माझी आई वर निबंध


Essay on my mother in Marathi
Mazi aai marathi nibandh: आईचा विचार येताच हृदय प्रेमाच्या सागरात डुंबू लागते. कारण आपण कित्तेक वर्ष तिच्या प्रेमळ कुशीमध्ये घालवलेली असतात. आपल्या आईने आपल्याला नऊ महिने तिच्या गर्भात, आणि आयुष्यभरासाठी तिच्या हृदयात ठेवलेले असते.

आपल्या जीवनात आपल्या आई वडिलांची महत्वाची भूमिका असते. एका बाजूने आपले वडील आपल्याला या जगाशी लढण्यास सक्षम बनवतात. तर दुसरी कडे आपली आई आपले प्रेमाने संगोपन करते. आयुष्यात आईच्या प्रेमाची जितकी गरज असते तितकी कदाचित इतर कोणत्याही व्यक्तीची नसते. ज्यांनी आपली आई गमावली आहे ते माझे शब्द चांगले समजू शकतील.

म्हणूनच तर ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या एका कवितेत म्हटले आहे कि “आई सारखे दैवत या जगतावर नाही”

आजच्या या Essay on my mother in marathi च्या लेखात मी आईवर निबंध सादर करत आहे. या लेखातील निबंध इयत्ता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.

मला आशा आहे की तुम्ही माझी आई वर निबंध शेवटपर्यंत वाचाल आणि हा निबंध तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर कराल.

माझी आई यावर लघु आणि दीर्घ निबंध

आईवर लहान निबंध (50 शब्द) | Majhi Aai Nibandh in Marathi 50 Words
Majhi Aai Nibandh in Marathi: माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची स्त्री म्हणजे माझी प्रिय आई. ती स्वभावाने खूप प्रेमळ आणि मेहनती आहे. माझी आई कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चांगली काळजी घेते. ती सकाळी लवकर उठून आमच्यासाठी जेवण बनवते. माझा दिवस बऱ्याचदा माझ्या आईने सुरू होतो आणि आईच्या गोष्टीनेच रात्री संपून जातो. आई सकाळी लवकर उठते आणि तीच काम आवरून ती मला उठवते. त्यानंतर ती मला शाळेसाठी तयार करते आणि डब्यावर खूप चविष्ट माझ्या आवडीचे पदार्थ बनवून देते.

याशिवाय ती मला माझा गृहपाठ करण्यास मदत करते आणि ती माझी सर्वोत्तम शिक्षिका देखील आहे. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि देवा माझ्या आईला खूप सुधृढ आयुष्य जगावे हीच मी देवाकडे प्रार्थना करतो.

माझी आई निबंध मराठी 100 शब्द | Majhi Aai nibandh 100 Words
Majhi Aai nibandh 100 Words: माझ्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणजे माझी आई. म्हणूनच मला तीच्याबद्दल खूप कौतुक आणि आदर आहे. ती माझ्या आयुष्यातील पहिली आणि सर्वोत्तम शिक्षिका आहे. ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझ्यासाठी ती तिच्या आनंदाचा नेहमीच त्याग करते. माझी आई तिच्या कामासाठी खूप समर्पित आहे आणि तिचा मेहनती स्वभाव मला नेहमीच आकर्षित करतो.

माझी आई घरामधे सर्वात आधी उठते आणि आम्ही अंथरुणातून उठण्यापूर्वी नेहमीच तिची कामे सुरू करते. माझी आई माझ्या घराची व्यवस्थापक आहे. आमच्या घरातील प्रत्येक गोष्टींची आणि गरजांची ती खूप काळजी घेते. ती आमच्या घरासाठी स्वादिष्ट जेवण बनवते, खरेदी करते आणि आमच्यासाठी देवासमोर प्रार्थना ही करते. यासोबत ती आमच्या छोट्या मोठ्या गरजांची ही काळजी घेते. माझी आई मला, माझ्या भावाला आणि बहिणीला शिकवते आणि गृहपाठ पूर्ण करण्यास मदत करते. या सर्व योगदानामुळे माझी आई माझ्या घराचा महत्वाचा कणा आहे.

