हा खेळ सावल्यांचा ( अंतिम भाग-४ )

सिमा रडत रडत घराबाहेर पडली … कुठे जाव काय कराव तिला काहिच कळत नव्हत … ति मनोमन देवाच्या धावा करत होती … आजची रात्र गावच्या शंकर मंदिरात घालवायची असे तिने ठरवले… तिथे आपन सुरक्षितही राहु आणी थोडा आसरा हि मिळेल … सिमा जड पावलांनी डोळ्यात पाणी आणत हळु हळु चालत मंदिराच्या दिशेने निघाली …सांजवेळ होत आली …

सिमा मंदिराच्या गाभार्‍यात पोचली आपल गाठोड टाकल आणी रडत बसली … “महादेवा काय हे माझा पदरात पडल…. तुझी रोज आराधना करते आणी माझा वर आलेल्या संकटाच्या वेळी तु कुठे गेलास ….? ये आपल्या भक्तासाठी धाउन आणि माझ्या कुटुंबाच रक्षण कर बोलत सिमाने महादेवाचे पाय धरले … महादेवांच्या पायावर सिमाचे अश्रु अोघळले ..
‍ईकडे कामिनिची लिला चालु झाली
“आता तुम्ही फक्त माझे आहात आपल्या मधे कोणिच
नाही … कामिनी कमलेश ला बिलगली कमलेश ला घट्ट आलिंगन दिल ….कमलेश च काळीज जोर जोरात धडकत होत … “थांबा तुम्ही दमला असाल ना मि तुमच्या साठी काहितरी खायला बनवते … कामिनिने कमलेश ला मिठितुन वेगळ करत जेवणाची तयारी करायला निघुन गेली….
कमलेश विचारात गढला‍ कशी सुटका करु मि स्वताची याचा विचार करु लागला …

ईथे सिमा मंदिरात महादेवांसमोर रडत बसली होती अचानक ऐक हात तिच्या खांद्यावर पडला .. तिने मागे वळुन पाहिले … तिच्या समोर ऐक सिद्ध पुरुष उभे होते कपाऴावर भस्म लावलेल लांब जटा विलक्षण तेज होत … उंच धिप्पाड देह निळशार शरिर हातात कमंडऴु त्रिशुळ हातात खांद्याला झोऴी कमरेला शंख असा अवतार पाहुन सिमा जरा घाबरली .. त्या सिद्ध पुरुषाने तिच्या डोक्यावर हात ठेवला “रडु नकोस बाळा तुझी काय व्यथा आहे मला सविस्तर सांग .. मि तुझी मदत करेन
सिमा ला धिर आला तिने झालेली सर्व हकिकत त्या सिद्ध पुरुषाला सांगितली .. तो साधु ध्यानस्थ झाला डोळे मिटुन अंतरज्ञानाने त्याने सरव पाहिल …

त्या साधुने आपले डोळे उघडले … मुली मला सरव कळलय …पुर्व जन्मातिल ही सुंदर स्त्री एक पिशाच्य आहे …

…आपल्या तंत्र-मंत्र साधनेतुन तिने हा सुंदर देह धारण केला तिची ईच्छा होती कि ति कधिच जिर्ण होउ नये … तिने सिद्धी प्राप्त केली… ति हा देह तर धारण करु शकते पण ति स्वताच आयुष्य वाढउ शकत नाहि …या वर तिने अघोरी उपाय केला .. नवजात शिशु भक्षण करुन तंत्र मंत्रा आणी दुष्ट शक्तिंच्या जोरावर ति आपल आयुष्य वाढवत राहिली … ति आपल मुल हि सोडत नाही ..या साठी ति आपला जिवन साथी शोधते .. एक प्राण तिच एक शत आयुष्य वाढवतो … याच प्रमाणे तिने किति तरी निष्पाप प्राणांची आहुती दिलिय …
ति शापित जिवन जगत आहे पण तिला तेच मान्य आहे तिच्या ईच्छे नुसार सुंदरता हेच तिच आयुष्य आहे… फारच कमी काळ ति संसारात रमते आणी जो कोणि तिच्याशी विवाह करेल त्याला सुख ऐश्वर्य प्राप्त करुन देते ..पण अपत्य होई परयंतच मग ति ते घर सोडते कायमच … ति नेहमी अर्भकांच्या शोधात असते … अशाच घरात प्रवेश मिळवते
तु तिच्या गाठोड्यात जितक्या कवट्या पाहिल्यास तितक एक शत म्हणजे माणसाची शंभर वर्षे …ति प्रतेक प्राणाच आयुष्य जगलिय .. तिच शरिर अतिशय कामनिय आणी वाणी मधापेक्षा ही गोड अाहे… तिला कोणीही सहज वश होतो मोहिनी तसेच अनेक विद्या सिद्धी तिला अवगत आहेत .. ति कधिच थकत नाही आणि हि कुठेहि मनोवेगे प्रयाण करु शकते…

