किशोरांचा मेंदू कसा विकसित होतो ( How the Adolescent brain develops )किशोरावस्थेचे परिणाम म्हणून मूला-मुलींचा शारीरिक विकास वैशिष्ट्यपूर्णरित्या होत असतो . विविध अवयवांच्या विकासाबरोबर किशोरांच्या मेंदूचा विकास होत असतो . किशोरांच्या मेंदूच्या विकासाविषयीचा अभ्यास अद्याप बाल्यावस्थेतच आहे , म्हणजे परिपूर्ण शास्त्रीय अभ्यास झालेला नाही . किशोरावस्थेमध्ये मेंदूमधील मज्जापेशींचे जाळे अधिकाधिक मजबूत व कार्यक्षम होत जाते .ज्या मार्गाचा वारंवार वापर केला जातो त्यातील मज्जापेशी कार्यक्षम होतात . याउलट ज्या मज्जापेशींच्या मार्गांचा वापर केला जात नाही त्या मज्जापेशी नाहीशा होतात .मेंदूच्या विकासातील तीन भागकॉर्टेक्स ( Cortex) : तीव्र भावना येथूनच निर्णय घेतले जातात . किशोरावस्थेच्या शेवटी या विभागाच्या विकासास सुरुवात होते
.कॉपर्स कलोसम ( Corpus Callosum ) : यामुळे मेंदूचे दोन्ही अर्धगोल जोडले जातात . माहितीची देवाणघेवाण येथूनच केली जाते . किशोरावस्थेमध्ये हा विभाग आकाराने जाड होतो .अमीग्डाला ( Amygdala) : या विभागातून क्रोध , राग या भावनांचा अनुभव घेतला जातो . या भागाचा विकास अन्य भागांच्या तुलनेत लवकर होतो .अधिक वाचा मानसोपचार म्हणजे काय ? त्याचा वापर कोण करू शकतो ? Psychotherapy – What is it ? who uses it ?एम . आर . आय ( M.R.I ) : या तंत्राद्वारे मेंदूचा सखोल अभ्यास केल्यानंतर संशोधकांना असे आढळून आले की , किशोरांच्या मेंदूमधील रचनेमध्ये महत्वाचे असे लक्षणीय बदल घडून येतात .
मेंदूच्या डाव्या भागातील व उजव्या भागातील मज्जारज्जू जेथे एकमेकांना छेदतात त्या कॉपर्स कलोसम या भागातील मज्जातंतू हे आकाराने जाड व मोठे बनतात . यातूनच माहितीची देवाणघेवाण परिणामकारकपणे केली जाते . याच कालखंडामध्ये मेंदूचा अग्रखंड विकसित होतो . व्यक्तीची विचारशक्ती , तर्कशक्ती , निर्णयशक्ती आणि स्व – नियंत्रण यांचा विकास गतिमान होतो . मेंदूच्या या भागाचा विकास वयाच्या 18 ते 25 वर्षापर्यंत चालू असतो.मानवाच्या भावभावनांचे निर्मिती स्थान म्हणून अमिग्डाला या भागाकडे पाहिले जाते . क्रोध-राग यांसारख्या भावनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी दृष्टीने हे केंद्र परिपक्व असावे लागते .
नेल्सन या संशोधकाच्या मते , किशोरांच्या मेंदुमध्ये जे नवनवीन बदल घडून येतात किंवा जो विकास घडून येतो त्यामध्ये ‘सामाजिक विकासाचे मज्जाशास्त्र ‘ विकसित होत असल्याचे आढळते . त्यामध्ये प्रामुख्याने मानवाचा मेंदू आणि सामाजिक-भावनिक प्रक्रियांचा समावेश आढळतो . किशोरांच्या भावनांचा विकास या काळात झालेला असतो . त्यांना वेगवेगळ्या भावनांचे अनुभव येत असतात . पान योग्य त्या वेळी भावनांवर नियंत्रण मिळविण्याचे कौशल्य मात्र मेंदूच्या अग्रखंडामध्ये विकसित झालेले नसते . तीव्र भावणानुभवावर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य विकसित झालेले नसते .किशोरांच्या लैंगिक विकासाचे स्वरूप ( Patterns of Adolescent Sexual Development )किशोरावस्था म्हणजे लैंगिक विकासाचा लैंगिक परिपक्वतेचा कालखंड होय असे मानले जाते . यादरम्यान किशोरांचा शारीरिक विकास पूर्ण होऊन लैंगिक विकासही अत्यंत झपाट्याने होतो . लैंगिक अवयवांचा विकास होऊन लैंगिक ग्रंथीचा विकास होतो . प्राथमिक – दुय्यम लैंगिक वैशिष्ट्ये दिसून येतात . स्वत:च्या लैंगिकतेविषयी विशिष्ट असे मत तयार होते . किशोरांच्या जसा ‘व्यक्ती -स्व ‘ असतो तसाच हा लैंगिक-स्व ‘ असतो .
