हा खेळ सावल्यांचा ( भाग -२ ) Marathi Bhaykatha


“कमलेश ने हातात काठी घेतली, आणी कंदिल घेउन तो त्या झुडपांच्या दिशेने निघाला … एखाद्या जंगली श्वापदाचा अंदाज बांधला , काठिने झुडप बाजुला करत तो आत शिरला. कंदिल वर धरला काहि निटसे दिसत नव्हते … थोड्या दुरवर एक शुभ्र अस काहिस दिसल तो आजु बाजुची चाहुल घेत अजुनच जंगलात जात होता तस तो प्रकाश अधिकच तेजस्वी होत होता … तो आता त्या प्रकाशाच्या जवळपासच होता समोर झाडीहोती … कमलेश ने डोळे किलकिले करुन पाहिल तर तिथे एक स्त्रि होती सफेद साडी आनी काळेभोर केस पाठमोरी उभी होती .. कमलेश अचानक हे सरव बघुन प्रचंड घाबरला पन धिर धरुन आवज दिला … ” कोण आहे ?? कोण आहेस तु ….? ईतक बोलतो न बोलतो तेच तिने आपल डोक मागे फिरवल कर्र् कर्र असा आवाज झाला ते डोक पुर्ण पणे मागे फिरल … पांढरे फट्ट डोळे तोंडातुन लाळे सारख रक्त येत होत…ति कमलेश कडे बघुन हसायला लागली … कमलेश हे सरव पाहुन जिव मुठित धरुन बोंबलत घराच्या दिशेने धावत झाडिच्या बाहेर आला … अंगणात येउन बोंबलत होता सिमा सिमा बाहेर ये ..

“काय झाल काय तुम्हाला करत सिमा घरा बाहेर आली तो अक्षरछा थरथरत धापा टाकत होता … त्याने दम खातो न खातो तेच कामिनि बाहेर आली … तिला बघुन तो परत जिव घेउन गावच्या शंकर मंदिराच्या दिशेने धावत सुटला
.. सिमा ला काहिच कळत नव्हते नक्की काय झाले कामिनी सिला ला धिर देत बोलली ” ताई तुम्ही घाबरु नका ते येतिल परत … तुम्ही आत चला काळजी करु नका … कमलेश मंदिरा जवळ येउन थांबला तिथल्या पुजार्‍याला घडलेला किस्सा सांगितला …
भाउ तुम्ही हा भस्म घ्या आणी तुमच्या बायकोच्या कपाळा वर लावा … ति गर्भवती आहे तिच्या वर येणार्‍या संकटा पासुन हे तुमच्या दोघांच आणी तिच्या होणार्‍या बाळाच रक्षण करेल ..
आणी गरजच तशी होती कारण ति जंगलसत दिसलेली स्त्री अजुन कोण नाहि तर कामिनिच होती …

कमलेश चा विश्वास पक्का झाला कि हि कामिनी माझा भास नसुन हे पिशाच्य आहे … तरीही एकदा खात्री करुन या संकटा तुन सुखरुप बाहेर पडायचा मार्ग काडायचा त्याने ठरवले की काहिच माहित नसल्या सारख दाखुन घरात प्रवेश करायचा … आणी या पिशाच्याचा हेतु जाणुन घेउन त्याचा काटा काडायचा मनात ठरवल्या प्रमाणे कमलेश घरी आला … अंगणात प्रवेश केला… सिमा दारात होती तिच्या बरोबर कामिनिही होती … सिमा रडत होती …कमलेश च्या हातात ते भस्म होत त्याच तेज कामिनिला विचलीत करत होत… कामिनिने डोक झटकल आणी तिचे डोळे पांढरे झाले तिच्या कडे पाहत असताना कमलेश पायात अडखळला आणी पडला .. तसे जमिनिवर ते अर्धे भस्म सांडले…
कमलेश उठला त्याने राहिलसाहिलेल भस्म हातात घेतल आणी सिमा च्या दिशेने चालु लागला कामिनी तिथुन हटली … जे काही थोड फार भस्म होत त्याने सिमाच्या डोक्याला लावल आणी तिला सांगितल “मला वाईट स्वप्न पडल .. म्हणुनच मि देवळात गेलो तुजा सलामती साठी … आता मि आलोय ना सरव ठिक होईल .. धनी तुम्ही पण ना …रडत रडत सिमा हसु लागली दोघे आत गेले … चल तु झोप मि हि झोपतो आपण उद्या बोलु रात्र खुप झालिय .. कमलेश ने तिला झोपायला सांगितले … कामिनि सिमा च्या बाजुला अंतर ठेउन झोपली … गप्पा गोष्ठी चालु होत्या पण कामिनी तिला स्पर्श करत नव्हती … बोलता बोलता दोघी झोपी गेल्या … कमलेश हि विचार करत जागा होता त्याला झोप लागत नव्हती .. छोटा दिवा लावला होता त्याचा अंधुक प्रकाश घरात होता .. मध्यानरात्र झाली सिमा झोपली बाजुला कामीनी होती…