सिमा हे ऐकुन थक्क झाली तिने त्या साधुला विचारल

“बाबा माझा पति हि तिला वश झाला आहे का …? त्या साधुने सिमा कडे पाहिल
” मुली तुझा नवरा तुझ्यावर मनापासुन खुप प्रेम करतो याच प्रेमाच्या शक्ती पुढे तिच मोहन हि कमी पडल ..
तुझा नवरा निर्दोष आहे हे सरव त्या पिशाच्या चा ईशार्‍यावर होत आहे ….
“मला यातुन तुम्हिच काहि उपाय सांगा आनि माझ्या पतिला यातुन वाचवा ….. सिमाने रडायला सुरवात केली
“मि चुकले धनी मि तुमच्यावर अविश्वास केला… मि खरच चुकले मला माफ करा … सिमा ला उपरती झाली ..

साधुने तिला धिर देत तिचा हात पकडला आणी मंदिराच्या आवारात नेल आपल्या गाठोड्यातुन त्याने एक लहान त्रिशुळ काढला …
सिमा त्या त्रिशुळा कडे पाहत राहिली ते खुप दिव्य होत .. त्यावर ऐक निळा मणी होता त्याच खुप तेज होत ते छोट त्रिशुळ सिमाच्या हातात देउन तिला सांगितल …
“आता तिच्या मुक्ति ची व्यवस्था मि केलीय तु हे त्रिशुळ वस्त्रात गुंडाळुन आपल्या पतिला दे … या त्रिशुळाच तेज त्या पिशाच्याला दिसु नये या साठी …तिचा प्राण तिच्या कंठात आहे तिथेच वार करायचा .. हे त्रिशुळ तिच्या देहात प्रवेश केल्याने तिच सामर्थ नष्ट होईल आणी ति जागिच पडुन राहिल पन लक्षात ठेव … तिच ते शरिर तेव्हाच जाळुन भस्म कर तेव्हाच तिच अस्तित्व नष्ट होईल ….
“मिच आताच जाते आणी आताच त्या दुष्टेचा अंत करते … सिमा रागाने पेटली … साधुने धिर देत सिमाला सांगितले की ” हे काम फक्त तिचा पतिच करु शकतो तेव्हाच तिला सुवाशीण म्हणुन मरण येयिल पतिच्या पुण्याईने तिला मुक्ति मिळेल अशिच याची रचना आहे … तिच्या सोबत असलेल्या अस्थी देखिल भस्म होतिल ति परत जन्म घेउ शकणार नाही .

