मध्यम वयातील शारीरिक बदलांविषयी माहिती|

Information about physical changes in middle ageमध्यम वय म्हणजे सर्वसाधरणपणे 40 ते 65 वर्षांपर्यंतचा कालखंड होय . मध्यम वयातील स्त्री-पुरुषांना विविध प्रकारचे शारीरिक बदल अनुभवास येतात . त्या बदलांच्या दृश्य खुणा प्रकर्षाने जाणवतात . मध्यम वयातील स्त्री-पुरुषांमध्ये आढळून येणारे हे शारीरिक बदल प्रामुख्याने व्यक्तीची उंची , वजन आणि सामर्थ्य किंवा शक्ती याबाबत दिसून येतात . तारुण्यावस्थेपासून मध्यम वयापर्यंत वाटचाल करीत असता अनेक शारीरिक बदल हे हळूहळू व क्रमाक्रमाने होत असतात .

वाढत्या वयानुसार जरी प्रत्येक मध्यमवयातील व्यक्तीस काही शारीरिक बदल अनुभवास येत असेल तरीपण शारीरिक बदलांचे प्रमाण किंवा गती वेगवेगळी दिसून येते . एखादा गंभीर आजार केव्हा उद्भवेल . या बाबतीत व्यक्तीचा अनुवंश जन्म वारसा व जीवनशैली यांचा कार्यभाग अत्यंत महत्वाचा असतो .woman in blue suit jacketमध्यम वयात अनेक प्रकारचे शारीरिक बदल घडून येत असतात . वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर हळूहळू हे बदल अनुभवास येतात . माड्यां वयात शारीरिक अवयवांचे कार्य पूर्वीप्रमाणे चांगल्या प्रकारे होत नाही . काही कार्यात बिघाड निर्माण होतात , तर काही मंद गतीने होतात . मध्यमवयीन व्यक्तीचे वय जसेजसे वाढत जाते तसतसे शारीरिक बदल जास्त ठळकपणे दिसू लागतात . उदा. केस पिकणे , टक्कल पडणे , वजन वाढणे , लठ्ठपणा , चष्मा लागणे इत्यादी . मात्र विकासाच्या प्रत्येक अवस्थेत व्यक्तिभिन्नता दिसून येते . तशीच व्यक्तिभिन्नता मध्यम वयाच्या बाबतीतही दिसून येते .दृश्य खुणा ( Visible Signs ) : मध्यम वयातील शारीरिक बदलांची सर्वात महत्वाची अशी दृश्य खूण म्हणजे शारीरिक रूप होय . वय वर्षे 40 ते 50 यादरम्यान सर्वप्रथम वृद्धावस्थेच्या(वार्धक्याच्या ) बाह्य खुणा दिसून येतात .

त्वचेअंतर्गत चरबी नष्ट झाल्यामुळे मध्यमवयीन व्यक्तीच्या त्वचेवर सुरुकुत्या पडू लागतात आणि त्वचा दबली जाते . मेलॅनिन या स्त्रावाच्या निर्मिती बाबतीत कमतरता झाल्याने केस पातळ व करडे बनू लागतात म्हणजे केस पांढरे होण्याची सुरुवात होते . बोटांची नखे जाड व ठिसूळ बनतात.उंची आणि वजन : मध्यम वयातील व्यक्तींची उंची कमी होते आणि अनेक व्यक्तींचे वजन वाढते . सर्वसाधारणपणे वयाच्या 30 वर्षापासून 50 वर्षे वयापर्यंतच्या पुरुषांची उंची सुमारे 1 इंचाने कमी होते आणि त्यानंतर 50 ते 70 वर्षे वयादरम्यान आणखी एक इंच उंची कमी होते . त्याप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीत वय वर्षे 25 ते 75 वर्षे वयाच्या दरम्यान त्यांची उंची 2 इंचाने कमी होते .सामर्थ्य (strength ) : बहुसंख्य मद्यमवयीन व्यक्ती स्वत:ला अधिक सामर्थ्यवान व तंदुरुस्त बनविण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम व योगासने करीत असतात . मध्यम वयाच्या सुरुवातीस व्यक्तीचे सामर्थ्य व शारीरिक क्षमता क्षीण होत जातात . 20 व्या वर्षी आढळणाऱ्या सर्वाधिक शारीरिक सामर्थ्यामध्ये मध्यम वयात सर्वसाधरणपणे 10 % घट झालेली असते . वाढत्या वयानुसार हळूहळू मध्यमवयीन व्यक्तींची शारीरिक शक्ती व जोम कमी होत जातो .मध्यमवयीन व्यक्तींचे खांदे गोलाकार होऊन संपूर्ण शरीराला बाक आल्याप्रमाणे वाटते . त्यामुळे व्यक्तींचे पोट पुढे आल्यासारखे वाटते .