कमलेश चे भस्म खाली पाडल्यामुळे त्याने स्वता साठी काहिच ठेवले नव्हते .. कमलेश ने सिमा कडे पाहिले ति गाढ झोपली होती … कमलेश ने कुशि बदलताच बाजुला कामिनी बसली होती कमलेश दचकला … आणी घाबरला थरथरु लागला .. कामीनी ने माचिस च कांड पेटवल आणी मेणबत्ती लावली त्या प्रकाशात ति कमलेश कडे एकटक पाहत होती … कमलेश खुप घाबरला कामिनी त्याच्या चेहर्‍यावरुन हात फिरउ लागली .. मला तुम्ही खुप आवडता …
कमलेश ची वाचाच गेली ” स …स…. स… सि सी …..कमलेश सिमाला हाक देउ शकत नव्हता …. सिमा आता सकाळ परयंत उठणार नाही याची मि व्यवस्था केलीय कामिनीने कमलेश कडे बघत हसत बोलली …

कमलेश च्या बाजुला झोपत त्याच्या केसातुन हात फिरउ लागली कमलेश ने तिचा हात पकडला … खुप हिम्मत करुन बोलला हे चुकीच आहे सोड मला जा निघुन …! कोण आहेस तु ..? करत तिला स्वता पासुन दुर करु लागला…. कामिनी हसली पन तिच्या शक्ती पुढे कमलेश ची ताकद कमी पडली ..कमलेश ला झुगारत कामिनिने कमलेश च्या माथ्यावर चुंबन दिल …

कमलेश च्या गालावर चुंबन द्यायला जाणार ईतक्यात त्याने सरव ताकतिने तिला ढकलले …कामिनी खवळली तिचे डोळे पांढरे झाले ति कमलेश वर तुटुन पडली तिने कमलेश ला मिठित गच्च धरल आणी चुंबनांचा वर्षाव करु लागली मेणबत्ती विझली सर्वत्र अंधार झाला कमलेश काहिच करु शकत नव्हता … “काय हवय तुला ….??? “मला मुल हवय …!!! कामिनिचा आवाज बदलला …! हे बघ माझ लग्न झालय .. तु जो विचार करत आहेस तो मला मान्य नाही भले तु कोणीही आहेस …!

“तु माझी बायको नाहीस…..!
“मग कर माजाशी लग्न ….! कामिनीने भरदार आवाजात कमलेश ला सुनावल
कमलेशने तु जा आता ईथुन बोलत आवाज वाढवला तस कामिनी उठली आणी मेणबत्ती पेटुन हसत कमलेश कडे बघत सिमाच्या बाजुला जाउन झोपली …

कमलेश सुन्न झाला होता त्याच डोकच काम करत नव्हत ति कोणति ब्याद माजा घरी आलीय या विचारतच घाबरत चिंतेत रात्र गेली सिमा च्या कानावर हि गोष्ट घातली पाहिजे कारण ति गर्भवती आहे आणी हे पिशाच्य त्याच्या बरोबर रहात काहि तरी उपाय शोधला पाहिजे करत कमलेश झोपायचा प्रयत्न करत होता …

क्रमश …

Leave a Comment

error: Content is protected !!