काळ्या दरवाज्या मागिल रहस्य…
निशा सोनटक्के पावसाळा सुरू झाला. आमच्या फ्लॅट वरतीबिल्डिंग ची गच्ची….घरात खूप पावसाचे पाणीआले…आणि…ताबडतोब… घर बदलण्याचानिर्णय घ्यावा लागला. या भाड्याने घेतलेल्या घराचादरवाजा दक्षिणेकडे……वास्तुशास्त्रात न बसणारा असाहोता.घरात अंधार होता….कुबट वास भरलेला होता.पण…आमचे अहो…..त्यांच्या पुढे कुणाचेही चालतनाही…. मी घर साफ केले.सामान लावले….देवाचीपूजा केली.दिवा लावला.उदबत्ती लावली…..पणघरात उदासीनता भरून राहीली होती.मनच रमत नव्हते.मी विचार केला….पावसाळ्याचे चार महिने तर काढायचेआहेत….मी शाळेत टीचर होते.सकाळी सात ते दुपारीसाडेबारा मी शाळेत….आणि मी दुपारी घरी फक्त एकटीचमुले शाळेत….आणी अहो आँफीसमधे…. असे आमचेरूटीन होते. या घरात प्रशस्त चार खोल्या होत्या पण प्रकाशाचाजरा अभावच होता. त्यामुळे कदाचित ऊदास वाटते.असे मला वाटले. आतली खोली जरा जास्तच काळोख आणि…..मलानक्की सांगता …