अचानक तिने माझ्याकडे वळून बघितले.

dबळे माझे गाव कोकणातलेच. मी, माझा चुलत भाऊ आणि एक माझामित्र असे ३ जण आम्ही आमच्या गावी जानेवारी मध्ये देवीच्याजत्रेला गेलो होतो. जत्रा संपल्यानंतर आम्ही परतीच्याप्रवासाला लागलो. दुपारची “मांडवी” ही ट्रेन पकडून आम्हीमुंबईला यायला निघालो. ठरल्याप्रमाणे आम्ही स्टेशनवरपोहोचलो आणि ट्रेनमध्ये चढलो. नशिबाने आम्हाला बसायलाजागापण मिळाली. ट्रेनमध्ये अजुन एक मुलांचा ग्रुप होता.त्यांनी गोव्यावरुन ट्रेन पकडली होती. त्यांचा ६ जणांचा ग्रुपहोता. ते मस्त मजा-मस्ती करत दरवाजाजवळ ऊभे होते.मलासुद्धा बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मी पण उठलोआणि दरवाज्यात जाऊन उभा राहीलो.थोड्या वेळाने मीही त्यांना सामील झालो. बोलता-बोलता मीत्यांना विचारले की कोठे गेलेलात आणि आता कुठे चाललाआहात. त्यांच्यातील अजय नावाचा एक मुलगा होता. तो मलाम्हणाला की आम्ही गोव्याला Enjoy करायला गेलो होतोमाझ्या मावशीकडे आणि आम्ही सांताक्रुझला राहतो. चांगले ६ते ७ दिवस राहणार होतो रे, पण एक लोच्या झाला म्हणूनआम्हा सर्वांना तिथुन निघावे लागले. मी विचारले की काय रेअसे काय घडले की ज्याने तुम्हाला लवकर निघावे लागले. मगत्याने मला जे गोव्याला घडले ते सांगायला सुरुवात केली.आम्ही मस्त मज्जा करायच्या हिशोबाने गोव्याला माझ्यामावशीच्या घरी गेलो होतो. पहिल्या दिवशी आम्ही मस्त गोवाबिचेस वगैरे फ़िरलो. पहिल्याच दिवशी आम्ही खुप मज्जा केली.दुस-या दिवशी आम्ही आराम करायचे ठरविले आणि रात्री जंगीपार्टी करायचा बेत आखला. रात्र झाली. ठरल्याप्रमाणेआमच्यातले ३ जण बिअरच्या बाटल्या आणायला बिअरच्यादुकानामध्ये गेले आणि उरलेले तिथेच थांबून चकणा वगैरेचीतयारी करु लागलो. सर्व होईपर्यंत रात्रीचे १० वाजले. तसेहीपुर्ण रात्र मज्जाच करायची होती आम्हाला. मग आम्ही माझ्यामावशीच्या घरामागे खुप मोठी जागा आहे. आम्ही सर्व निघालोपार्टी करायला. मावशीने अगोदरच आम्हांला बजावले की जास्तलांब जाऊ नका. रात्रीची वेळ आहे. आम्ही सर्व हो बोलुननिघालो. आम्हाला कधी एकदा तिथे पोहोचतो आणि पार्टी सुरुकरतो असे झाले होते. ५ मिनिटे चालल्यावर आम्ही एक जागानिवडली आणि तिथे बसुन प्यायचे ठरविले. आम्ही बॅटरी आणिकंदिल दिवे पण सोबत घेतले होते. सर्वांनी चिअर्स केले आणितोंडाला बाटल्या लावल्या. वातावरण पण मस्त रंगात आले होते.तेवढ्यात आमच्यातला एकजण बोलला की अरे आज तरअमावस्या आहे. मग मी म्ह्णालो की त्यात काय तु पी. एकदाटाइट झाल्यावर कसली अमावस्या आणि कसली पौर्णिमा. असेबोलून आम्ही आमचा कार्यक्रम चालूच ठेवला. आमच्यामध्येराज नावाचा एक मित्र आहे तो पित नाही. तो फक्त सिगरेटओढतो. एवढे बोलून अजय आणि मी राजकडे बघू लागलो. राजशांत दरवाज्यात उभा होता. मग मी राजकडे वळलो आणिराजला विचारले की तु गप्प का? अजय बोलला की, काल आम्हीपार्टी करत होतो तेव्हा जे काही घडले त्यामुळे राज शांत आहे.मग राजने ती घटना पुढे सांगण्यास सुरुवात केली.