कोंबडा
कोंबडा….. गाव निपचीत पडलं होत…..दिवस भरचा कष्टाचा कामामुळे थकून शांत झोपले होते…. भटकी कुत्री पण एखादा आडोसा धरून शांत झोपलेली होती….मधेच एखाद कुत्र अचानक उठायच आणि इकडे तिकडे संशयाने पाहून पुन्हा झोपी जायचं…. त्या गावापासुन दूर…..एका वस्तीवर कोणीतरी जाग होत…झोपडी सारखच छोट घर…. सहसा तिथे कोणी नसायच म्हणूनच ती जागा निवडली होती….. त्या अघोरी कामा साठी… आजूबाजूला भयाण शांतता…रातकिडे मात्र त्यांचा अस्तित्वाची जाणीव करून देत होते….. वातावरणात पण एकदमच भकास जाणवत होत…. अशा या वातावरणात ती आली….त्या झोपडीत….. घरातील झोपल्या नंतर ती हळूच उठून आली होती….. एक भयानक कामाला सुरवात करायला… ती त्या झोपडीत आली….शेणाने सारवलेली …