दसरा म्हणजे काय ?


दसरा म्हणजे काय ? : दसरा शब्दाचा अर्थ आहे रावण . म्हणजेच दस + रा = १० तोंडे असलेला रावण असा हा दसरा शब्द तयार झालेला आहे . तसेच खरा शब्द हा दसहरा असा आहे . परंतु त्याला मराठी भाषेत दसरा असे बोलतात . दशहरा (दसहरा) म्हणजेच १० तोंडाचा रावण हरला असा ह्या शब्दाचा अर्थ होतो .

विजया दशमी म्हणजे वाईटावर चांगल्या चा विजय म्हणजे विजयादशमी. आता वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे रावणाच्या गर्वावर श्री राम यांनी विजय मिळवला तसा विजय. म्हणजेच १० डोकी असलेल्या रावणाचा गर्व हरण केला . म्हणून दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण साजरी करतात. विजया दशमी साजरी करण्यामागे रामाचा रावणावर विजय मिळवणे फक्त एवढेच कारण नसून त्यामागे अजून बऱ्याच पौराणिक कथा आहेत.

त्यातील एक आहे ती म्हणजे दुर्गा देवीचे म्हैशासुर नावाच्या राक्षसाचा वध करून विजय मिळवला. ज्या प्रमाणे देवीने राक्षसी प्रवृत्तीचा विनाश केला. दुर्गा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाशी पूर्ण नऊ दिवस वेगवेगळी नऊ रूपे धारण करून त्या महिषा शूर नावाच्या राक्षसाचा (dasara information in marathi) वध केला आणि म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसा नंतर हे देवीच्या विजयाचे प्रतीक म्हणून नवरात्री च्या दुसऱ्या दिवशी दसरा सण साजरी केला जातो.

त्याच प्रमाणे आपल्या सारख्या माणसांन मधील असलेल्या वाईट गोष्टीचा ,राक्षसी वृत्तीचा , वाईट विचार धारणेचा , क्रोध चा , रागाराचा ,आणि दूषित मन ह्या सगळ्या गोष्टींना हरवून चांगल्या गोष्टी ची सुरुवात करायची असते. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींचा विनाश करायचा असतो. (dasara information in marathi) आपले वाईट विचार जाळायचे असतात म्हणजेच मनातून काढून टाकायचे असतात आणि नवीन चांगल्या विचाराने आयुष्याला पुन्हा सुरवात करायची असते आणि रावणासारखे १० डोकी असलेल्या वाईट ,घाण विचार यांचे दहन करायचे असते आणि देवी देवतां सारखे मानवानेही वाईटावर चांगल्याचा विजय मिळवायचा असतो म्हणून दसरा , विजयदाशी हा सण साजरी केला जातो.


आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडलेला असेल कि रावणाला खरोखर 10 डोके होती का ?
चला तर मग जाणून घेऊ यात रावणाच्या १० डोक्या बद्दल संपूर्ण माहिती.

ज्याला १० डोकी होती तो रावण आणि त्याला १० डोकी होती असे म्हणतात, पण त्याला खरोखर १० तोंडी होती का? तर त्याला १० डोकी नसून त्याला १० डोकी इतकी शक्ती प्राप्त झालेली होती. (dasara information in marathi) म्हणून त्याला १० तोंडी रावण असे म्हणतात.

रावणाला १० डोक्याची बुद्दीमत्त होती म्हणजेच तो खूप ज्ञानी हि होता. त्याला १० शक्ती प्राप्त होती त्या शक्ती पुढील प्रमाणे आहेत. रावणाचे १० डोकी म्हणजेच त्याच्या गुणांचे प्रतिनिधीत्वं करतात.

काम म्हणजे वासना .
क्रोध ( राग )
मोह
भ्रम
लोभ
मादा म्हणजे अभिमान
मातस्य म्हणजे हेवा
बुद्धी
वाईट चित्त , वाईट इच्छा
अहंकार , गर्व
अशी हि रावणात असलेली १० प्रकारची शक्ती म्हणजेच १० डोकी रावणाला होती.

