मध्यम वयातील शारीरिक बदलांविषयी माहिती|
Information about physical changes in middle ageमध्यम वय म्हणजे सर्वसाधरणपणे 40 ते 65 वर्षांपर्यंतचा कालखंड होय . मध्यम वयातील स्त्री-पुरुषांना विविध प्रकारचे शारीरिक बदल अनुभवास येतात . त्या बदलांच्या दृश्य खुणा प्रकर्षाने जाणवतात . मध्यम वयातील स्त्री-पुरुषांमध्ये आढळून येणारे हे शारीरिक बदल प्रामुख्याने व्यक्तीची उंची , वजन आणि सामर्थ्य किंवा शक्ती याबाबत दिसून येतात . तारुण्यावस्थेपासून मध्यम वयापर्यंत वाटचाल करीत असता अनेक शारीरिक बदल हे हळूहळू व क्रमाक्रमाने होत असतात . वाढत्या वयानुसार जरी प्रत्येक मध्यमवयातील व्यक्तीस काही शारीरिक बदल अनुभवास येत असेल तरीपण शारीरिक बदलांचे प्रमाण किंवा गती वेगवेगळी दिसून येते . एखादा गंभीर आजार …