कोजागिरी पौर्णिमा म्हटलं तर रात्री गच्ची वर जाऊन मोज मजा करीत मसाला दूध आटून त्यात चंद्र पाहून ते आनंदाने पिणे हि आपली सर्वांची च कोजागिरी बद्दल कल्पना.
अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो, म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या पौर्णिमेचा उत्सव म्हणजे रात्री आपण तयार केलेल्या दुधामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि त्यानंतर ते दूध प्रसाद म्हणून सर्वांनी पिणे एवढीच आपल्याला माहिती असते.
हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला असल्यामुळे तो आपल्याला मोठा दिसतो. या रात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते. तसेच चंद्र हा शितल आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टींचे प्रतीक असल्यामुळे त्याची पूजा करणाऱ्यांना चंद्रासारखी शितलता मिळते, असे देखील समजले जाते. (Kojagiri Purnima Marathi)
या दिवशी शेतात तयार झालेल्या, पिकवलेल्या धान्याचे जेवण म्हणजेच नवान्न केले जाते. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला चंद्र यांची या रात्री पूजा केली जाते. शरद ऋतुतल्या पौर्णिमेला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून आपण सर्वजण ग्रहण करतो. अशा पद्धतीने आपण हा सण साजरा करतो.
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय?
कोजागिरी हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते. चंद्र हा शितल आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टींचे प्रतीक असल्यामुळे त्याची पूजा करणाऱ्यांना चंद्रासारखी शितलता मिळते, असे देखील समजले जाते. (Kojagiri Purnima Marathi) या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. म्हणून या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.
नाव कोजागिरी पौर्णिमा
इतर नावे शरद पौर्णिमा
माडी पौर्णिमा
लोख्खी पुजो
कौमुदी पौर्णिमा
साजरा करण्याचे ठिकाण संपूर्ण भारतात
कधी साजरा करतात अश्विन पौर्णिमेला
साजरा करणारे भारतीय
यावर्षी २०२३ ला कधी आहे 28 ऑक्टोबर 2023, शनिवारी
कोजागरी उपवासची पद्धत
या व्रताच्या महिमामुळे भक्ताला मृत्यूनंतर सिद्धत्व प्राप्त होते असे सांगितले जाते.
या दिवशी रात्री जागरण किंवा पूजा करावी.
या दिवशी पितळ, चांदी, तांबे किंवा सोन्याने बनवलेल्या कोणत्याही लक्ष्मीच्या मूर्तीला झाकून विविध प्रकारची पूजा करण्याची प्रथा आहे.
रात्री चंद्र उगवल्यावर 11 तुपाचे दिवे लावावेत.
अश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सकाळी उपवास करण्याचा सल्ला नारद पुराणात दिला आहे.
दूध आणि दुधाची खीर डब्यात साठवून चांदण्या रात्रीत ठेवावी लागते.
चंद्रप्रकाशात खीर देवी लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर सगळ्यांना प्रसाद म्हणून खीर द्यावी.
शरद पौर्णिमा च्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने पैशांची कमतरता भासणार नाही
28 ऑक्टोबर 2023, शनिवारी रोजी शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. आजच्या रात्री आई लक्ष्मी आपल्या भक्तांना शोधते. आजच्या दिवशी हे काही उपाय केल्यानं कधीच पैशांची कमतरता भासणार नाही, असं वैदिक शास्त्रात सांगितलेले दिसून येते.
पौर्णिमेच्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अखंड दीप तेवत ठेवा. लक्ष्मी देवी दीप स्वरूपात विराजमान आहे. अखंड दीपाच्या प्रकाशानं देवी धावत येईल.
शंखावर केशरानं स्वस्तिक बनवा.
ओम श्रीं ओम , ओम ह्रीं ओम महालक्ष्मये नम : हा मंत्र म्हणा.
लक्ष्मी मातेला अभिषेक करा आणि धूप, दीप, फुलानं पूजा करावी.
पौर्णिमेला लक्ष्मी सहस्त्रनाम, लक्ष्मी अष्टावली, सिद्धिलक्ष्मी कवच, श्रीसूक्त, लक्ष्मी सूक्त, महालक्ष्मी कवच, कनकधारा यासारखे पाठ केल्यानं लक्ष्मीची कृपा होईल.
