एक प्रेमवेडा
काही दिवसपूर्वी माझा रूम वर एक मुलगा आला…..माझा रूममेट
चा मित्र होता……विनोद नाव होत त्याच…….मित्राचा
मित्र तो आपला मित्र म्हणून खूप
गप्पा मारल्या आम्ही…….सातार्यायचा एका लहानशा खेड्यात
राहणार…..भाषेत गावराण
गोडवा होता…..सावळा चेहरा……उत्तम राहणीमान…….यात
सर्वात सुंदर होत ते त्याचा चेहर्याववरील
हास्य…….त्याची निरागसता त्याचा त्या हास्यातुन दिसत
होती……मग सहज मी विचारलं….,”तुम्ही कधी भूत पाहिलाय
का…??
MHE पेज मुले मला लागलेली ही घाण सवय….नवीन
कोणी भेटला की नकळत हा प्रश्न मी हमखास
विचारतोच……तो हसला आणि बोलला….,”नाही ओ…..आपला नाही कधी संबंध
आला….”
मग माझा मित्र हसत बोलला…,”अरे
हा स्टोरी लिहितो…..भुताची राहू देत….तुझी लव
स्टोरी सांग….”
हे ऐकून त्याचा चेहरा थोडा पडला…….थोडा वेळ थांबून
तो निघून गेला…..कदाचित त्याला त्या विषयावर बोलायचं
नव्हतं……
तो गेल्यानंतर मी मित्राला बोललो…..,”अरे यार तो नाराज
झाला वाटतं….”
तो बोलला…”जाऊ दे रे….खुळा आहे तो…..एक मुलीवर प्रेम
करायचा…..ती मुंबई ची सुंदर
मुलगी आणि हा गावातला….त्या पोरीने टाइमपास
केला…..आणि दूसरा मुलगा बघून त्याचा सोबत लग्न करून
मोकळी झाली….याला दिला डच्चू…..”
अशा स्टोरी तर रोज कानावर येतात……म्हणून मी पण जास्त
विचार नाही केला…..
एके दिवशी रूम वर एकटा होतो…..इतक्यात विनोद रूम वर
आला…..काही काम होत म्हणून
आला होता…..मी त्याला बसायला सांगितलं……आणि बोलता बोलता मी त्याला त्याचा प्रेमा बद्दल
विचारलं…..खूप मागे लागल्या नंतर तो सांगू लागला…….
“मी सातार्याातील एका लहान खेड्यात
राहायचो…..जेंव्हा पासून कळायला लागलं तेंव्हा एक गोष्ट
लक्षात आली ती म्हणजे घरची गरीबी…..मजुरी करून घर
चालवणरे माझे आई वडील…..एक एक रूपया साठी झगडाव
लागायचं…..अशातच कसतरी दहावी पास झालो…..आणि आई
वडिलांना हातभार म्हणून मी पण काम शोधू लागलो….मग
आमचा घराजवळ एक गवंडी होता…..त्याचाकडे मजुराच काम
मिळालं…..सिमेंट आणि वाळू कालवणे….त्याला हातात
विटा देणे…..अशी काम करावी लागायची…..पुढे शिकण्याच तर
मनातूनच काढून टाकलं होत…..फक्त जगायच म्हणून जगत
होतो….दिवसभर काम केल की अंग इतक दुखायच की हमखास न
जेवताच झोप लागायची….अशात वर्ष निघून गेल…..आता काम
चांगलं जमू लागलं होत…..पण काम कधी मिळायच तर
कधी नाही….अशातच एक दिवस एक
व्यक्ति भेटला आणि बोलला इथे काम करण्या पेक्षा मुंबई मध्ये
जा…..खूप चांगला पगार मिळेल आणि काम पण कुठे ना कुठे चालूच
असत……मग मी पण ठरवलं मुंबई ला जायचं…..मुंबई मध्ये एक दूरचे
नातेवाईक रहायचे……त्यांचाकडेच काही दिवस राहायचं नंतर
आपल आपण सोय करून घ्यायची अस मी ठरवून त्याचाकडे गेलो….
मुंबई मध्ये आल्यानंतर आपण किती खुजे आहोत हे लक्षात
आल…..पायात साधी चप्पल…..अंगावर दिवाळीत
घेतलेला शर्ट…..त्यावेळी वर्षातून एकदाच मी कपडे
खरेदी करायचो ते पण दिवाळीला…..तोच शर्ट घालून मी मुंबई
मध्ये आलो होतो……खूप शोधल्या नंतर
मला पत्ता मिळाला……त्यांचं घर खरच खूप सुंदर होत….एकदम
टापटीप……सोफ्यावर बसून मी इकडे तिकडे पाहू
लागलो…..तेवढ्यात पाणी घेऊन एक मुलगी तिथे
आली…..नीलांबरी……हो तीच होती ती…..खूप वर्षानी पाहत
होतो तिला….किती सुंदर दिसत होती….अंगावर
गुलाबी पंजाबी ड्रेस…..लांब सुंदर केस……खूप गोरी….बोलके
डोळे…..आणि सुंदर हसत ती बोलली…,”कसा आहेस…???
