लव लव साळूबाई

लव लव साळूबाईलव लव साळूबाई, मामा येतोझुक झुक गाडीतून – नेईन म्हणतोअटक मटक मामी येतेछानसा बॅट-बॉल देईन म्हणतेअबरू-गबरु येतो बंटयादेईन म्हणतो-सगळया गोटयानको-नको मी इथंच बराआईच्या कुशीतच आनंद खरा

करंगळी, मरंगळी

करंगळी, मरंगळीमधल बोट, चाफेकळी,तळहात – मळहात,मनगट – कोपर,खांदा-गळागुटी-हनुवटी,भाताचं बोळकं,वासाचं नळक,काजळाच्या डब्या,देवाजीचा पाट,देवाजीच्या पाटावर,चिमण्यांचा किलबिलाट.

आपडी थापडी

आपडी थापडीगुळाची पाडी!धम्मक लाडूतेल काढू!तेलंगीचे एकच पावदोन हाती धरले कान!चाऊमाऊ चाऊमाऊपितळीतले पाणी पिऊहंडा-पाणी गडप!

चांदोबा लपला

चांदोबा लपलाझाडीत….आमच्या मामाच्यावाडीत….मामाने दिलीसाखरमाय….चांदोबालाफुटले पाय….चांदोबा गेलेराईत….मामाला नव्हतेमाहीत….

ये रे ये रे पावसा

ये रे ये रे पावसातुला देतो पैसापैसा झाला खोटापाऊस आला मोठापाऊस पडला झिम् झिम्अंगण झाले ओले चिंबपाऊस पडतो मुसळधाररान होईल हिरवंगार.

मराठी प्रेम कविता

राधा-कृष्णाची प्रेम कथा-यमुनेच्या काठावर, गोप गोपींचा लवाजमाप्रेमाच्या लीलांचा रास, राधा-कृष्णाचा आवाजकृष्णाच्या बासुरीचा स्वर, मनात खोलवर घुमत राहीला,राधेच्या हृदयात प्रेमाचा, एक नवा रंग चढला. गोपाळ कृष्णाचा नटखट चेहराराधेच्या डोळ्यातला चमकता तारादोघांची खेळी, प्रेमाचे गाणे,संगीतात मिसळले, एक अद्भुत तराणे. गोकुळात त्यांच्या खेळातदिसे निळा आसमंतगोपिका साऱ्या राधेसह,प्रेमात कृष्णाच्या फेऱ्या घेतात. राधा होती स्वप्नांचा रंगकृष्णाच्या प्रेमात गंधित, एक जिव्हाळा गहिरात्याच्या प्रेमात हरवून गेली,कृष्णाने तिला हृदयाची पट्टराणी केली . प्रेमाच्या या कथा, अनंत आहेत लिलाराधा-कृष्णाच्या प्रेमात, सृष्टीचा सारा आनंद दिसलासंपूर्ण विश्वाचे प्रेम, त्यांच्यात वसले,राधा-कृष्णाच्या प्रेमात, जीवनाचे सुख कळले. आनंदाची गोडी, भक्ति हृदयात फुललीराधा आणि कृष्ण, प्रेमाच्या गोष्टीत सजलीयुगानुयुगे ही प्रेम कथा …

Read more

आनंदाचा परिजातक

छोटया छोटयाशा क्षणांतीलमजा चाखत जगता यावेपार नसलेल्या आनंदाला मगइवल्याशा मुठीत मावता यावेथकून सायंकाळी घरी आल्यावरप्रसन्न वदनी दीप उजळावे दाराआड लपलेल्या गंमतीनेचिमुकल्या पावलांचे रुप घ्यावेहेतूक – अहेतूक नाजूक कटाक्षांनीमोहरत्या कळयांचे गंध व्हावेजीवन डवरणा-या क्षणांनाधडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे दाटून येणा-या स्निग्धतेतूनपोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावेजीवनाशी राखून जाळ अबाधितविश्वासाने या मला वात्सल्य ल्यावे चिमखडया गोड गोड बोलांनाभाबडे बोबडे प्रश्न पडावेनिरर्थक अशा हावभावांनीहीहसून हसून बेजार व्हावेपक्ष्यांचा ऐकत मंजूळ किलबिलाटहिरव्याकंच साजाने नाचनाचावेक्षितीजावर करुन सोनेरी उधळणनिसर्गाच्या कुंचल्याने परीस व्हावे महाल गाडया नि शेतीवाडयाकशास यांचे अप्रूप वाटावेफुलवाया मळे आनंद अंगणीवणवण फिरण्या ते का लागावे आनंदाचा असा पारिजातकसदैव दरवळतो मनामनातशोधावा तेव्हा तो सापडतोआपला आपल्याच आंगणात …

Read more

कविता संग्रह

दुःख ओळखता यायला हवं……एक वाट होती छोटीशीलगेच संपणारी,दुरून साजरी दिसायची,पण जवळ गेल्यावर हताश भासायची.(भासायची नव्हे; हताशच असायची)तुरळक रहदारी असायची तिच्या वाटेवर,तेच तेच नेहमीचे वाटसरू दिसायचे तिला रोज,त्यांची त्यांची दुःख घेऊन ते चालायचे रोज तिच्या वाटेने,त्यातही ठेच लागली की तेही तिलाच दोष द्यायचे.पण तिच्या दुःखाचं काय?साधा विचार देखील कुणी करत नसायचं तिचा,तिच्या दुःखी असण्याचं कारण काय;तर तिच्या वाटेवर एक साधं झाडही नव्हतं, खाच खळग्यांनी पूर्णपणे विद्रूप झाली होती ती,मला जाणवलं तिचं दुःखी असणं; मग मी दोन-चार रोपं लावली तिथे,ग्रामपंचायती सोबत पत्र व्यवहार करून तिची डागडुजी केली.आता वाटसरूंचा राबता वाढलाय त्या वाटेवर; येता जाता क्षणभर विसावतात तिथल्या झाडाखाली, …

Read more

error: Content is protected !!