आईवर निबंध (150 शब्द) | Mazi Aai nibandh 150 Words
Mazi Aai nibandh 150 Words
Mazi Aai nibandh 150 Words
Mazi Aai nibandh 150 Words: आई हा शब्द मी आतापर्यंत शिकलेला सर्वात महत्वाचा शब्द आहे असे मला वाटते. माझी आई माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. माझी आई केवळ मेहनतीच नाही तर तिच्या कामांसाठी पूर्णपणे समर्पित देखील आहे. सूर्योदय होण्यापूर्वीच ती सकाळी लवकर
उठते आणि तिची दैनंदिन कामे करायला लागते. माझी आई एक अतिशय सुंदर आणि दयाळू स्त्री आहे. जी आमच्या घरातील प्रत्येकाची काळजी घेते.

मी माझ्या आईचा खूप आदर करतो. कारण तिने मला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवण्यास मदत केली नाही उलट तिच्या अनुभवातून शिकून मला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून सांगितले आहे व एक चांगला माणूस बनण्यास मदत केली. ती आमच्यासाठी स्वयंपाक करते, सर्वांची काळजी घेते आणि घरासाठी सर्व गोष्टींची खरेदी करते त्यामुळेच ती बहुतेक वेळा व्यस्त असते.

जेव्हा तिला मोकळा वेळ असतो तेव्हा ती माझ्यासोबत खेळते. मला होमवर्क करायला मदत करते आणि इतर महत्त्वाच्या कामांमध्ये ही मदत करते. माझी आई मला बऱ्याच गोष्टी शिकवायला मदत करते त्यामुळे मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि तिला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच मी देवाकडे रोज प्रार्थना करतो.

आईवर सर्वोत्तम निबंध (200 शब्द) | Majhi aai nibandh marathi madhe – 200 words
Majhi aai nibandh marathi madhe
Majhi aai nibandh marathi madhe
Majhi aai nibandh marathi madhe: आई हा एक असा शब्द आहे जो शब्दात व्यक्त करता येत नाही. माझी आई माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. माझ्या आयुष्याला योग्य आकार देण्यात तिने मला मदत केली आहे. माझी आई एक अतिशय दयाळू मनाची सुंदर स्त्री आहे. जिने माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला साथ दिली.

तिची व्यस्त दिनचर्या सूर्य उगवायच्या आधी सुरू होते ती फक्त आमच्यासाठी जेवण तयार करत नाही तर उलट ती मला माझ्या प्रत्येक कामात पूर्ण मदत करते. जेव्हा मला माझ्या अभ्यासात कोणतीही अडचण येते तेव्हा माझी आई शिक्षिका बनून मला माझ्या समस्या सोडवण्यास मदत करते आणि जेव्हा मी कंटाळुन जातो तेव्हा ती माझ्यासोबत एक मित्र म्हणून खेळते.

आई आमच्या घरात सर्वात महत्वाची भूमिका बजावते आणि आमच्या कुटुंबात कोणी आजारी पडले की त्यांची काळजी घेण्यासाठी ती रात्रभर जागते. आमच्या कुटुंबासाठी ती स्वतःच्या आनंदाचा त्यागही हसत हसत करते. माझी आई खूप मेहनती स्त्री आहे. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील सर्व आवश्यक कामे करते.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्या आईने मला मार्गदर्शन केले आहे. लहान वयात काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणे माझ्यासाठी खूप कठीण होते परंतु माझी आई मला योग्य मार्ग दाखवण्यासाठी माझ्या आयुष्यात नेहमीच माझ्या मागे उभी असते.