पौर्णिमेला आवळ्याची पूजा केल्यानंही लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो. शरदाच्या चांदण्या रात्री आवळ्यातील औषधी गुण अधिक वाढतात.
गायीच्या दूधात महालक्ष्मीचा वास आहे, म्हणून ही खीर लक्ष्मीला खूप प्रिय आहे.
शरद पौर्णिमेला महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवावा.
कोजिगिरी पौर्णिमा २०२३ तारीख आणि वेळ (
कोजागिरी पौर्णिमा तारीख: 28 ऑक्टोबर 2023, शनिवार
कोजागिरी पूजा वेळ: रात्री 11:42 PM ते 12:30 AM , 29 ऑक्टोबर
कोजागिरी पूजेच्या दिवशी चंद्रोदय: संध्याकाळी 05:41
पौर्णिमा तिथीची सुरुवात: 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 04:17
पौर्णिमा तिथी समाप्ती: 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 01:53
उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी देवी येऊन को जागृती करते , म्हणजे च कोण जागत आहे. या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची व बळी राजाची पूजा करतात. या रात्री मंदिरे ,उद्याने , घरे, रस्ते इत्यादी ठिकाणी दिवे लावतात. लक्ष्मी व बळीराजाची पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी , देव पितरांना समर्पून व आप्तेष्टाना देऊन स्वतः सेवन करतात.
या रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेध दाखवतात. कोजागिरीला रस्ते स्वच्छ करावे. घरे सुशोभित करावीत, दिवसा उपवास करावा. आपल्या दारासमोर दिवा लावून पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवावा. ज्याच्याकडे गायी असतील त्यांनी गायी ची पूजा करावी. अश्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात.
कोजागिरी पौर्णिमा रात्री जागरण का करावे:
अश्विन महिन्यामध्ये पावसाळा संपण्यास सुरुवात होऊन थंडीचा हंगाम सुरू होतो. यावेळी दिवसा गरम वातावरण असते. आणि रात्री थंड वातावरण असते. अशा परिस्थितीमध्ये दूध प्यायल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. तसेच कोजागिरीचे थंड चांदणे शरीरावर घेतल्यामुळे मानसिक शांती, मानसिक शक्ती आणि चांगले आरोग्य लाभते. म्हणून देखील कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवली जाते. असे म्हटले जाते की, या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर येऊन को जागृती को जागृती असे म्हणते. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की, कोण जागे आहे का? त्यांच्या त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे का? लक्ष्मी मातेच्या आशीर्वादासाठी बरेच लोक या रात्री जागृत राहतात.(Kojagiri Purnima Marathi)
कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात:
कोजागिरी पौर्णिमा हे व्रत बरेच लोक पाळत असतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करतात. या पूजेनंतर रात्री आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखवला जातो. देव, पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते सर्वांसोबत स्वतः सेवन करावी. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे बळ देतात आणि ते दूध मग पितात. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते.(Kojagiri Purnima Marathi)
कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.
प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करताही या दिवसाला फारच जास्त महत्व आहे. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो.(Kojagiri Purnima Marathi)
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्व दिले जाते.
कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व
या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी आणि इंद्राची ही पूजा केली जाते. या दिवशी उपवास पूजा आणि प्रबोधन तसेच थोडासा आनंद हे देखील महत्त्वाचे आहे. या व्रतामध्ये लक्ष्मी आणि इंद्र बळीराजाच्या प्रतिमांची पूजा करतात. यानंतर पोहे आणि नारळाचे पाणी देवाला समर्पित करून त्यानंतर भक्तांमध्ये ते वाटले जाते. त्यानंतर चंद्राला दूध अर्पण केले जाते. (Kojagiri Purnima Marathi)
ब्रह्मपुराणात या दिवसाचे वर्णन वेगळ्या पद्धतीने केलेले आहे या दिवशी घर सजवली जातात. दिवसभर उपवास केला जातो. रस्ते स्वच्छ केले जातात. घराच्या दाराजवळ अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. चंद्राची पूजा केली जाते. आणि त्याला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणून या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेली आहे.
