६. जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रुसंगे

युद्ध आमुचे सुरू

जिंकू किंवा मरू

लढतिल सैनिक, लढू नागरिक

लढतिल महिला, लढतिल बालक

शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा

शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर

मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या–पिढ्या हे चालो संगर

अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू

Leave a Comment

error: Content is protected !!