दसरा 2023 तारीख |
ह्या वर्षी म्हणजेच ( Dussehra 2023 marathi ) कॅलेंडर नुसार अश्विन शुद्ध १०. प्रमाणे 24 ऑक्टोबर , वार मंगळवार , 2023 ह्या दिवशी आहे . तसेच दसरा साजरी किंवा पूजन करण्याची योग्य वेळ किंवा विजय मुहूर्त हा दुपारी ०२ वाजून २१ मिनिटं पासून सुरु होत आहे आणि तसेच ०३ वाजून 41 मिनिटांनी संपत आहे. (dasara information in marathi)

दसरा विजयादशमी च्या दिवशी काय करायचे असते ? | शिलांगन खेळणे
दसरा साजरी करण्याची पद्धत हि प्रत्येक गावा प्रमाणे वेगवेगळी असते. काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घरातील किंवा शेतातील तसेच आपल्या कामाची जी हत्यारे म्हणजेच अवजारे असतात त्यांची पूजा केली जाते.

शेतकरी लोक त्यांच्या नांगराची , विळ्या ची , कुंदळीची आणि इतर बऱ्याच अवजारांची अक्षदा , कुंकू, गंध , आणि फुले वाहून पूजन करतात . तसेच इतर क्षेत्रातील लोक त्यांच्या त्यांच्या रोज कामी येणाऱ्या अवजारांची पूजा करतात. (dasara information in marathi) त्या नंतर चांगला गोडं पदार्थाचे जेवण बनवतात पुरणपोळी ,खीर अश्या गोडं पदार्थांचे जेवनाचा नैवद्य देवाला देतात.

तसेच दसऱ्याच्या मूहुर्तावर काहीतरी खरेदी केली पाहिजे असे पूर्वीपासून प्रथा चालतआली आहे , ज्यात कोणी नवीन गाडी खरेदी करतात , कुणी सोने खरेदी करतात , असे म्हटले जाते कि साडेतीन मुहूर्त पैकी दसऱ्याचा हा एक मुहूर्त असतो ज्यात खरेदी करणे शुभ मानले जाते .

तसंच गावाकडील दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी लहान मुले आणि घरातील पुरुष मंडळी हे आपल्याजवळ असलेल्या वाहनांवर म्हणजेच २ व्हिलर ,४ व्हिलर घेऊन गावच्या बाहेर म्हणजेच वेशीच्या बाहेर जाऊन सोने म्हणजेच आपट्याची पाने लुटून आणतात आणि त्याच्या सोबत धान्याचे धोंडे देखील तोडून आणतात. ह्या क्रियेला शिलांगन खेळणे असे म्हणतात. शिलांगन खेळून आल्यानंतर त्या पुरुषांची व मुलांची दाराबाहेर उभे करून त्यांचे कुंकू, अक्षदा लावून औक्षण केले जाते. त्यानंतर त्यांनी आणलेल्या धान्याचा धोंडा हा घरावरील छतावर ठेवला जातो व घरात प्रवेश केला जातो.

त्यानंतर त्यांनी आणलेले सोने म्हणजेच आपट्याची पाने सर्व प्रथम देवाला वाहिली जातात त्यानंतर घरातील मंडळींना ती वाटली जातात आणि घरातील मोठ्या आणि वयस्कर आणि वडीलधाऱ्या माणसांचा नमस्कार करून आशिर्वाद घेतात. त्याच्या नंतर गावातील ओळखीच्या तसेच नातेवाईकांच्या घरी जाऊन सोने देऊन त्यांचाही आशीर्वाद घेतला जातो. अश्या रीतीने गावाकडील दसरा हा छान पद्धतीने साजरी केला जातो.

Leave a Comment

error: Content is protected !!