महावीर जयंतीची माहिती

हा जैनांसाठी सर्वात शुभ दिवस आहे आणि जैन धर्माच्या शेवटच्या आध्यात्मिक गुरुच्या (महावीर) स्मरणार्थ जगभरातील जैन समुदाय पाळतात. यंदा तो 21 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते, ज्याला रथयात्रा म्हणून ओळखले जाते. भाविक जैन मंदिरांना भेट देतात, भगवान महावीरांच्या मूर्तीची पूजा करतात, धार्मिक गीते वाचतात आणि आशीर्वाद घेतात. भगवान महावीर: जीवनमूलतः महावीराचे नाव वर्धमान होते आणि त्यांचा जन्म सुमारे 599 ईसापूर्व झाला होता, अनेक विद्वानांच्या मते ही तारीख 100 वर्षे पूर्वीची आहे, तेव्हा महावीर बहुधा बुद्धाच्या जवळपास त्याच वेळी जगले होते, ज्यांच्या पारंपारिक जन्मतारखेचे देखील पुनर्मूल्यांकन केले गेले …

Read more

राखी पौर्णिमा (श्रावण शुध्द पौर्णिमा)

rakhi-purnimaहाच दिवस राखीपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. भावाने आपले रक्षण करावे असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो. व्रतबंध झालेले ब्राह्मण लोक या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करतात. याच दिवशी लोक श्रावणी करतात. या दिवशीचे मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात. तसेच नारळाच्या/ खोब-याच्या वडया, नारळाची बर्फी, नारळाच्या करंज्या वगैरे पदार्थ करून हा सण साजरा करतात.

राम नवमीची माहिती

: रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभुरामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता. म्हणूनच या दिवशी रामनवमी, भगवान रामाची जयंती साजरी केली जाते राम नवमीची माहितीराम या नावाचा अर्थराम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे, ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश, म्हणजे अंतर्मनाला प्रज्वलित करणे. म्हणजे आपल्या अंतःकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते. आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम नाम आहे असे म्हटले. (Shri Ram Navami Information In Marathi) राम …

Read more

 गुढी पाडव्याची माहिती

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 9 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे, शोभायात्रा काढून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. गुढीपाडव्याचे महत्त्वअसे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी श्री रामजींनी वानरराज बळीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले तेव्हा …

Read more

नारळी पौर्णिमा ( श्रावण शुध्द पौर्णिमा)

narali-purnimaसमुद्राकाठी रहाणा-या प्रामुख्याने कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळयात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाजे वगैरैची ये-जा या काळात बंद असते. जलदेवतेचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात, या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्राला नारळ अर्पण करताना ताम्रनाणी नारळास बांधून नारळ समुद्रात सोडतात. या दिवसापासून मच्छिमार लोक आपल्या होडया घेऊन मच्छिमारीसाठी समुद्रात जायला सुरुवात करतात.

बुद्ध पौर्णिमेची माहिती

मराठी सणवार: बुद्ध पौर्णिमा , ज्याला वेसाक असेही म्हणतात , हा जगभरातील बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात महत्वाचा सण आहे. हा शुभ दिवस बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञान आणि मृत्यू दर्शवितो आणि बौद्ध संप्रदाय मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण वैशाखाच्या हिंदू महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी (पौर्णिमा) येतो, जो ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये एप्रिल-मेशी संबंधित आहे. 2024 मध्ये बुद्ध पौर्णिमा 23 मे (गुरुवार) रोजी साजरी केली जाईल . | बुद्ध पौर्णिमेचा इतिहासडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. (Buddha Purnima …

Read more

नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)

naga-panchamiभारतात नाग-साप यांना देव मानले जाते. काही नाग मानवाला उपकारक तर काही विषरी नाग-साप अपकारक मानले जातात. कदाचित त्यांच्याबाबत असलेल्या भितीपोटी ही कल्पना आली असावी. नागाची पूजा करण्यासाठी नागपंचमी या सणाची निर्मिती झाली आहे.या सणामागची पौराणिक कथा अशी की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट सर्प होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्व काही भस्मसात होई. श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुदध पंचमी (नागपंचमी). तेव्हापासून लोक नागाची पूजा करुन नागाला लाह्या, दूध वाहतात. नागदेवतेने प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते. या दिवशी नागदेवतेबरोबर …

Read more

बेंदूर सणाचे महत्त्व

: महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचे प्रतीकमहाराष्ट्रातील पारंपरिक सणांमध्ये बेंदूर सणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हा सण विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि शेतकऱ्यांच्या जीवनात याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेंदूर सण बैलांच्या पूजेचा सण आहे आणि तो मुख्यत्वे शेतीशी संबंधित आहे. (information about bendur) पावसाळ्याच्या दिवसांत, जेव्हा शेतीची कामे सुरू होतात, तेव्हा हा सण साजरा केला जातो. बेंदूर सणाचे महत्त्वशेतीच्या कामांमध्ये बैलांचे स्थान अनन्यसाधारण आहे. पूर्वीच्या काळात आणि आजही, बहुतांश शेतकरी बैलांच्या सहाय्याने शेतीची कामे करतात. बेंदूर सण हा शेतकऱ्यांच्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. हा सण शेतकऱ्यांच्या परिश्रमाला आणि बैलांच्या कष्टाला सन्मान …

Read more

वटपौर्णिमा (ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा)

भारतातील सर्वत्र आढळणा-या वृक्षांपैकी एक महत्त्वाचा वृक्ष म्हणजे वड . या वृक्षाशी निगडीत असलेला हा सण आहे. या सणामागची पौराणिक कथा अशी की सावित्री या पुण्यवान व पतिपरायण स्त्रीने आपल्या पतीचे – सत्यवानाचे प्राण परत मिळवण्याकरिता, प्राण घेऊन जाणा-या यमराजाला आपल्या भक्तीने व युक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजसुध्दा बायका वडाची पूजा करतात. आपले सौभाग्य मरेपर्यंत अबाधित रहावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना स्त्रिया देवाला या दिवशी करतात. म्हणून सौभाग्याचे …

Read more

गुरुपौर्णिमा (आषाढ शुध्द पौर्णिमा)

gurpaurnimaभारतातील शिक्षण पध्दतीत ‘गुरू-शिष्य’ प्रथेला फार महत्त्व आहे. वयाची आठ वर्षे पूर्ण झाल्यावर मौंजीबंधन विधी करून ब्राह्मण मुले विद्यार्जनासाठी गुरूगृही जात असत. एक तप (१२ वर्षे) विद्यार्जन करून ते गृहस्थाश्रमात प्रवेश करीत असत. गुरूला वंदनीय मानून आदर व्यक्त करण्याच्या हेतूने हा सण निर्माण केलेला आहे. महर्षी व्यास जगाचे आद्यगुरु होते असे हिंदू मानतात. त्यामुळे या दिवशी महर्षी व्यासांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. या दिवशी महर्षी व्यासांची पूजा करतात व खालीलप्रमाणे श्लोक म्हणून त्यांना वंदन करतात. ॐ नमोस्तुते व्यास विशाल बुध्दे फुल्लारविंदाय तपत्रनेत्रयेन व्रया भारत तैल पूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः॥ याशिवाय कोणत्याही विषयातील आपापल्या गुरुजनांना आदराने …

Read more

error: Content is protected !!