आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची

जय देव, जय देव, जय जय अवधूताअगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव तुझे दर्शन होता जाती ही पापेस्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरितेचरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरतेवैकुंठीचे सुख नाही या परते, जय देव, जय देव जय देव, जय देव, जय जय अवधूताअगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव सुगंध केशर भाळी वर टोपी टिळाकर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळाशरणागत तुज होतां भय पडले काळातुेझे दास करिती सेवा सोज्वळा, जय देव, जय देव जय देव, जय देव, जय जय अवधूताअगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव मानवरुपी काया दिससी …

Read more

आरती श्री गजानन महाराजांची

जय जय सत्-चित् स्वरूपा स्वामी गणराया। अवतरलासी भूवरी जड-मूढ ताराया॥धृ॥ निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी। स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी। ते तू तत्व खरोखर नि:संशय अससी। लीलामात्रे धरिले मानव देहासी॥१॥ होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा। करूनी “गणि गण गणात बोते”या भजना। धाता हरिहर गुरूवर तूचिं सुखसदना। जिकडे पहावें तिकडे तूं दिससी नयना॥२॥ लीला अनंत केल्या बंकट सदनास। पेटविलें त्या अग्नीवांचूनि चिलमेस। क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस। केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥३॥ व्याधि वारुन केले कैका संपन्न। करविलें भक्तांलागी विठ्ठल-दर्शन। भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण। स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन॥४॥

साईबाबांची आरती

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा। चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आ०।।ध्रु ०।। जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग । मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।। १ ।। जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ०।। २ ।। तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा । अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।। ३ ।। कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार । अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। द०।। आ०।। ४ ।। आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी । प्रभुपद पहावया । …

Read more

श्री शनि देवाची आरती

जय जय श्री शनि देवा। पद्मकर शिरीं ठेवा ॥ आरती ओंवाळीतों । मनोभावें करुनी सेवा ॥ ध्रु० ॥ सूर्यसुता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ॥ एकमुखें काय वर्णूं । शेषा न चले स्फूर्ती ॥ १ ॥ जय जय श्री शनि देवा… नवग्रहामाजीं श्रेष्ठ । पराक्रम थोर तूझा ॥ ज्यावरी तूं कृपाकरिसी । होय रंकाचा राजा ॥ २ ॥ जय जय श्री शनि देवा… विक्रमासारिखा हो । शककर्ता पुण्यराशी ॥ गर्व धरितां शिक्षा केली । बहु छळियेलें त्यासी ॥ ३ ॥ जय जय श्री शनि देवा… शंकराच्या वरदानें । गर्व रावणें केला । साडेसाती येतां त्यासी । …

Read more

दशावताराची आरती

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥ अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥ रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी ।प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥ पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥ सहस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला ।कष्टी ते रेणुका म्हणुनी …

Read more

श्री रामचंद्रांची आरती

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी । कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।। जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ।। प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला । मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। २ ।। निजबळे निजशक्ति सोडविली सीता । म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा । आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ३ ।। अनाहतध्वनि गर्जती अपार । अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार । अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं …

Read more

श्रीरामाची आरती – ऐक बा रामराया

ऐक बा रामराया, तुझ्या मी वंदितो पाया आवरी आपुली ही, विश्वमोहिनी माया ऐक बा रामराया ।।धृ।। मी मूढ हीनदीन, सर्व सक्रिया हिन तू क्षमाशील देवा शुद्धचरित निजधीन ऐक बा रामराया ।।१।। घडो सदा साधू संग, नसो विषय प्रसंग सप्रेम भक्ती द्यावी, सत्व वैराग्य अभंग ऐक बा रामराया ।।२।। वाटते नेते भावे तुझे साधू गुणगावे मन हे आवरेना सांग काय म्या करावे ऐक बा रामराया ।।३।। करिता संसार काम, मुखी असो तुझे नाम दया घना भक्त मोरयाचा पूरविसी काम ऐक बा रामराया ।।४।।

श्री हनुमंताची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं | कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१|| जय देव जय देव जय श्रीहनुमंता तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ||धृ|| दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द | थरथरला धरणीधर मनिला खेद | कडाडिले पर्वत उड़गण उच्छेद | रामी रामदास शक्तीचा शोध ||2|| जय देव जय देव जय श्रीहनुमंता ||

श्री पांडुरंगाची आरती

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥ येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ २ ॥ येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ ३ ॥ येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ ४ ॥

श्री विठोबाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्या शोभा | पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा आले गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जागा ||१|| जय देव जय देव पांडुरंग रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ||धृ|| तुळसीमाळा गळां कर ठेवुनी कटी | कसे पितांबर कस्तुरी लल्लाटी | देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढें उभे राहती || जय देव जय देव पांडुरंग ||२ || धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा | सुवर्णाची कमळे वनमाळा गळां | राई रखुमाबाई राणीया सकळा | ओवाळिती राजा विठोबा सावळा | जय देव जय देव पांडुरंग ||३|| ओवाळूं आरत्या कुर्वंड्या येती | चंद्रभागेमाजी …

Read more

error: Content is protected !!