मराठी असे आमची मायबोली |


Marathi Ase Aamchi Mayboli Marathi Nibandh: मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल मराठी भाषा हि खूप लवचिक भाषा आहे आणि अशा या आपल्या मराठी भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ होतात आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द देखील आहेत आणि हेच कारण आहे कि आज मराठी भाषा समृद्ध झाली आहे.

मराठी भाषा सर्व महाराष्ट्र राज्याची जरी एकच असली तरी हि एक अशी भाषा आहे जी दर बारा कोसावर बदलत जाते. मराठी लेखी भाषा जरी तीच असली तरी बोली भाषेत खूप फरक होत जातो. वेगवेगळ्या गावात किंव्हा जिल्ह्यामध्ये या भाषेचे बोलण्याचे हेल खूप वेगळे होतात.

मराठी भाषेत अनेक पोटभाषा आहेत. नाशिक, जळगाव आणि धुळे येथे अहिराणी, विदर्भात वऱ्हाडी किंवा विदर्भी, पूर्व खानादेशाता खानदेशी, कोकणात कोकणी तर गोव्या मध्ये कोंकणी भाषा बोलली जाते. आग्री, ठाकरी, बाणकोटी, कोळी, किरिस्ताव, कुणबी, मावळी, मालवणी, अशा अनेक भाषा कोकणी भाषेत येतात. नायगाव, वसई, डहाणू भागात वडवली बोलीत मराठी भाषा बोलली जाते. नालासोपारा आणि विरार भागांत सामवेदी बोलली मराठी बोलली जाते. दक्षिण भारतात तंजावर मराठी, नामदेव मराठी आणि भावसार मराठी बोलली जाते. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर डांगी भाषा बोलली जाते.

अशी ही मराठी भाषा नुसती भारतातच नव्हे तर इस्रायल आणि मौरिशस अशा देशात देखील बोलली जाते!

आता गंमत अशी आहे की ही आपली मराठी भाषा दर २५ किलोमीटर वर वेगळी भासते. आपण कोल्हापुरला गेलो तर तिथे मराठी भाषा खणखणीत, स्पष्ट आणि नेमकी वर्मावर बोट ठेवणारी! तिथल्या स्त्रियाही म्हणतात, “आम्ही आलो! आम्ही जातो, मी जातो!” साताऱ्याला भाषा थोडी नरम होते. लंवगी मिरचीचा झटका जाऊन साताऱ्याच्या तंबाखूची गुंगी त्यात डोकावते. तरी पण “लई” “चिक्कार” `आयला’ वगैरे म्हणजे खास सातारी ढंग! कोकणात हीच मराठी भाषा अगदी मऊ होते.

मराठी भाषेचा उगम संस्कृतपासून तर तिचे व्याकरण आणि वाक्य रचना प्राकृत या भाषांपासून झाला झाले आहे.

Mazi Matrubhasha Marathi Nibandh
Mazi Matrubhasha Marathi Nibandh
काळ बदलला तसे मराठी भाषेत अनेक बदल झाले आहेत. मराठी भाषेत कानडी, हिंदी, अरबी, फारशी, इंग्रजी अशा अनेक भाषां मधील शब्द आले आहेत.

आजच्या २१व्या काळात इंग्रजीला फार महत्त्व आहे. यात कोणाला दोष द्यायला नको? कारण महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून होत आहे. पदव्या मिळवून तरुण मंडळी परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. तिथे इंग्रजी भाषाच बोलावी तसेच लिहावी लागते. असो, पण म्हणून आपण आपल्या मातृभाषेला विसरून जायचे का? दुसऱ्या देशातील भाषा जरी अवगत झाली तरी आपल्या मराठीला कधीच विसरु नका.

प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा हि बोलता, लिहिता आणि वाचता आलीच पाहिजे. आपल्या मराठीतसुद्धा खूप विषयांवर लेखन झाले आहे. शास्त्र-विज्ञान, ललित साहित्य खूप आहे. त्याचा उपयोग करूया, आपल्या ज्ञानात वाढ करूया! म्हणून मराठीत फक्त बोलू नका तर लिहूनही ही भाषा आणखी समृद्ध करा.

Leave a Comment

error: Content is protected !!