एकवीरा देवी आरती



आरती एकवीरा | देवी देई मज वरा ।
शरण मी तूजलागी| देई दर्शन पामरा | आरती एकवीरा || धृ.||



कार्ला गडी वास तुझा | भक्त सह्याद्रीच्या पायीं||
कृपा दृष्टीने पाहोनी| सांभाळिसी लवलाही|| १ || आरती एकवीरा |



चैत्राच्या शुद्ध पक्षी | जेव्हा उत्सव तव होई ||
भक्तगण मिळताती | पालखीतें मिरवती || २ || आरती एकवीरा |



दर्यावरचे शूरवीर । तुझ्या पायीचे चाकर ॥
तव कृपा तारी त्यासीं । त्याना तुझाची आधार ॥ ३ || आरती एकवीरा |



हस्तनक्षत्राचा वारा | ऊठे जिवा नाही थारा ||
क्षण एक आठवितां । त्यासी तारिसी तूं माता || ४ || आरती एकवीरा |



तव पुजनीं जे रमती | मनोभावें स्मरोनी चित्तीं ||
जड संकटाचे वेळी । कडाडोनी प्रकट होसी ॥ ५ || आरती एकवीरा |



शांत होई तृप्त होई । सेवा मान्य करी आई ॥
अभयाचा देई वर । ठेवी तव चरणी मी शीर ॥ ६ ||आरती एकवीरा |



Leave a Comment

error: Content is protected !!