जिजाऊ भाषण 1
सन्माननीय,सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो. आज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती या जयंतीनिमित्त आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत त्यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगते ते तुम्ही शांततेने ऐकावे.
जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नी शंभूछावा….!
जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्य ठेवा…..!
जिजाऊ तुम्ही नसता तर, नुसते लढले मावळे…..!
जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे…..!
राजमाता, स्वराज्यजननी माँसाहेब जिजाऊ यांच्या कार्याची माहिती नसलेला एकही माणूस आज आढळणार नाही. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले.
आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, प्रेरणा, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम असतो. आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब. माँसाहेबांचा उल्लेख करताना कोणत्याही संदर्भाची गरज नाही.
या शूर पराक्रमी जिजामाता (राजमाता जिजाऊ) यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.
शहाजीराजे भोसले हे वेरूळ येथील मालोजी भोसले यांचे पुत्र होते. जिजाबाईंचा विवाह शहाजीराजांसोबत डिसेंबर १६०५ मध्ये दौलताबाद येथे झाला.
त्या काळात महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय बिकट होती, कारण निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या युद्धामुळे लोक भयभीत होते. या जुलमी सत्तांच्या विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत कोणालाही नव्हती. जिजामाता नेहमीच रयतेला या जुलूमी सत्तांपासून मुक्त करावे असे स्वप्न पाहत होत्या. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी पराक्रमी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या पतीचे स्वराज्याचे स्वप्न पुत्र शिवबाच्या मनात रुजवले. नुसते रुजवलेच नाही, तर सुसंस्कारांच्या अमृतसिंचनाने ते स्वप्न फुलवले, वाढवले, आणि त्याचे रक्षण केले. त्याला नवनवी पानं फुलं दिली, ज्यामुळे ते स्वप्न सत्यात उतरले.
राजमाता जिजाऊसाहेब यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, संघटन कौशल्य आणि पराक्रमाचे बाळकडू पाजले. प्रत्येक पराक्रमी पुरुषाचे जीवनाचे ध्येय एकच असते, ते म्हणजे पारतंत्र्यात असलेल्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे, अशी शिकवण जिजाऊसाहेबांनी शिवरायांना दिली होती.
शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना, शहाजीराजांनी त्यांच्याकडे पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच, जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.
कुशल अधिकाऱ्यांसह जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. उद्ध्वस्त झालेले पुणे पुन्हा वसवून, त्याला नावलौकिक मिळवून देण्यात जिजाबाईंचा मोठा वाटा होता. जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाऊसाहेबांनी फक्त गोष्टीच सांगितल्या नाहीत, तर शिवरायांना राजकारणाचे पहिले धडेही दिले.
राजमाता जिजाऊ यांच्या शिकवणी आणि संस्कारांच्या बळावर छत्रपती शिवरायांनी हजार वर्षांची गुलामगिरी मोडून काढली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार केले.
स्वराज्याच्या कार्यात शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या, जीव धोक्यात घालावा लागला. पुत्राचा दररोज मृत्यूशी चाललेला संघर्ष उघड्या डोळ्यांनी पाहूनही, सैरभैर न होता आणि चिंतेची साधी रेघही चेहऱ्यावर उमटू न देता, त्यांनी खंबीरपणे स्वराज्याची निगराणी केली.
एवढेच नव्हे तर, राजमाता जिजाऊ आजी झाल्यावरही निवृत्तांसारखे न बसता, नातू शंभूराजांच्या मनातही अंत:करणाची पेरणी करून स्वराज्याभिमानाचे स्फुल्लिंग चेतविले. तीन पिढ्यांना स्वराज्याच्या ध्यासाने प्रेरित करणारी अशी महान राजमाता होती.
राजमाता जिजाऊ म्हटले की पुरे! नुसते राजमाता म्हटले तरी ओठांवर आपोआप जिजाऊ हा शब्द येतो. राजमाता आणि जिजाऊ हे शब्द म्हणजे जणू एका नाण्याच्या दोन बाजूच आहेत! स्वराज्य निर्मात्या या राजमातेला, आज त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.
रयतेसाठी लढ पोरा, रयतेसाठी लढ पोरा,
असत्या आईचा आवर्त होता, ती आई म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ.
दगडालाही फुटेल पाझर,
शब्दांमध्ये तेवढा प्रभाव पाहिजे,
दगडालाही फुटेल पाझर,
शब्दांमध्ये तेवढा प्रभाव पाहिजे,
पुन्हा या महाराष्ट्राला,
जिजाऊंच्याच विचारांचा लढा पाहिजे,
जिजाऊंच्याच विचारांचा लढा पाहिजे,
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जिजाऊ, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. धन्यवाद.
जिजाऊ भाषण 2
Jijamata Information In Marathi Speech : आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. यानिमित्ताने मी आपल्यासमोर माझे विचार मांडत आहे, तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत, हीच माझी विनंती. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. तिथीनुसार, पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते. लहानपणापासूनच शिवबांना रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा सांगून जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना दिले होते.
राजमाता जिजाऊ यांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. जिजाऊंना दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे चार भाऊ होते. त्यांचा विवाह पुण्याच्या शहाजीराजे यांच्याशी झाला होता. जिजाऊंना अनेक संकटांचा सामना करावा लागला. लहानपणापासूनच त्यांनी शिवबांना रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या आणि आपल्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांना युद्धकला शिकवली.
गरीब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य निर्माण करावे ही राजमाता जिजाऊंची इच्छा होती. १७ जून १६७४ रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांचा आदिशक्तीच्या रूपात उल्लेख केला जातो. माँसाहेबांचा उल्लेख करताना कोणत्याही संदर्भाची आवश्यकता नसते. अशा या माँसाहेब राजमाता जिजाऊंना माझे शतशः नमन.
“मुजरा माझा माता जिजाऊंना,
जिने घडविले शुर शिवबाला.
साक्षात होती ती आई भवानी,
जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी!”
जिजाऊ भाषण 3
Jijamata Speech In Marathi : नमस्कार मित्रांनो, आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण राजमाता जिजाऊ याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते.
लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयातच तलवार आणि ढाल हातात घेऊन युद्धकौशल्य शिकले. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा सांगून त्यांनी तलवारबाजी आणि युद्धकौशल्य शिकविले. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते, त्यामुळे जिजाऊ मातेने बघितलेले स्वप्न शिवरायांनी सत्यात उतरविले.
राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. त्यांनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण आणि महाभारताचे संस्कार रुजवले. १७ जून १६७४ रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली. त्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न फक्त बघितलेच नाही तर ते सत्यातही उतरविले. माँसाहेब राजमाता जिजाऊंना माझे शतशः नमन.
तर हे होते राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठीमध्ये. तुम्ही आपल्या Jijamata Speech In Marathi 2024 मध्ये या भाषणाचा उपयोग करू शकता. तुम्हाला राजमाता जिजाऊ (Jijamata Speech In Marathi) भाषण कसे वाटले, ते कळवण्यासाठी खाली कमेंट करा.