर्यंत मी बेशुद्ध झालो होतो. जेव्हा मी सकाळी शुद्धीवर आलो तेव्हा मी माझ्या घरी होतो. मला शुद्धीवर आलेले पाहून, सर्व गावातील लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले की तू ठीक आहेस, तुला काय झाले होते?

तू रात्री आम्हाला पिपळाच्या झाडाला बांधलेला भेटलास. तू रात्रीपासून बेशुद्ध होतास. तुला काय झाले होते? माझ्या बाबतीत जे घडले ते मी त्या सर्वांना सांगितले. त्यावेळी माझा मित्र सोमनाथही तिथे होता. तो म्हणाला की मी तर रात्री माझ्या घरीच झोपलो होतो.

तर मग काल रात्री माझ्या बरोबर कोण होता? असे मी पुटपुटलो आणि सर्वजण माझ्या कडे बघू लागले…….

त्या नंतर गावातल्या सर्व माणसांनी रात्रीचा प्रवास करणे सोडून दिले. हि अशी घटना काहीच वर्षांपूवी माझ्यासोबत घडली जी मी कधीच विसरू शकणार नाही

Leave a Comment

error: Content is protected !!