माझी आईवर निबंध (250 शब्द) | My Mother Essay in Marathi
My Mother Essay in Marathi
My Mother Essay in Marathi
My Mother Essay in Marathi: माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. तिच्यामुळेच मला हे सुंदर जग पाहता आले तिच्या प्रेमाने आणि तिने केलेल्या संघर्षानेच मला खूप मोठे केले आणि मला एक चांगली व्यक्ती बनवण्यास मदत केली.

माझ्या मते आई हे जगातील सर्वात विश्वासार्ह व्यक्ती आहे तिच्यासोबत तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करू शकता. माझी आई देखील माझी चांगली मैत्रीण आहे. माझे सर्व सुंदर क्षण मी तिच्यासोबत शेअर करू शकतो. माझ्या सर्व वाईट काळात देखील माझी आई सर्वात जवळ होती. त्या वाईट काळातही तिने माझा हाथ सोडला नाही म्हणूनच मला माझ्या आईचे खूप कौतुक आहे.

माझी आई खूप मेहनती आहे आणि तिच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित आहे. परिश्रम कधीच व्यर्थ जात नाहीत आणि कठोर परिश्रमानेच यश मिळते हे मी तिच्याकडूनच शिकलो. चेहऱ्यावर हलके हसू घेऊन ती दिवसभर काम करत राहते.

ती फक्त चांगले आणि चविष्ट जेवण बनवत नाही तर घरातील प्रत्येक सदस्याची चांगली काळजी घेते. आमच्या कुटुंबासाठीही ती खूप चांगले निर्णय घेते. कधी कधी माझे वडील देखील सल्ल्यासाठी आईकडे येतात कारण ती निर्णय घेताना भेदभाव तिचा कोणासोबत तुलना करत नाही.

आमच्या कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत. माझे वडील, माझी आई, मी आणि माझी धाकटी बहीण. आम्हा सर्वांची देखभाल माझी आई करते. त्यांनी मला जीवनातील नैतिकतेबद्दलही सांगितले आहे. घरचा अभ्यास करताना जेव्हा मी कोणत्याही अडचणीत अडकलो तेव्हा शिक्षका म्हणून आई मला माझ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मदत करते त्यामुळे ती सतत व्यस्त असते.

माझी आई एक दयाळू स्त्री आहे. तिचे प्रेम नेहमीच माझ्या डोक्यावर झाडाच्या सावलीसारखे राहिले आहे आणि मला हे देखील माहित आहे की मला या जगात कुठेही आईचे प्रेम मिळणार नाही. प्रत्येक मूल आपल्या आईवर खूप प्रेम करत असते पण आईचे महत्त्व त्यांनाच कळते ज्यांना आई नसते. मला माझ्या आईला आयुष्यभर असच हसत बघायचे आहे.

माझी आई यावर दीर्घ निबंध (300 शब्द) | Mazi Aai Marathi Nibandh 300 words
Mazi Aai Marathi Nibandh 300 words
Mazi Aai Marathi Nibandh 300 words
Mazi Aai Marathi Nibandh 300 words: आई हा मुलाच्या तोंडून निघणारा पहिला शब्द असतो. आई ही देवाने मला दिलेली सर्वोत्तम आणि अमूल्य देणगी आहे. माझ्या आईचे प्रेम आणि दयाळूपणा शब्दात मांडने माझ्यासाठी खूप कठीण आहे.

प्रत्येक मुलासाठी त्याची आई सर्वात प्रेमळ आणि काळजी घेणारी व्यक्ती असते. आईचे प्रेम इतर कोठेही कोणी अनुभवू शकेल असे मला वाटत नाही. माझ्या आई मध्ये सर्व क्षमता आणि गुण आहेत ते ऐका चांगल्या आई मध्ये असायला हवेत.

