ऐक बा रामराया, तुझ्या मी वंदितो पाया
आवरी आपुली ही, विश्वमोहिनी माया
ऐक बा रामराया ।।धृ।।
मी मूढ हीनदीन, सर्व सक्रिया हिन
तू क्षमाशील देवा शुद्धचरित निजधीन
ऐक बा रामराया ।।१।।
घडो सदा साधू संग, नसो विषय प्रसंग
सप्रेम भक्ती द्यावी, सत्व वैराग्य अभंग
ऐक बा रामराया ।।२।।
वाटते नेते भावे तुझे साधू गुणगावे
मन हे आवरेना सांग काय म्या करावे
ऐक बा रामराया ।।३।।
करिता संसार काम, मुखी असो तुझे नाम
दया घना भक्त मोरयाचा पूरविसी काम
ऐक बा रामराया ।।४।।