उत्तुंग आमुची उत्तर सीमा

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला हे कोटिकोटि भुजदंड होतील इथे ध्वजदंड छातीची करुनी ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू बलवंत उभा हिमवंत करि हैवानांचा अंत हा धवलगिरी, हा नंगा हा त्रिशूळ कांचनगंगा जरि झुंड पुंड शत्रूंची आली खिंड खिंड अडवू देशाचा दृढ निर्धार करु प्राणपणे प्रतिकार ह्या नसानसांतिल रक्त जाळील आसुरी तख्त

वंद्य वंदे मातर

वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्‌ वंद्य वंदे मातरम्‌ माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम्‌ याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले शस्त्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले शस्त्रहीना एक लाभे मंत्र वंदे मातरम्‌ निर्मीला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी गा तयांच्या आरतीचे गीत, वंदे मातरम्

वेडात मराठे वीर

म्यानातुनि उसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात ! ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात ! आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात ! खालून आग, वर आग, आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात वेडात मराठे वीर दौडले सात ! दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा ओढ्यात …

Read more

६. जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू लढतिल सैनिक, लढू नागरिक लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या–पिढ्या हे चालो संगर अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू

जयोऽस्तु ते

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे! राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम–लखलखशी गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची मोक्ष–मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते तुजसाठि मरण तें जनन तुजवीण जनन तें मरण तुज सकल–चराचर–शरण चराचर–शरण

शूर आम्ही सरदार

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती? देव, देस अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगिन लागलं जडली येडी प्रीत लाख संकटं झेलुन घेईल अशी पहाडी छाती जिंकावे वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं लढुन मरावं मरुन जगावं हेच आम्हाला ठावं देसापायी सारी इसरू माया ममता नाती x

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझारेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरीएकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरीभीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजाजय जय महाराष्ट्र माझा … भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभाअस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभासह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजादरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणीपोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणीदारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजलादेशगौरवासाठी झिजलादिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलिततया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडतीतया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावाअनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकलतया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावेसमस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारीकुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्यासदा ते देतची जावे, जगाला प्रेम …

Read more

उठा राष्ट्रवीर हो

उठा राष्ट्रवीर होसज्ज व्हा, उठा चला,सशस्त्र व्हा, उठा चला युध्द आज पेटले जवान चालले पुढेमिळूनि सर्व शत्रुला क्षणांत चारु या खडेएकसंघ होउनि लढू चला लढू चलाउठा उठा, चला चला लाख संकटे जरी उभी समोर ठाकलीमान ताठ आमुची कुणापुढे न वाकलीथोर वंश आपुला महान मार्ग आपुलाउठा उठा, चला चला वायुपुत्र होउनी धरु मुठीत भास्कराहोउनी अगस्तिही पिऊनि टाकु सागरामन्युबाळ होउनी रणात जिंकू मृत्युलाउठा उठा, चला चला चंद्रगुप्त वीर तो फिरुनि आज आठवूशूरता शिवाजिची नसानसात साठवूदिव्य ही परंपरा अखंड चालवू चलाउठा उठा, चला चला यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवतीदुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुतीदेवभूमि ही अजिंक्य दाखवू जगा चलाउठा …

Read more

बलसागर भारत होवो

बलसागर भारत होवोविश्वात शोभुनी राहो॥ हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधलेराष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥ वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीनहा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥ हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडूनऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥ करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊंविश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥ या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थहे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥ ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेलजगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥ मंगल देशा पवित्र देशामंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशाप्रणाम घ्यावा माझा हा …

Read more

error: Content is protected !!