माझ्या कुटुंबात माझे आजी आजोबा, माझे आई वडील आणि मी आणि माझी धाकटी बहीण असे एकूण सहा सदस्य आहेत. पण केवळ माझ्या आईमुळेच आमचे घर अधिक आनंदी असते. ती सकाळी लवकर उठते, उठल्यावर ती स्वतःच आवरून आमच्यासाठी नाश्ता तयार करते आणि नंतर तिच्या इतर रोजच्या कामात गुंतते. ती आमची खूप काळजी घेते आणि विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवून आम्हाला खायला देते.

घरातील प्रत्येक सदस्याच्या आवडीनिवडीची तिला चांगलीच माहिती आहे आणि माझ्या आजोबांनी कोणते औषध कधी आणि किती वेळा घेतले आहे हे देखील तिला माहित असते. माझे आजोबा माझ्या आईला घराचे व्यवस्थापक म्हणतात कारण ती घरातील सर्व काही सांभाळते.

मी माझ्या आईच्या नैतिक शिकवणीने मोठा झालो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिने मला मार्गदर्शन केले आहे. तिला माझ्या भावना चांगल्या प्रकारे समजतात. आईने मला नेहमीच वाईट परिस्थितीत साथ दिली आणि मला त्यामधून बाहेर पाडण्यासाठी प्रेरणा दिली आहे.

माझ्या आईला मला शिस्तबद्ध, व्यक्तिशीर आणि विश्वासार्ह व्यक्ती व्हायला शिकवले. ती एका झाडा सारखी आहे जी आपल्या कुटुंबाला तिच्या प्रेमाच्या सावलीत ठेवते. बरं ती खूप काम करते पण तरीही ती खूप शांत राहते.

कोणत्याही वाईट परिस्थितीत ती आपला संयम गमावत नाही. माझी आई आणि माझे एक विशेष प्रेमाचे नटे आहे आणि तिने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. माझी आई सदैव निरोगी आणि आनंदी राहावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.

माझी आई यावर 600 शब्दात निबंध | Mazi aai marathi nibandh 600 words
Mazi Aai Marathi Nibandh 600 words: आई या शब्दातच खूप गोडवा आहे. हा शब्द उच्चारताच माणसाची प्रत्येक वेदना कमी होते. आई ही देवा पेक्षा मोठी असते म्हणूनच जेव्हा माणसाला वेदना होतात तेव्हा आपल्या तोंडातून सर्वात पहिला शब्द बाहेर पडतो तो म्हणजे “आई”. आईचे प्रेमळ हात आपल्यावर आपुलकीने आणि प्रेमाने आपले प्रत्येक दुःख कमी करतात.

माझी आई माझी प्रेरणा आहे. माझी आईच माझी पहिली गुरु आहे. तिने लहानपणापासूनच मला चांगले संस्कार दिलेत. आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा दिली. तिने दुःख सहन करूनही माझ्या सुखाला नेहमीच प्राधान्य दिले. स्वतःच्या आधी तिने माझा विचार केला. बाहेर होतो तेव्हा दररोज फोन करून प्रत्येक क्षणी माझ्या तब्बेतेची विचारपूस करणारी माझी आई.

निस्वार्थ प्रेम करणारी एकच आई जगात आहे. ती नेहमी आमच्यासाठी करते पण स्वतःला कधीही मूल्य देण्यास सांगत नाही. मला नेहमी इतरांशी चांगले वागायला, माझ्या कामाशी प्रामाणिक राहायला शिकवले आहे. हेच कारण आहे की आज मी माझ्या आईमुळेच एक यशस्वी व्यक्ती बनलो आहे.

मातृत्व केवळ माणसामध्येच नाही तर प्राण्यांमध्येही दिसते. प्रत्येक जीवाची आई ही देवी सारखी असते. देवाने प्रत्येक जीव निर्माण केला आहे. परमेश्वर एकाच वेळी प्रत्येक जीवात उपस्थित राहू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली आणि प्रत्येक जीवाला एक आई दिली जे आपल्या मुलांची काळजी घेते.