सांधे व हाडे यांच्या बदलामुळे अनेक समस्या निर्माण होतात . सांधेदुखी , गुडघेदुखी , पाठदुखी या तक्रारी मध्यम वयात वाढीस लागतात . शिवाय व्यक्तींची हाडे ठिसूळ बनतात . हाडांची झीज सुरू होते . पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हाडांची झीज जास्त प्रमाणात म्हणजेच पुरुषांच्या दुप्पट प्रमाणात होत असते . तसेच मध्यम वयात व्यक्तींची हाडे सहज तुटतात . तुटलेली हाडे लवकर बरी होत नाहीत .दृष्टिवेदन आणि श्रवणवेदन ( vision & Hearing ) : मध्यम वयात डोळे , कान, नाक, जिव्हा व त्वचा या सर्वच ज्ञानेंद्रियांच्या संवेदन क्षमतेमध्ये बदल होऊ लागतात . प्रामुख्याने डोळे व कान यांच्या कार्यक्षमतेत होणारे बदल मध्यमवयीन व्यक्तीस खूप त्रासदायक वाटतात . या वयात डोळ्यातील नेत्रभिंग पूर्वीइतके लवचीक राहात नाही . जवळच्या वस्तू पाहणे व वाचण्यासाठी डोळ्यांचे सामर्थ्य कमी होते . या वयात मोतीबिंदू , डोळ्यांच्या पडद्याचा आजार इत्यादी विकार होऊ शकतात .मध्यम वयात श्रवणवेदन क्षमतेमध्येसुद्धा फरक पडतो , वयाच्या 40 वर्षानंतर हळूहळू श्रवणक्षमतेचा ऱ्हास होतो . लहान आवाज नीट ऐकू येत नाही . या वयातील व्यक्तींना मोठ्याने बोलण्याची सवय लागते . वयाच्या 55 वर्षानंतर स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या श्रवणक्षमतेमध्ये खूपच ऱ्हास होतो .हृदयवाहिका यंत्रणा : मध्यम वयात हृदय रक्तवाहिन्यामध्ये बदल होत असतात . वाढत्या वयाबरोबर रक्तवाहिन्यांची आवरणे जाड होत जातात व त्यामुळे रक्ताभिसारणांमध्ये अडथळा निर्माण होतो .

व्यक्तींचा रक्तदाब वाढतो . स्थूल व्यक्तीच्या बाबतीत हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो . या वयात उच्च रक्तदाब व अतिरिक्त कोलेस्टेरॉल यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात . त्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळा येऊन हृदयविकार उद्भवतो . मध्यम वयातील व्यक्तींच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते .रक्तातील कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असते .1) चांगले कोलेस्टेरॉल (HDL) आणि 2) वाईट कोलेस्टेरॉल (LDL) यापैकी वाईट कोलेस्टेरॉल अधिक घातक ठरते . कारण रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी जर खूप वाढली तर ते रक्तवाहिन्यांची आतील स्तरावर चिकटून राहते . त्यामुळे रक्तवाहिन्या कडक व अरुंद बनतात .निद्रा : मध्यम वयात झोपेच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतात . चाळीशीनंतर झोपेच्या एकंदर कालावधीत वारंवार जाग येण्याचे प्रमाण वाढते . त्यामुळे गाढ झोपेचे प्रमाण कमी होते , पुरेशी शांत झोप लागत नाही . त्यामुळे अपुऱ्या निद्रेच्या अनेक तक्रारी जाणवतात . तसेच ज्या मध्यमवयीन व्यक्ती विविध प्रकारची औषधे , झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करतात . त्यांच्या बाबतीत झोपेच्या समस्या निर्माण होतात .

Leave a Comment

error: Content is protected !!