ती अजूनही मला ओळखते हेच मला विशेष
वाटलं….एखाद्या मुलीशी बोलणं म्हणजे माझासाठी खूप मोठ
आव्हान वाटायचं….त्यात समोर निलू होती…..मला तर घामच
फुटला……
तिचा ते लक्षात आल……आणि बोलली..,”मुंबई मध्ये नवीन
आलेल्या लोकांना घाम खूप फुटतो….वातावरणच तस आहे…..”
मग मीही अडखळत का होईना…..तिचासी बोलू लागलो…..
दुसर्या दिवशी खूप फिरलो आणि एका जागी काम
मिळालं…..गावी करायचो तसच काम
होत….मी घरी आलो….घरी निलू एकटीच होती…..तिने
मला चहा बनवून दिला….आणि स्वत: एक कप घेऊन समोर
बसली…..चहाचा एक एक घोट घेत ती बोलू लागली……आणि तिने
विचारलं…,”तुझ शिक्षण काय झालय रे…???
तिचा या प्रश्नाने मी गोंधळलो……मी तर फक्त दहावी पास
होतो…..अपूर्ण शिक्षणाची लाजच वाटली…..
क्षणभर थांबून बोललो….,”दहावी……”
तिचा चेहर्यानवर काहीच भाव बदलले
नाही……ती बोलली…,”पुढे का नाही शिकलास…??
मग मी तिला माझी पूर्ण हकीकत
सांगितली……घरची गरीबी….कर्ज….छोट घर…..
तिने माझ पूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतलं
आणि बोलली…,”या जगात जो कारण सांगतो…..तो काहीच करू
शकत नाही…..नुसता रडत बसतो आयुष्यभर……गरीब घरात जन्म
झाला यात नक्कीच तुझा दोष नाही….पण गरीब राहूनच जर
मरनार असशील तर यात फक्त तुझा दोष आहे…..”
मी हसलो आणि बोललो…..,”अग असली मोठ मोठी वाक्य मी पण
खूप ऐकलेत आणि वाचलेत……अशा वाक्यांनी पोट भरत
नाही……त्यासाठी कामच कराव लागत…..”
ती बोलली…..,”ठिकय….मग मला सांग….तू जे काम करतोय त्याने
किती फरक पडणार आहे तुझा आयुष्यात……पुढे जाऊन
तुझा मुलगा पण हेच बोलणार बापाने काही केल नाही…..आयुष्य
फुकट घालवल…..”
तीच हे वाक्य मनाला खूप लागलं….
मी काहीसा रडवल्या सुरात बोललो…..,”अग मग मी काय करू….”
ती बोलली….,”सर्वात आधी तुझ शिक्षण पूर्ण
कर…..बारावी बाहेरून पण देता येते…..काम करत करत
थोडाफार अभ्यास केलास तरी पास होशील आणि जास्त फी पण
नसते……”
तीच बोलणं पटल मला……त्याच वेळी ठरवलं गावी परत यायचं
मिळेल ते काम करत शिक्षण पूर्ण करायच….
मी गावी आलो…..बारावी ला अॅडमिशन घेतलं…..मिळेल ते काम
करू लागलो…..तिचा कडे त्यावेळी मोबाइल नव्हता….घरात एकच
मोबाइल होता…..तीचाशी बोलता याव म्हणून मी मोबाइल
घेतला……आणि एकदा फोन लावला…..तिचा आईने
उचलला…..सर्वांशी बोललो…..शेवटी निलू
शी बोललो आणि तिला सांगितलं की अॅडमिशन घेतलं
बारावी ला…..खूप खुश झाली ती…..नंतर घरात कोणी नसल
की ती मला फोन करायची…..खूप
गप्पा मारायचो आम्ही……तिचा आवाज ऐकल्या शिवाय जेवू
वाटत नव्हतं…..मला ती आवडू लागली होती…..
पण बोलणार
तरी कस…..मी असा मातीसारखा सावळा आणि ती दुधासारखी शुभ्र…..ती शहरात
राहणारी सुंदर फुलाची कळी…..आणि मी गावात
वाढलेला जणूकाही बाभळीचा काटा…….कुठेच आमच जमण्यासारख
नव्हतं….पण मी मना पासून प्रेम करू
लागलो होतो तीचावर…..अशातच मी चांगल्या मार्काने
बारावी पास झालो…..सर्वात आधी तिला फोन केला……ती खूप
खुश झाली…..आणि बोलली……,”पार्टी हवीय….”