आईच्या आश्रयाने सर्व दुःख दूर होते. मुलगी, सून यांच्याशी स्त्री किती रुपाने नाती जपते माहित नाही पण त्यामध्ये सर्वात वरचे स्थान म्हणजे आईचे आहे. जगात आईचा पेशा असा आहे की त्याची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. आईचे स्थान हे नेहमीच सर्वात आदरणीय आहे.

आईचा पेशा सर्वात मोठा आहे, ज्याचा पगार निश्चित होऊ शकत नाही. आईने दिलेल्या प्रेमासाठी मुलाने स्वतःला झोकून दिले तरी तेही कमीच. आई म्हणजे प्रेम आणि त्यागाची मूर्ती जर एखाद्या आईला आपल्या मुलाचे संरक्षण करायचे असेल तर ती सर्वात मोठ्या समस्यांना तोंड देऊ शकते.

एक स्त्री असल्याने तिच्याकडे सत्ता असो वा नसो पण आई म्हणून ती सर्वशक्तिमान आहे. आई या शब्दाचे महत्त्व सांगता येत नाही सर्व नात्यांमध्ये आईचे नाते सर्वात महत्त्वाचे असते. आई ही पालन पोषण करते, आई शिक्षिका ही असते. जेव्हा गरज असते तेव्हा ती आपल्या शिक्षिकेप्रमाणे शिकवते आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहन देते.

कधी कधी मित्रासारखे संकटामध्ये आपल्या पाठीशी उभे राहून आपले दुःख कमी करते. ती स्वतः खायला विसरू शकते पण आपल्या मुलाला खायला घालायला कधीच विसरू शकत नाही. आईच्या प्रेमाची परतफेड कोणीही करू शकत नाही. आईचे प्रेम ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि ज्यांना आई नाही तेच त्यांचे महत्त्व समजू शकतात.

देव आपल्यावर एकदा रागावू शकतो पण आई कधीच आपल्यावर रागावू शकत नाही. आई शिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही. माणसाने कितीही पूजा केली, जरी तो चारही तीर्थक्षेत्र गेला तरी जोपर्यंत तो आईचा आदर करत नाही तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे.

गणेशाने आपले आई वडील भगवान शिव आणि पार्वतीची प्रदक्षिणा करून मानव जातीला ज्ञान दिले की जगातील सर्वात मोठे तीर्थ आणि पुण्य म्हणजे आई-वडिलांची सेवा करणे. आईचे मन दुखवण्यापेक्षा आयुष्यात मोठे पाप दुसरे काहीही असू शकत नाही. पवित्र नद्यांमध्ये स्नान करून किंवा तीर्थयात्रा करून हे पाप धुता येत नाही.

जोपर्यंत आई मुलाने केलेल्या चुकीसाठी माफ करत नाही तोपर्यंत स्वतः देवसुद्धा त्याच्या चुकीसाठी क्षमा करत नाही. एखाद्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचा किंवा इतरांचा हेवा वाटू शकतो ती इतरांसाठी वाईट असू शकते परंतु ती आपल्या मुलांसाठी कधीही वाईट नसते म्हणूनच प्रत्येक मुलाने नेहमी आपल्या आईचा आदर केला पाहिजे. तिचे मन कधीही दुखवू नये.

माझी आई यावर 1200 शब्दात निबंध । Mazi aai marathi nibandh 1200 words
Mazi aai marathi nibandh 1200 words: जगातील प्रत्येक शब्दाची व्याख्या करता येते पण आईची व्याख्या करणे फार कठीण आहे, कारण आई या शब्दाची एकच व्याख्या नाही तर हजारो व्याख्या केल्या तरी कमी पडतील . ही करुनेची मूर्ती आहे, जी आपल्या प्रेमाने मुलाचे जीवन प्रत्येक आनंदाने आपल्या स्नेहाने भरते. आपल्या आई साठी त्याच्या मुलाचे जीवन त्याच्या स्वतःच्या जीवनापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे म्हणूनच असह्य वेदना सहन करून आई आपल्या मुलाला जन्म देते.

