मराठी नाम व नामाचे प्रकार


जगातील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय . उदा . वही , कागद , डोंगर

नामाची वैशिष्टे :
सामान्यनाम :
अ ) पदार्थवाचक नाम :
ब ) समूहवाचक नाम :
विशेषनाम :
भाववाचक नाम :
वाक्यातील नाम कसे ओळखायचे ?
नामांचे विविध उपयोग :
1) सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :
2) विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :
3) भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग :
1) ‘प्रामाणिकपणा’ हे कोणते नाम आहे ?
2) सुलभा हे कोणते नाम आहे ?
3) समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?
4) नामाचे मुख्य प्रकार किती ?
5) मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत


नामाची वैशिष्टे :
नाम ही संज्ञा वस्तूवाचक आहे. अशी काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते .
नाम ही शब्दजाती विकारी असून तिला लिंगवचन विभक्तीचे तसेच शब्दयोगी अव्ययांचे विकार होतात .
सामान्यरूप होणे हा नामाचा एक गुणधर्म आहे .
शब्दांच्या जातीतील संख्येने सर्वाधिक असणारी शब्दजाती म्हणजे नाम होय .
नामाचे मुख्य तीन प्रकार
सामान्यनाम
विशेषनाम
भाववाचक नाम


सामान्यनाम :
ज्या नामाने अनेक समान गुणधर्म म्हणजे जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो त्यास सामान्यनाम असे म्हणतात . सामान्यनामाचे अनेकवचन होते . सामान्य नाम परंपरेने , रूढीने किंवा व्यवहाराने मिळते . उदा . घर , मुलगी , ग्रह , तारा .

अ ) पदार्थवाचक नाम :
जे घटक शक्यतो लिटर , मीटर किंवा कि . ग्रॅम अशा परिणामात मोजले जातात / संख्येत मोजले जात नाहीत , त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नामे म्हणतात . उदा . तांबे , पीठ , पाणी , सोने .

ब ) समूहवाचक नाम :
समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात .उदा . मोळी , जुडी , ढिगारा , गंज .

विशेषनाम :
ज्या नामांनी एका प्राण्याचा , पदार्थाचा किंवा एका समूहाचा बोध होतो त्यास विशेषनाम म्हणतात . ते फक्त एका घटकापुरते मर्यादित असते . विशेषनाम एकवचनी असते . विशेषनाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते . उदा . गोदावरी , रमेश , ताजमहाल , सूर्य , चंद्र , गोपाल , महेश .

भाववाचक नाम :
ज्याला स्पर्श करता येत नाही , चव घेता येत नाही , डोळ्यांनी पाहता येत नाही अशा नावांना भाववाचक नाम म्हणतात . हे घटक वस्तुस्वरूपात दाखविता येत नाहीत .उदा . विश्रांती , श्रीमंती , सौंदर्य .

खालील प्रत्यय वापरुन भाववाचक नामे साधता येतात .

१) य सुंदर -सौंदर्य , गंभीर – गांभीर्य , धीर – धैर्य
२ ) त्व माणूस – मनुषत्व , शत्रू – शत्रुत्व , मित्र – मित्रत्व , जड – जडत्व
३) पण /पणा देव-देवपण , बाळ -बालपण , वेडा -वेडेपणा , चांगला – चांगुलपणा
४) ई श्रीमंत-श्रीमंती , गरीब -गरिबी , चोर -चोरी
५) ता नम्र -नम्रता , सम – समता , बंधु – बंधुता
६) की पाटील -पाटिलकी , माल -मालकी , आपला -आपुलकी , माणूस -माणुसकी
७) गिरी गुलाम-गुलामगिरी , फसवा -फसवेगिरी , गाव – गावकी , माणूस -माणूसकी
८) वा गोड -गोडवा , गार -गारवा , ओला -ओलावा , थकणे -थकवा
९) आई नवल-नवलाई , चपळ -चपळाई , चतुर -चतुराई
१०) वी थोर-थोरवी

वाक्यातील नाम कसे ओळखायचे ?
1 ) वाक्याचा कर्ता व कर्म नामच असते .

उदा. वाघाने ससा पकडला .

2) षष्ठी प्रत्ययाच्या ( चा,ची,चे ,च्या ) मागे व पुढे दोन्ही नामेच असतात .

उदा. आजकाल यंत्रांचा वापर खूप वाढला आहे .

3) शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामाचे कार्य करतो किंवा नाम असतो .

सत्तेपूढे शहाणपण चालत नाही .
पक्षी झाडावर बसला .


नामांचे विविध उपयोग :
1) सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :
एखद्या सामान्यनामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती , स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग केल्यास ते विशेषनाम होते .

आमचा पोपट कालच गावाला गेला .
शेजारच्या कमलाबाई कालच देवाघरी गेल्या .
आमची बेबी नववीत आहे .

2) विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :
एखाद्या विशेषनामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेकवचन म्हणून केल्यास ते सामान्यनाम होते .

आमची बायको म्हणजे लक्ष्मी
आईचे सोळा गुरुवारांचे व्रत आहे .
कालिदास हा भारताचा शेक्सपिअर आहे .
आमच्या वर्गात तीन पाटील आहेत .
तो केवळ कर्ण आहे .

3) भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग :
भाववाचक नामांचा उपयोगसुद्धा व्यक्तीसाठी केल्यास ती विशेषनामे होतात .

शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे .
माधुरी सामना जिंकली .
1) ‘प्रामाणिकपणा’ हे कोणते नाम आहे ?
Ans. भाववाचक नाम

2) सुलभा हे कोणते नाम आहे ?
Ans. विशेषनाम

3) समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?
Ans. सामान्यनाम

4) नामाचे मुख्य प्रकार किती ?
Ans. तीन

5) मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ?
Ans. आठ

Leave a Comment

error: Content is protected !!