कोजागिरी पौर्णिमेचे सांस्कृतिक महत्त्व
केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, जायफळ, साखर यासारख्या वस्तू घालून मसाला दूध करतो. ते आपण या रात्री चंद्राला अर्पण करतो. पौर्णिमेची किरणे या दुधावर पडल्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून आपण हे दूध ग्रहण करतो. मध्यरात्रीपर्यंत जागरण करतो. या दिवशी विविध मंदिरांमध्ये पूजा करून कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस म्हणून साजरा करतो. ज्या दिवशी ती समुद्रमंथनातून प्रकट झाली होती. या रात्री चंद्र त्याच्या संपूर्ण 16 टप्प्यात आपल्याला दिसतो. या दिवशी त्याची किरणे विशेष अमृत गुणांनी संपन्न असतात.
कोजागिरी पौर्णिमेचे कृषी महत्व
शेतकऱ्यांच्या दृष्टीने या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. हा दिवस शेतकरी वर्गामध्ये उत्साहाने साजरा केला जातो. खास करून ग्रामीण भागात ही कोजागिरीची पौर्णिमेची प्रथा साजरी करताना आपल्याला दिसून येते. या दिवशी कुर्डूची फुले, नाचणी, वरी, झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. तसेच नवीन धान्य देखील या दिवशी घरात आणले जाते. या दिवशी धान्याची पूजा करून नवीन तांदळाचा भात आणि खीर बनवण्याची प्रथा देखील दिसून येते.
आरोग्यशास्त्रदृष्ट्या महत्त्व
दम किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्यावरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते. (Kojagiri Purnima Marathi)
पर्यटन
कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्यात आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची खास संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी विशेष दरही आकारला जातो. (Kojagiri Purnima Marathi)
आदिवासी जनजातीत महत्व
भारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते. मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी हे परंपरा आहे. (Kojagiri Purnima Marathi)
कोजागिरी पौर्णिमा विविध प्रांताद्वारे कशी साजरी करतात.
यादिवशी काही ठिकाणी नवविवाहित मुलीच्या घरातून तिच्या सासूला भेटवस्तू पाठवण्याची एक विशेष पद्धत प्रचलित आहे.
हरियाणामध्ये अश्विन पौर्णिमेच्या दिवशी दुधाची खीर बनवतो, रात्री चांदण्यात ठेवतो आणि सकाळी खातो.
गुजरातमध्ये कोजागरी पौर्णिमा ‘कोजागिरी पौर्णिमा‘ नावाने रास आणि गरबा खेळून साजरी केली जाते.
वैष्णव पंथाचे भक्त बनारसमध्ये हा दिवस साजरा करतात.
राजस्थानी महिला या दिवशी पांढरे कपडे आणि चांदीचे दागिने घालतात. धार्मिक राजपूत या रात्री चंद्राची पूजा करतात आणि शेतकऱ्यांना गोड दूध देतात.
मिथिलामध्ये कोजागडाची पूजा केली जाते.
हिमाचल प्रदेशात मेळावे भरतात.
बंगाली हिंदू लोक स्वस्तिक तांब्याच्या कलश किंवा मातीच्या भांड्यावर आणि मधल्या बोटाने आणि ओल्या लाल कशेरुका असलेल्या खांबावर काढले जातात.
ओडिशामध्ये कोजागिरी पौर्णिमेला ‘कुमार पौर्णिमा’ म्हणतात. या दिवशी देवी गजलक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी देवीसोबत चंद्र आणि सूर्याचीही पूजा केली जाते.
बंगाली लोक कोजागरी पौर्णिमेला ‘लोकी पूजा’ म्हणतात. बंगाली लोक या दिवसाच्या लोखी पूजेत शहाली किंवा ताजे नारळ वापरतात. या दिवशी कमळामध्ये विराजमान असलेल्या लक्ष्मीला नारळामध्ये साखर, दूध, तूप आणि ड्रायफ्रूट्स मिसळून बनवलेली खास मिठाई अर्पण केली जाते.