स्त्री कमकुवत असते असे म्हणतात पण स्त्रीपेक्षा सामर्थ्यवान आणि सहनशील कोणीही नाही. आई म्हणून आईला जेवढे दुःख सोसावं लागतं तितक्या वेदनांनी एक खडकही तुटू शकतो. समाज आणि आपल्या देशाच्या जडणघडणीत आईचे मोठे योगदान असते कारण ती आईच असते जी आपल्या मुलाला एक महान व्यक्ती बनवू शकते.

प्रत्येक आईला हेच हवे असते की आपल्या मुलाने आयुष्यात एक महान व्यक्ती व्हावे. त्याने प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्यात यशस्वी व्हावे. मुलाच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी शिक्षक खूप महत्त्वाचे असले तरी पण आई ही मुलाची पहिली गुरु असते आणि आयुष्यभर ते आपल्या मुलाला प्रत्येक कठीण मार्गावर योग्य आणि अयोग्य यातील फरक शिकऊन मार्गदर्शन करते.

आईच्या मार्गदर्शनाखाली मूल कधीही अपयशी होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची आणि जीवाचे अस्तित्व आईशी जोडलेले आहे. भगवंताने हे विश्व केवळ आईच्या माध्यमातून निर्माण केले आहे. मातृदिन हा केवळ आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो पण आईचा सन्मान करण्यासाठी केवळ एकच खास दिवस नसावा तर प्रत्येक दिवसातील प्रत्येक क्षण आईला समर्पित केला पाहिजे कारण आपल्या सर्वांचे हे जीवन आई मुळेच आहे.

मग आपण आईला एक खास दिवस कसा समर्पित करू शकतो? संपूर्ण आयुष्य आईला समर्पित आहे म्हणूनच जे लोक मातृदिनानिमित्त आपल्या आईसाठी काहीतरी खास करतात त्यांनी आपल्या आईचा नेहमीच आदर दिला पाहिजे कारण आई आपल्या मुलाला कोणत्याही विशिष्ट दिवशी कधीही प्रेम किंवा आपुलकी देत नाही तर ती आपल्या मुलाला आयुष्यभर प्रेम आणि वात्सल्य देते.

आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात आणि प्रत्येक नात्यात काही गैरसमजामुळे दुरावा निर्माण होतो. गरजेच्या वेळी प्रत्येक नाती फसवणूक करू शकतात. पण आई सोबतचे नाते देवही तोडू शकत नाही. जग तुझ्यावर विश्वास ठेवू किंवा न ठेवू पण आई नेहमीच तुझ्यावर विश्वास ठेवते. कारण आईला तिच्या संगोपनावर पूर्ण विश्वास असतो तिने आपल्या मुलाला दिलेल्या शिक्षण आणि संस्कृतीच्या विरोधात आपले मुल काहीही करू शकत नाही हे तिला माहित आहे.

आईसाठी जितकं बोललो तितकं कमीच. आजही जेव्हा मी कोणत्याही अडचणीत असतो तेव्हा सर्वात आधी मी माझ्या आईचा विचार करतो मला तो क्षण आठवतो जेव्हा आई माझ्या चेहऱ्याकडे पाहून समजायचे की मी काही अडचणीत आहे न जाने तिच्यात अशी कोणती कला होती ज्यावरून तिला कळायचे की मी दुःखी आहे आणि मला पाहून तिही दुखी होत होती व त्या दिवशी मी जेवल्याशिवाय ती सुद्धा जेवत नसे.

