पैशाची पाईपलाईन…एक उद्योजकीय बोधकथा
का गावामध्ये उन्हाळ्यात सर्व विहिरींचे पाणी आटून जात असे. गावापासून चार किलोमीटर दूर असलेल्या तलावात मात्र भरपूर पाणी असे. त्यामुळे दूर का असेना पण त्या गावाला कायमस्वरूपी पाणी मिळत असे. एवढ्या लांबवरून भर उन्हाळ्यात पाणी आणण्याचे काम म्हणजे फारच कष्टाचे काम होते. त्या गावात दोन तरूण मित्र विनित व पुनित राहत होते. ते दोघे चांगले शिकलेले होते, कसलेही काम करण्याची त्यांची तयारी होती. तरीही त्यांना कुठलेही काम मिळाले नाही. त्यामुळे ते दोघेही बेरोजगार होते. यावर्षी देखील उन्हाळ्यात गावातल्या सर्व विहिरी आटल्या. तेव्हा या दोघांनी एक एक सायकल घेतली व गावातल्या लोकांना पाणी आणून द्यायला सुरवात केली. …