श्री शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला । लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मल वाहे झुळझुळां ।। जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।१।। कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभूतीचे उधळण शीत कंठ निळां ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।२।। देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें । त्यामाजी अवचित हलाहल जें उठिलें । ते त्वां असुरपणे प्रशान केलें । नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें || जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।३।। व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन …

Read more

श्री दुर्गादेवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी । वारी वारी जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।। जय देवी जय देवी महिषासुरमथनी । सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।। जय देवी जय देवी ।। धृ० ।। त्रिभुवन भुवनी पहाता तुज ऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही विवाद करिता पडले प्रवाही । ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।। २ ।। प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा । अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा । नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।।

ओवाळू आरती श्री गणपति ओंकारा

ओवाळू आरती श्री गणपति ओंकारा lऔट मात्रा कोटी सुर्यसम प्रभाकरा ll धृ.llबिंदुरुपे अचल अभय निर्गुण निराकारा lयोगमाया अर्धमात्रा विचरि भवप्रसारा ll १ llपीतवर्ण आकारमात्रा ब्रह्मसृजकारा lउकार जीमूतवर्ण रक्षिसी अखिल चराचरा ll २ llलीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा lअनन्यशरण:गत या दासा तव पदी दे थारा ll ३ ll

नाना परिमळ

नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रें । लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ।ऐसें पूजन केल्या बीजाक्षर मंत्रें । अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥जय देव जय देव जय मंगलमूर्ति । तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फुर्ती ॥धृ॥ तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांचीं सकलहि पापें विघ्नेंही हरती ।वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ॥२॥ जय देव शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं । किर्ति तयांची राहे जोवर शशितरणी ।त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणीं ॥३॥ जय देव..

शेंदुर लाल चढ़ायो

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको। दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको। हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको। महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥ १॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥ अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि। विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी। कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी। गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारी ॥२॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ भावभगत से कोई शरणागत आवे। संतत संपत सबही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे। गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारा …

Read more

श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ।। २ ।। लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।

श्री हनुमान चाळीसा

मराठीभारतातील प्रत्येक गावात शहरात श्री हनुमानांचे मंदिर दिसेल . हनुमान हे भगवान श्री रामाचे भक्त होते . संत तुलसीदास यांनी हनुमानांच्या भक्तीसाठी हनुमान चाळीसा लिहली आहे .|| दोहा ||श्री गुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरू सुधारी |बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फळ चारी || बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन – कुमार |बल बुधि बिदया देहू मोहिं हरहु कलेस बिकार | || चौपाई ||जय हनुमान ज्ञान गुन सागर |जय कपीस तिहुँ लोक उजागर || ०१ || राम दूत अतुलित बल धामा |अंजनी -पुत्र पवनसुत नामा || ०२ || महाबीर बिक्रम बजरंगी |कुमति निवार सुमति के संगी || ०३ …

Read more

error: Content is protected !!