हा खेळ सावल्यांचा (भाग -३)


सकाळ झाली कमलेशला जाग आली … आपली बायको सुरक्षित असल्याची खात्री करुन घेण्या साठी तो सिमा ला शोधु लागला पन घरात सिमा नव्हती आणी कामिनी देखील…. मनात शंका घेत तो कासाविस झाला काळजाचे ठोके वाढु लागले …
कमलेश बाहेर आला अंगणात पाहु लागला पन तिथेही नाही ….घरा बाजुच्या बागेत गेला तिथेही नाही …मग विहिरि जवळ गेला कुठेच नाही … त्याने मनात आशंका घेत विहिरित वाकुन बघितल आणी मान डोलवत सुटकेचा दिर्घ श्वास घेतला …
त्याने दुरवर नजर फिरवली तेव्हा त्याला नदि किनारी सिमा आणी कामिनि दोघी दिसल्या … दोघी हसत खेळत बोलत होत्या कामिनी सिमाचा हात पकडुन सावकाश चालत होती .. कमलेश धावतच सिमा कडे गेला
“तुला सांगुन जाता येत नाहि का …माझी काय अवस्था झाली बघतेस का ..?

सिमा हसली “अहो हिने ने सकाळीच उठवल मला जरा ताज्या हवेत पाय मोकळे केले …! तुम्ही झोपला होतात गाढ अगदि म काय करणार ….?

“ठिक आहे चल घरी…. कमलेश ने सिमाचा हात धरला .. कामिनी कमलेश कडे पाहुन हसली कमलेश ने नजर चोरत वाट धरली …

तिघ घरी पोचले .. कामिनिने कोरा चाय करुन सिमा ला दिला … कमलेश ने घाबरत घाबरतच तिच्या हातुन कप घेतला … “अहो ईतका हात कसा थरथरतोय ..? सिमा ने हसत विचारल कामिनिने गालात स्मित हास्य केल … लाजताय का कामिनिला .. माझी बहीणच आहे ति खुप सांभांळते मला .. एक काम करु देत नाहि नाहि…. कमलेश शांत पणे चहा पिउ लागला कामिनिच्या प्रतेक गोष्टीवर आता त्याला संशय येत होता … यात विष तर नाहि कमलेश च्या मनात आले आनी काळजात धस्स झाल तसाच उठुन तो अंगणात गेला आनी कोणाच्या नकळत त्याने चहा अोतुन टाकला आणी वळला तर समोर कामिनि उभी … कमलेश दचकला कामिनी खट्याळ नजरेने त्याच्या कडे बघत होती … कमलेश तिथुन निघु लागला तस कामिनिने हाताने त्याचा रस्ता अडवला …
” धनी अहो काय हे? मि तुमचा जिव घेईन अस वाटल का तुम्हाला …. ? कामिनी कमलेश च्या जवळ येउ लागली
कमलेश मागे फिरला … कमलेश ला मागे मागे नेत एका झाडा पाशी नेल कमलेश च्या खुप जवळ येत कामिनी त्याचा चेहरा निहारात होती ….कमलेश च्या काळजाचे ठोके वाढले …
कामिनिने कमलेश चा हात हातात घेतला कमलेश अक्षरछा कापत होता …

“कराल माजाशी लग्न …. मला आपली बायको म्हणुन स्विकार कराल …..? कमलेश भितिने काहिच बोलत नव्हता …इतक्यात कामिनने तिच अक्राळ विक्राळ रुप धारण केल ति आता विद्रुप आणी कुजलेली होति घाण दुर्रघंध पसरला तिचे डोऴे लाल..लाल झाले जणु त्यातुन आगच निघत होती जळते निखारे .. धार धार सुळे ….लांब कानाची ..मोठी जिभ तिला बघण देखिल शक्य नव्हत कमलेश प्रचंड घाबरला ….
“तुम्हाला करावच लागेल लग्न माजाशी नाहितर मि कोणालाच सोडणार नाही … ते पिशाच्य जोर जोरात बोलत होत कमलेश ला घाम फुटला …
“वचन द्या मला…..!
कमलेश थंड पडला हातपाय सुन्न झाले