साधुने सिमा ला आशिर्वाद देण्यासाठी हात वर केला सिमा ने डोळे बंद करुन हात जोडले.. डोळे उघडताच अचानक साधु अदृश झाला सिमा गोंधळली … जोराचा वारा वाहु लागला सिमा ने त्रिशुळा कडे पाहिल आणि हे महादेवच साक्षात अाल्याची तिला खात्री झाली … ति मंदिरा तुन निघणार ईतक्यात लांबुन कमलेश धावत पळत येताना दिसला … सिमा ला आनंद झाला
धनि …… धनि … जोर जोरात अोरडत ति कमलेश कडे पाहात होती डोळ्यात आनंद होता … कमलेश धावत तिच्या जवळ आला त्याने आपल्या पत्निला जवळ घेतले ….तो जोर जोरात धापा टाकत होता …
“मला माफ कर सिमा मि तुजाशी खुप वाईट वागलो… “नाहि धनी मिच तुमच्यावर संक्षय घेतला मलाच माफ करा मि तुमची अपराधी आहे सिमा रडत होती “पर तुम्हि हित कसे तिने कस सोडल तुम्हाला … सिमाने स्वताला सावरल… आनी ते सिद्ध त्रिशुळ कमलेश च्या हातात देत सांगितल धनी वेळ खुप कमी आहे जेवड मि सांगते ते ऐका… या त्रिशुळाने त्या कामिनिच्या गळ्यावर वार करा ति संपुन जाईल तिथच …सिमा त्वेशाने बोलत होती
“अग सिमा पन हे तुला कस माहित कि ति एक पिशाच्य आहे ..” ति सर्व महादेवाची कृपा ते नंतर सांगते आधि तुम्हि जा गोड बोलुन संधि साधा … आणि सुखरुप बाहेर पडा बाकि मि बघते त्या बयेच काय करायच ते …
“सिमा या पेक्षा आपन आताच हे गाव सोडुन निघुन गेलो तर …???

नाही तिने खुप निष्पापांचा बळी घेतलाय … हे थांबवायची जवाबदारी महादेवांनी खुद्द आपल्यावर दिलिय आणी तुम्ही पळता … !!
कमलेशला सिमाच बोलण काहिच कळत नव्हत … पण तिच्यावर विश्वास ठेउन तो तिच्या म्हणण्या प्रमाणे वागायला तयार झाला …
“जा धनी तुम्ही मि मागुन येते हा त्रिशुळ संभाळुन न्या माझा तुमच्या वर विश्वास आहे …
कमलेश आपल्या वस्त्रात ते त्रिशुळ लपउन घराच्या दिशेने धावत निघाला … अंगणात पोहचताच कामिनी त्याच्या कडे बघत उभी होती
“कुठे होता ईतका वेळ न सांगता कुठे पऴुन गेलात… कमलेश खुप घाबरला आता हिला सरव कळेल आणी आपला पितळ उघड पडेल याची भिति त्याच्या मनात होती पन घाबरुन उपयोग नव्हता .. चेहर्‍यावर कोणतेच भाव येउ न देता तो तिच्या समोर उभा राहिला
“काय हो धनी सिमाला भेटायला गेलेलात ना मग भेटली का तुमची बायको ??? कामिनी जोर जोरात हसायला लागली
हिला आता काय उत्तर द्यायच या विचारात असतानाच ति स्वताच उत्तरली
” आता परयंत ति गाव सोडुन पण गेली असेल बर झाल तुम्ही परत आलात नाहितर तुमची खैर नव्हती …!! कामिनीचे स्वर बदलले … कमलेश मान खाली घालुन काहिच घडले नाहि अशा वेशात उभा होता
“चला धनी हात पाय धुउन घ्याना आजुन आपलि बरिचssशी काम बाकी आहेत नेहमिच्या खोडकर अंदाजात बोलत होती … कमलेश शांत होता कामिनिने पंच पक्वांन्न त्याला जेउ घातले कमलेश तृप्त झाला ..
“कसा वाटला स्वयंपाक ताईं पेक्षा तरि खुप छान होता ना कामिनी हसायला लागली … जेवण झाली बाकिची काम उरकुन कामिनिने कमलेशला आणी तिला झोपण्यासाठी अंथरुन घातले एक कंदिल बाजुला पेटत ठेवला
“या धनी आज आपलाच दिवस… नाहि नाही आपलिच रात्र आहे ___कामीनी स्मित हास्य करत होती .. आज फक्त तुम्ही आनी मि आपल्यात कोणिच नाही ..थकला असाल ना या विश्रांती करा तुमचा थकवा मी दुर करते… कामिनी हसली कमलेश ने आपल्या कमरेत त्रिशुळ वस्त्रात लपवले होते .. कमलेश च्या चेहर्‍यावर उदासी होती
“ताईंची आठवण येतेय का ??? कामिनिने कमलेश ला विचारले …