आजही कामावरून घरी गेल्यावर घरातील प्रत्येक सदस्य झोपी जातो पण एक आईच असते जिथे लक्ष दाराकडे असते कि तीचा मुलगा कधी येईल. घरी पोहोचताच ती आधी उठते आणि जेवणासाठी विचारते. माझी वाट पाहत तीही भुकेली राहते. तो क्षण आठवला की आई वरचं खूप प्रेम उतू जातं. जेव्हा मी आजारी पडायचो तेव्हा आई रात्रभर माझ्या शेजारी बसून डोकं चोळायची.

मी बरा होईपर्यंत तिला झोपही येत नव्हती. माझी आई फक्त देवासमोर माझ्या सुखासाठी प्रार्थना करते. आई अनेकदा विचारायची की मी कमवायला लागलो की आईसाठी साडी आणणार की नाही. मी त्याच दिवशी ठरवले होते की जेव्हा पहिला पगार हातात येईल तेव्हा मी पूर्ण पगार माझ्या आईच्या ताब्यात देईन.

आजही आईच्या कुशीत झोपताना जेवढी शांतता आणि सुख मला कुठेच मिळत नाही. माहिती नाही तिच्या हातात अशी काय जादू आहे ज्याने हात डोक्यावरून फिरवत माझा सगळा थकवा निघून जातो. मला अजूनही आठवतो तो दिवस जेव्हा शाळेतील सर्व मुले सहलीला जात होती पण सहलीची फी जास्त असल्याने मी माझ्या वडिलांना सांगण्यात कसरत होतो तरीही मी हिम्मत करून माझ्या वडिलांना पिकनिकला जाण्यासाठी सांगितले.

मात्र सध्या पैसे नसल्याचे सांगत त्यांनी नकार दिला पण आईने माझ्या चेहऱ्यावरचे दुःख पाहिले दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन सहलीची फी जमा केली. जी तिने बराच वेळ वाचवली होती. जेणेकरून मी सहलीला जाऊ शकेल आणि माझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल त्या दिवशी मला समजले की आईला तिच्या मुलांच्या आनंदापेक्षा अधिक कशाची गरज नाही.

ती आपल्या मुलांच्या आनंदासाठी जगातील सर्व संपत्तीचा त्याग करेल त्याबद्दल तिला फक्त प्रेमाची गरज आहे. आपल्या मुलाने आयुष्यात मोठा माणूस होण्याची ती नक्कीच कल्पना करते पण ती स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मुलाला यशस्वी करण्याचा कधीच विचार करत नाही तर तिच्या मनात फक्त आपल्या मुलाचा आनंद राहतो.

म्हातारपणी आई वडिलांना निराधार सोडणाऱ्या लोकांचा विचार करून मला खूप वाईट वाटते ज्या पालकांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलासाठी समर्पित केले तेच पालक वृद्धापकाळ त्या मुलासाठी ओझे होतात. किती लाज वाटन्यासारखी गोष्ट आहे. माझ्यामते जगात वृद्धाश्रम नसावेत.

हे मूल मोठे होऊन मला वृद्धाश्र मधे सोडेल या आशेने प्रत्येक आई आपल्या मुलाला वाढवते का. कोणतीही आई आपल्या मुलाकडून अशी अपेक्षा करणार नाही आईला वृद्धाश्रम सोडणारी मुले ही त्यावेळी आईच्या मनातून आपल्या मुलासाठी आशीर्वाद निघतात.

मुलाने आपल्या आईवर कितीही अन्याय केला तरी आई आपल्या मुलासाठी कधीच चूक करत नाही म्हणूनच आईला देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. आज मला माझ्या आईबद्दल लिहिताना खूप आनंद होत आहे मात्र आईबद्दल मी जे काही लिहिलं ते कमी आहे कारण आई बद्दल कोणीही पूर्ण लिहू शकत नाही.

आईवर दहा ओळी निबंध | Majhi Aai 10 lines in marathi | Mazi Aai 10 lines in marathi
Majhi Aai 10 lines in marathi

Leave a Comment

error: Content is protected !!