घालीन लोटांगण

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रुप तुझे ॥ प्रेमें आलिंगिन आनंदे पूजीन । भावें ओवाळिन म्हणे नामा ॥१॥ त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥ कायेन वाचा मनसेन्द्रियैवा बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात । करोमि यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥३॥ अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् । श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥ हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥

निरोप आरती

जाहले भजन आम्ही नमितो तव चरण । वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥ दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो प्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥ तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥ मागणे ते देवा एकची आहे आता एकची आहे तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥ जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया ऐशा या ठाया प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति गावया ॥४॥ सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा आमुच्या मनी हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥५॥ वारुनिया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी कृपेची …

Read more

धन्य धन्य हो प्रदक्षिणा

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची। झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची।। धृ.।। पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी। सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरुनि काशी।। १।। मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती। नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती।। २।। कोटि ब्रह्महत्या हरिती करितां दंडवत। लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।। ३।। गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि। अनुभव जे जागति ते गुरुपदिचे अभिलाषी।। ४।। प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला। श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला।। ५।।

श्री हनुमानाची मराठी आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ||करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ||गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुवनी ||सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी || १ || जय देव जय देव जय हनुमंता ||तुमचेनी प्रसादें न भी कृतांता || जय || धृ || दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ||थरथरिला धरणीधर मानीला खेद ||कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ||रामी रामदासा शक्तपचा शोध ||जय देव जय देव जय हनुमंता || २ |

ब्राह्मणाची आरती

निगमागम विस्तारक तारक आहेसी केवळ तु अधिकारी जप तप यज्ञासी वरिष्ट उत्तम गुरु नाना वर्णासी सकळांचे द्वीज मन्त्र आहे तुजपासी॥१॥ जयदेव जयदेव जयदेव जयदेव जय भूदेवा ब्राह्मण तुझे दैवत करिती जन सेवा । जयदेव जयदेव॥धृ॥ श्री विष्णूने धरिले ह्रदयी पदकमळा म्हणुनीया वैकुंठी भोगिती सोहळा प्रसाद अवघा हाची स्वामी भूपाळा आशिर्वचने हरतील भवचिन्ता सकळा ॥२॥ जयदेव जयदेव द्विज वदने अर्पिता पावे देवासी पूजन केल्या हरतील पापांच्या राशी पदतीर्थांचा महिमा न कळे कोणासी गोसावी सूत स्वामी वंदे सहितासी॥३॥ जयदेव जयदेव

श्रीसत्यनारायणाची आरती

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा | पंचारति ओंवाळू श्रीपति तुज भक्तिभावा || धृ || विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून | घृतयुत्क शर्करामिश्रींत गोधूमचूर्ण | प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण || १ || शातानंदविप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें | दरिद्र दवडुनि अंती त्यातें मोक्षपदा नेलें || त्यापासूनि हे व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें | भावार्थे पूजितां सर्वा इच्छित लाधलें || २ || साधुवैश्यें संततिसाठी तुजला प्रार्थियलें | इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें | त्या पापानें संकटी पडुनी दु:खहि भोगिलें | स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उध्दरिलें || ३ || …

Read more

आरती तुकारामा

आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा | सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ || राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले | तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ || तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें | म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||

ज्ञानराजा आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा |सेविती साधुसंत || मनु वेधला माझा || आरती || धृ || लोपलें ज्ञान जगी |हित नेणती कोणी |अवतार पांडुरंग |नाम ठेविले ज्ञानी || १ || आरती || धृ || कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी |नारद तुंबर हो ||साम गायन करी || २ || आरती || धृ || प्रकट गुह्य बोले |विश्र्व ब्रम्हाची केलें |रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले |आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची

जय जय सदगुरू स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥ अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥ अक्कलकोटी वास करुनिया दाविली अघटीत चर्या रे ॥ लीलापाशे बध्द करुनिया तोडिले भवभया रे॥१॥ यवने पुशिले स्वामी कहां है? अक्कलकोटी पहा रे ॥ समाधिसुख ते भोगुनी बोले धन्य स्वामीवर्या रे॥२॥ जाणसी मनीचे सर्व समर्था विनवू किती भव हरा रे ॥ इतुके देई दीन दयाळा नच तवपद अंतरा रे॥३॥ जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे॥ अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे यारे॥धृ॥

पंचप्राण हे आतुर झाले

पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। हरी हर संगे ब्रम्हदेवहि, खेळे तव भाळी, पुनव हासते प्रसन्नतेने, मुख चंद्राच्या वरी। लाजवीती रवि तेजाला तव, नयनांच्या ज्योती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी । श्वासासंगे स्पंदन व्हावे, तुझेच जेगजेठी । अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ।। धर्माचरण पावन व्हावे, सदा असो सन्मति । सत कर्मचा यज्ञ घडवा, झिजवुनि ही यष्टी । सन्मार्गाने सदैव न्यावे, घेऊनी मज हाती । सगुण रूपाने येऊन स्वामी, …

Read more

error: Content is protected !!