कमलेश शांत होता … कमलेश ने अंथरुणावर शरिर टेकले आणी तो विसावला कमिनी त्याच्या बाजुला येउन झोपली …
कामिनिने कमलेशच्या अंगावर हात ठेवला आणी त्याच्या चेहर्‍याला निहारु लागली कमलेश च्या डोळ्यात आपल ध्येय होत आणी कामिनिच्या डोळ्यात वासना .. कामिनि कमलेश च्या जवळ येउ लागली तस कमलेश ने ते वस्त्रात गुंडाळलेल त्रिशुळ एका हाताने कामिनिच्या नकळत उशाखाली ठेवल कंदिलाचा प्रकाश मंद केला …कामिनी आता आपल्या रंगात आली …कमलेशच्या गालाचे चुंबन घेत त्याला आपल्या जवळ अोढल .. कमलेश वर ति बेफाम होउन प्रेम व्यक्त करत होती ..पन कमलेश काहिच प्रतिसाद देत नव्हता ..मग अचानक कमलेश ने कामिनिवर आपला ताबा घेतला तोही कामिनीवर प्रेम व्यक्त करु लागला … कामिनीच्या गालावरुन गळ्यावर चुंबन दिले कामिनी बेधुंद झाली आणि तिने तिचे डोळे मिटले मान वर केली हिच संधी साधत वार्‍याच्या वेगाने कमलेश ने उशाखालच त्रिशुळ काढुन तिच्या गळ्याचा वेध घेतला ” “मला माफ कर कामिनि …!! रक्ताची कारंजी कमलेश च्या चेहर्‍यावर उडाली …. आहssssssssssss कमिनि वेदनेने विव्हळली त्रिशुळाने कामिनिचा कंठ चिरला कामिनी च्या गळ्यातुन भळा भळा रक्त वाहु लागल असह्य वेदनेने ति तडफडत होती …. आता तिच्या तोंडातुन शब्द ही फुटत नव्हता … तिच्या सिद्धी फोल झाल्या … सामर्थ शुन्य झाले …. साधुच्या सांगण्या प्रमाणे ति जागच्या जागिच खिऴली …कामिनी एकटक कमलेश कडे सताड डोळ्यानी पाहात होती .. कमलेश चे डोळे भरुन आले
” मला माफ कर कामिनी …कमलेश ने मायेने तिच्या कपाळावरुन हात फिरवला … !!! कामिनी आता जणु गतप्राण झाली … तिचे डोळे कमलेश ने झाकले … कमलेश तसाच उठला आणी घरा बाहेर आला …
घरा बाहेर पाहतो तर सिमा उभि होती … तिच्या हातात मशाल होती तिच्या सोबत तिने गावकर्‍याना देखिल आणल होत कमलेश बाहेर आल्यावर ते घर सिमाने गावकर्‍यांचा सहाय्याने पेटवल …
आग डोंब उसळला नउ वेळा विस्पोट झाले .. अंधार्‍या रात्री आकाशात तेजस्वी प्रकाश दिसु लागला ‍आगिचा एक गोळा आकाशातील दिव्य प्रकाशात विलिन झाला… कामिनिचे अस्तित्व कायमचे संपले ….

गावकरी अोम नम:शिवाय चा मंत्रोच्चार करुन या घटणेला साक्षी झाले ….
सिमा ने सिद्ध पुरुषाची सरव हकिकत कमलेश ला सांगितली हि महादेवांचिच कृपा असल्याचे दोघांनी मान्य केले ..
पहाट झाली नविन दिवस उजाडला
कमलेश आणी सिमा ने पुन्हा नविन संसार थाटला … काहि महिन्यातच सिमाला कन्या रत्नाची प्राप्ती झाली … दोघही सुखाचा संसार करु लागले ..
आज प्रेमाची शक्ती जिंकली जगात कोणतिही गोष्ट नित्य नसते हे सिद्ध झाले ..

🙏 समाप्त 🙏

श्री
मंगेश पांडुरंग घाडीगावकर

Leave a Comment

error: Content is protected !!