ठरल्याप्रमाणे सर्व काही सुरळीत चालू होते. पार्टी करेपर्यंत १कधी वाजला काही कळलेच नाही. काही वेळेतच वातावरणातअचानक बदल जाणवू लागला. पण हे सर्व टल्ली असल्यामुळेत्यांना काही होशच नव्हता. मला सिगरेट प्यायची तलप आली.तसेही ह्यांची पार्टी चालू झाल्यापासुन मी सिगरेट पितच होतो.सिगरेटचे पाकिट घेतले तर त्यात शेवटचीच सिगरेट होती. मग मीती लाइट केली आणि झुरके मारु लागलो.आम्ही जिथे बसलो होतो तिथून २० फुटांच्या अंतरावर एकविहीर होती. तिथे मला काही हालचाल जाणवली. म्हणून मीउठलो आणि १ ते २ पाऊले पुढे गेलो बघायला की काय आहे तिथेते. मी जे काही पाहिले ते पाहुन मला तर धक्काच बसला. एकबाई त्या विहीरीजवळ उभी होती. सफेद साडी घातलेली आणिकेस मोकळे सोडलेले. मला कळून चुकले होते की ती बाई कोणआहे ते….. अचानक तिने माझ्याकडे वळून बघितले. तेव्हा तरमाझी फुल्लटू फाटली. ती बाई हळूहळू माझ्या दिशेने चालूलागली. मीपण हळूहळु मागे सरकू लागलो. ती बाई जवळ-जवळआमच्या १० फुट अंतरावर आता उभी होती. मला काय करावेतेच सुचत नव्हते. म्हणून मी माझ्या हातातली सिगरेट वर घेतलीआणि एक दम मारला. माझ्या हातातली सिगरेट पाहून ती बाईजागच्या जागी थांबली. मी विचार करु लागलो की त्या बाईचेभूत अचानक का थांबले? आणि नंतर लक्षात आले की भूत-आत्मा आगीला घाबरतात. ते आगीच्या कधीच जवळ येत नाहीत.नंतर मी ती सिगरेट त्या बाईच्या दिशेने दाखवतच उभा राहीलो.एक झुरकाही मारला नाही, कारण जर एक्तरी झुरका मारलाअसता तर सिगरेट संपली असती लवकर. आणि ह्या बाकीच्यांचेआवरेपर्यंत ती सिगरेट पेटत राहणे गरजेचे होते. तेवढ्यातअजयने पाठून आवाज दिला, ’ए राज एक दम दे रे.’ मी त्यालाबोललो की आता नाही, घरी चल मग देतो हवे तेवढे. आणि त्यासर्वांना आवरायला सांगितले. ते ऐकायलाच तयार नव्हते. म्हणूलागले की, आता तर पार्टी चालू झाली आहे. मग मी म्हणालोकी, खुप उशिर झाला आहे. आपल्याला आता निघायला हवे. तसेआम्ही सर्व आटोपून निघालो.मी बघितले तर ती बाई तिथेच उभी होती आणि मंद हास्य करतहोती. नशिबाने आम्ही सर्व घरी सुखरुप परतलो. सर्वजण मलाविचारु लागले की का तु आम्हाला एवढ्या लवकर तिथुन घेऊनआलास हा. मी त्यांना बोललो की आता झोपा. सकाळीउठल्यावर मी सर्व सांगेन तुम्हाला. सकाळी उठल्यावर मी तोप्रकार मावशी आणि बाकी सर्व मित्रांन सांगितला. तेव्हामावशीने सांगितले की एका बाईने १० वर्षांपुर्वी आपल्या नव-याच्या जाचाला कंटाळून त्या विहीरीत उडी मारुन जीव दिलाहोता आणि ती बाई खुप जणांना दिसली पण होती. हे सर्व ऐकुनसर्वांची घाबरगुंडीच उडाली आणि सर्वांनी आपापल्या बॅगाभरायला घेतल्या आणि ७ दिवसांची पिकनिक ३ दिवसातचआटपून आम्ही तेथून निघालो. राज मला बोलला की ह्यांना जरमी रात्रीच सांगितले असते तर ह्यांची सर्व नशाच उतरलीअसती म्हणून मी ह्यांना काही सांगितले नाही.ह्या गोष्टीला आता १ वर्ष उलटले आहे आणि खरच गोव्यातआजही अशा खुप जागा आहेत जिथे असले भयानक अनुभवयेतात.

Leave a Comment

error: Content is protected !!