पिशाच्याने आपला आकार वाढवला … शेवटी कमलेश ने हात जोडुन विनवणी केली “मि करेन तुजाशी लग्न पन तु सिमा आणी माजा बाळाला सोड … ! त्यांच्या जिवाच बर वाईट करु नकोस … हव असेल तर माझा जिव घे …!
ते पिशाच्य शांत झाल हळु हळु मुळ रुपात परतल .. कमलेश समोर विस्पोट झाला आनी धुरात कामिनी प्रकटली .. कमलेश च्या जिवात जिव आला
कामिनी कमलेश कडे बघुन जोर जोरात हसायला लागली आणी खोडकर पणे कमलेश ला बोलली “चला धनी घरी जाउया ताई वाट बघत असतिल …
“आता जस मला हव तसच तु वाग समजल …. कामिनिचा आवाज बदलला आणी क्रुर पणे ति कमलेश कमलेश ला पाहु लागली …
कामिनिने कमलेश चा हात हातात पकडला आणी ती जंगला च्या दिशेने चालु लागली … एका अोसाड भागावर गेल्यावर ति क्षणभर थांबली …. “कराल माझाशी लग्न आता ईथे …. कमलेश गोंधळला तिने स्वताच्या गळ्यातल मंगळसुत्र काढल आनी कमलेश च्या हातात दिल … तिथे पडलेल्या लाकडाच्या अोंडक्याला आपल्या नजरेने पेटवल क्षणात तिथे अग्नी प्रज्वलित झाला ..” च
ला या अाता आपण हे फेरे पुर्ण करुन आपल्या नविन नात्याला सुरवात करु … आज पासुन तुमच्या नावाच मि मंगळसुत्र घालेन धनी … कामिनी हसली…. फेरे पुर्ण झाले कमलेश ने ते मंगळसुत्र कामिनिच्या गळ्यात बांधले
” आज पासुन या अग्निला साक्षी मानुन तुला मि आपली पत्नी म्हणुन स्विकार करत आहे …. कमलेश ने कामिनिकडे पाहिल …कामिनीने कमलेश चा हात हातात घेत त्याच्या अंगठ्याचा चावा घेतला ….
आह ..sssssssss काय करतेस हे ???कमलेश वेदनेने विव्हळला कमलेश च्या अंगठ्यातुन रक्त वाहु लागले कामिनिने त्याचा अंगठा पकडुन रक्ताने आपल कपाळ भरल….
कमलेश आता गंभिर होता … सिमा आणी त्याच्या बाळा बद्दल विचार करुन त्याचे डोळे पाणावले …
कमलेश कामिनि बरोबर घरच्या दिशेने चालु लागला

सिमा ला काय उत्तर द्यायच याची घोर चिंता त्याच्या मनात होती सिमला हे सहन होणार नाही ..अशात ति गर्भवती आहे हा मानसिक धक्का ति कसा सहन करणार …??? कमलेश मनोमन देवाच्या धावा करत होता या संकटातुन तुच काहि मार्ग दाखव …! तो अगदि रडकुंडिला आला होता होता ….

सिमा घराच्या दारत उभी होती दुपारची वेळ होती … लांबुन कामिनी आणी कमलेश ला येताना पाहिल …सिमाच्या चेहर्‍यावर हसु होत पण जस जसे ते जवळ येउ लागले तस तस तिच्या चेहर्‍याचे रंग बदलले
सिमाने जे पाहत होती त्यावर तिचा विश्वासच नव्हता कमलेश आणी कामिनी आता सिमा समोर अंगणात उभी होती … कमलेश ने कामिनिचा हात हातात धरला होता कामिनी च कपाळ रक्ताने माखल होत
क्षणभर ति स्तब्द झाली मनात आता नकोते येउ लागल होत …ईतक्यात कमलेश ने सिमाला कडे न पहाताच बोलला

