असाही एक पावसावरचा निबंध
बाहेर पाऊस पडतोय. मस्त गरम चहा घेतला आहे. कांदाभजीचा बेत झाला आहे. मग पुन्हा चहा होणार आहे. अहाहा. केवळ मजा आहे. पावसाचा असा आनंद घेतो आहे. 2 बीएचकेच्या घरात पावसाचा असा आनंद घेताना भूतकाळ मात्र पाठ सोडत नाही. तो पार शरीराच्या हाडांमध्ये खोल रुतलेला आहे. आर्थिक परिस्थिती बदलली की आपण उभे आयुष्य ज्याच्या नावाने बोटे मोडत असतो तेच आनंद द्यायला लागते. आम्ही पावसाच्या नावाने कायम बोटे मोडत असू. माझे वडील बांधकाम मजूर. पावसाळा आला की टेन्शन असायचे. पावसाळा आला की काम बंद होते. चार महिने अधूनमधून पंधरा एक दिवसातून दोनेक दिवस काम मिळाले तर मिळाले. नाहीतर …