स्वत:च्या लैंगिकतेची ती एक प्रकारची ओळख होय . या काळात स्वत:कडे पाहण्याची दृष्टी तर बदलतेच शिवाय पालकांकडे ही किशोरवयीन मुले वेगळ्या नजरेने पाहू लागतात . अधिक वाचा मानसशास्त्राची उद्दिष्टे सांगा ?किशोरवयीन मुळे केवळ समवयस्कांमध्ये मिसळतात . त्यांच्याभोवती समवयस्कांशिवाय कोणीही असत नाही . स्वत:सारख्याच समवयस्क मित्रांच्या सान्निध्यात ही मुले वावरत असतात . यातूनच विषमलिंगी मुला-मुलींशी संपर्क साधला जातो . त्यांच्या सहवासात आनंद मिळू लागतो . भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण निर्माण होते . विषमलिंगी मित्र-मैत्रिणीशी तासन् तास बोलत राहवे असे वाटते .
त्यांच्या सहवासाची वाट पहिली जाते . लैंगिक भावना व लैंगिक अकर्षणामुळे किशोरांचे सगळे जीवन चेतनामय झालेले आढळले .लैंगिकतेचा कोणताही स्पर्श नसलेले एक लहान मूल आणि शारीरिक-मानसिक-भावनिक पातळीवर लैंगिक वर्तन करणारा प्रौढ यामध्ये पुलासारखे काम करणारा कालखंड म्हणून किशोरवस्थेकडे पाहिले जाते , लैंगिकतेविषयक प्रचंड कुतूहल, भीती या काळात मुला-मुलींमध्ये दिसून येते . प्रत्यक्ष लैंगिक संबंध किंवा लैंगिक क्रिया याविषयी अज्ञान , गैरसमज व भीतीची भावनाही आढळून येते .
तसेच लैंगिकतेविषयक वेगवेगळे प्रयोग याच दरम्यान अनुभवले जातात . लैंगिकतेविषयीची पुस्तके , मासिके , चित्रे ब्ल्यु फिल्म्स , टेलिव्हिजन , इंटरनेट , फेसबूक इत्यादी माध्यमांद्वारे लैंगिक अनुभव व लैंगिक संभोग याविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जातो .पुरुष समलैंगिकता ( Gay ): या प्रकरांमध्ये किशोरवयीन मुले फक्त मुलांकडेच आकर्षिली जातात . भावनिकदृष्ट्या तसेच लैंगिकदृष्ट्या मुलांना मुलांचाच सहवास हवाहवासा वाटू लागतो . त्यांचे वर्तनही त्या दिशेने होत जाते . दोन मुलांमध्ये लैंगिक संबंध किंवा समलिंगी संभोग ( Homo Sexuality ) दिसून येतात . दोन पुरुष त्यांच्या पद्धतीने लैंगिक आनंद देऊ-घेऊ शकतात .
अधिक वाचा किशोरावस्था म्हणजे काय ? किशोरवस्थेतील शारीरिक बदल | What is Adolescence ?स्त्री समलैंगिकता (Lesbian ) : या प्रकारामध्ये किशोरवयीन मुली फक्त मुलींकडेच आकर्षिल्या जातात . भावनिकदृष्ट्या तसेच लैंगिकदृष्ट्या मुलींना मुलींचाच सहवास हवाहवासा वाटू लागतो . त्यांचे वर्तनही त्या दिशेने होत जाते . दोन मुलींमध्ये लैंगिक आकर्षण व लैंगिक संबंध दिसून येतात . दोन स्त्रिया त्यांच्या पद्धतीने परस्परांना लैंगिक आनंद देऊ – घेऊ शकतात .द्वि – लैंगिकता (Bisexuals) : काही किशोरवयीन मुले किंवा मुली किशोरावस्थेच्या टप्प्यामध्ये असताना किंवा किशोरवस्थेचा टप्पा ओलांडून गेल्यानंतर विषमलिंगी व्यक्तीकडेही आकर्षिल्या जातात व लैंगिक क्रियांचा आनंद घेताना-देताना समलिंगी आणि विषमलिंगी अशा दोन्ही प्रकारच्या लैंगिक संबंधाचा काही जण अनुभव घेतात . काही विवाहित पुरुष घरी पत्नीबरोबर लैंगिक संभोगाचा आनंद घेतात . तर बाहेर अन्य पुरुषाबरोबरही लैंगिक संभोग करतात . यालाच द्वि – लैंगिकता असे म्हणतात .