“सिमा मि कामिनिशी लग्न केलय …आता ति या घरात तुझा सारखी माझी पत्नी म्हणुन राहिल … सिमाला विश्वासच बसेना ति निशब्द झाली तिच डोकच काम करत नव्हत … सिमाच्या भावनांचा हळु हळु बांध फुटत आला आणी तिला रडु कोसळले
“धनि तुम्ही माझा विश्वास घात केलात …तुमच्या भोळेपणाचे मि गोडवे गायले.. मला स्वप्नात देखिल वाटल नव्हत कि तुम्ही अस कधी वागाल माजाशी … बोला हे खोट आहे आहे …. काय कमी होति माझ्या प्रेमात जे हिला तुम्ही भुललात।… मला काय माहित होत की मि स्वताच्या सवतिलाच घरात बाळगली आहे…. का केलात हे तुम्ही माझा नाहि तर माझ्या होणार्‍या बाळाचा तरी विचार करायचा ….
आणी तु ग रंभे काय जादु केलीस माझ्या नवर्‍यावर कि तुला भुलला तो …तुला बहिण मानल आनी तु बहिणिच च घर उजाडायला निघालीस …. सिम‍‍ाने आकांत केला रडुन रडून तिला भोवळ आली तिचे डोळे मिटले ति तोल जाउन पडणार ईतक्यात कामीनि चा हात लांबच लांब झाला आणी तिने तिच्या पासुन दुर असलेल्या सिमाला अलगत झेलुन जमिनिवर ठेवले … कामिनी जोर जोरात हसु लागली … कामिनेिच सामर्थ बघुन कमलेश हक्का बक्का झाला ….
“का तु माझ्या संसारात आलिस मि तुझ काय वाकड केल होत ???तुला रहायला दिल आसरा दिला आणी तु माझ्या वाईटावर ऊठलिस कमलेश ला रडु कोसळल
कामीनी ने कमेलश कडे पाहिल
“धनी आता बस कराना का रडताय आता आपल्या बाळाचा पन विचार कराना ..कामिनि खट्याळ पणे कमलेश ला बोलत होती… “मला माझ बाळ द्या मि ईथुन आणी तुमच्या आयुष्यातुन ही निघुन जाईन … कमलेश धावत गेला आनी सिमाच्या तोंडावर पाणी शिंपडुन तिला जाग केल …

सिमा ने कमलेश ला झटकल “दुर व्हा माझ्या पासुन माझ्या अंगाला पन हात लाउ नका … सिमा चा राग अनावर झाला … सिमा लगेच ऊठुन बसली आणी दोघांकडे रागाने बघत घरात गेली
सिमा ऐकुन तर घे ..कमलेश जागिच उभा होता
मला काहिच ऐकुन घ्यायच नाहि मि चालले हे घर सोडुन तुम्ही आता मिळुन सुखाचा संसार करा सिमा रडत रडत आकांत करत होती
कामिनी केसाची बट बोटानि गुंडाळत हसत हसत सिमा कडे पाहात होती “माझाच नाण खोट निघाल तर लोकांना काय बोलु सिमा थांबत नव्हती कमलेश तिला ईशार्याने सांगण्याचा प्रयत्न करत होता पन कामिनिने त्याला मान डोलाउन मज्जाव केला .. सिमा आपल सामान गोळा करत होती ईतक्यात तिला कामिनिने आणलेल गाठोड दिसल … तिने ते आजु बाजुला कोणी नाहि याची खात्री करत हळुच उघडले
सिमा दंग झाली तिचे डोळे पांढरे पडले तिच्या गाठोड्यातले ते सरव पाहुन सिमा पुट पुटलि आता लवकरच भेटु ….


सिमा थोडि कापड घेउन बाहेर पडली तिने रागाने कामिनि कडे पाहिल कामिनी ने गालात स्मित हास्य केल कमलेश तिला थांबवायला जाणार ईतक्यात कामिनिने त्याचा हात धरला ….कमलेश भावना विवश झाला सिमाने मागे वऴुन कमलेश कडे पाहिल आणी तिच्या डोळ्यातुन आसव आली “धनी हा एकच शब्द काढत तिने घर सोडल ….
आता सर्वत्र भयाण शांतता झाली ..

क्रमश …

Leave a Comment

error: Content is protected !!