मग मी खास तिला पार्टी देण्यासाठी मुंबई ला गेलो…..आमच
बाहेरच भेटायचं ठरलं…..ती आली…..खूप सुंदर दिसत
होती ती…..पार्टी करायची म्हणून मी थोडे जास्तच पैसे घेऊन
गेलो होतो……
ती बोलली….,”मला पाणीपुरी खायची आहे….”
मग आम्ही पाणीपुरी खाल्ली तीस रुपये बिल झाल
फक्त….तिला बोललो….”चल कुठेतरी जेवू…..”
ती बोलली….,”किती पैसे आणलेत….”
मी बोललो….,”आहेत तीन हजार….”
ती बोलले…,”ठिकाय चल मग…..”
ती मला एका कपड्याचा दुकानात घेऊन
गेली…..आणि माझासाठी मस्त तीन शर्ट आणि दोन जीन्स
निवडले……आणि बोलली…,”किती वेड्या सारखा राहतोस…..हे
घालत जा…..मस्त इन्सर्ट करून….मला बाकी काहीच नको….”
मी गावी आलो….माझा राहणी मानात खूप बदल
झाला होता……
मी पुढे सिविल मधेच डिप्लोमा करायचं ठरवलं,,,,,
पण मला माझा मनातील सर्वकाही तिला सांगायचं
होत…..आणि एके दिवशी मी धाडस करायचं ठरवलं…….
आणि फोनवर बोलता बोलता मी बोललो….,”तुला एक
सांगू….राग तर नाही येणार…..”
“नाही रे बोल तू…”ती बोलली….
“मला तू खूप आवडतेस……खूप बर वाटत
तुझाशी बोलून…..”बोलता बोलता माझा ह्रदयाचे ठोके वाढले
होते…..
“हो मला पण तुझाशी बोलायला आवडतच..म्हणून तर बोलते न…..”
ती बोलली….
कदाचित तिला माझ बोलणं कळलं नव्हतं किंवा मुद्दाम न
कळल्या सारखं करत होती….म्हणून मी सरल बोललो…..
“लग्न करणार माझाशी……???
क्षणभर दोन्हीकडे शांतता पसरली…….
माझा ह्रदयाचे ठोके मला ऐकू येत होते…..एवढ्यात तिकडून
आवाज आला…..
“हो……………………………………”
आणि तिने फोन कट केला……
मी अक्षरशा आनंदाने नाचू लागलो…..त्या रात्री एक क्षण
सुद्धा झोप नाही लागली….फक्त उघड्या डोळ्यांनी तीचच
स्वप्न पाहत होतो……
सकाळ झाली…..साधारण अकरा वाजता तिचा फोन
आला…..आम्ही बोलू लागलो…..
तिचा आवाज
थोडासा वेगळा वाटला ती बोलली….,”विंनू…..माझ खरच रे
तुझावर खुप प्रेम आहे….आणि तुझा सोबत आयुष्य जगायला खूप
आवडेल मला…..पण माझ माझा आई बाबांवर पण खूप प्रेम
आहे…त्यांचा शब्दाबाहेर जाणार नाही मी…..मी तुला आज
हो बोलले आणि पुढे जर आपल लग्न नाही होवू शकल तर….???
त्यापेक्षा आपण मित्रच राहू…..आणि मी वाट पाहीन
ज्यावेळी तू स्वत: माझा हात माझा बाबांजवळ मागशील……”
तीच बोलण्यात प्रामाणिक पणा होता….आई
बाबा बद्दलची काळजी आणि प्रेम होत……एकूणच प्रतेक
गोष्टीचा सर्वांगाने विचार
करणारी मुलगी होती ती……मी ठिकाय बोललो आणि फोन
ठेवला……
तिचा होकाराचा चौदा तासा नंतर तिचा हा फोन
आला होता…..ते चौदा तास माझा आयुष्यातील सर्वात सुंदर
क्षण होते…..तेच मी मनात ठेवून तिला मिळवण्याचा निश्चय
केला…….
डिप्लोमा करत नोकरी करू लागलो……आता चांगल्या पदावर
नोकरी मिळाली होती…..पार्ट टाइम मध्ये पॉलिसी काढायच
काम पण मी करू लागलो….बरेच पैसे कमवू
लागलो…..तिला मी रोज माझा हिशोब सांगायचो…थोड थोड
करून पूर्ण कर्ज फेडून टाकलं……गावातील
लोकांना आणि मित्रांना आश्चर्य वाटू
लागलं…..की नक्की करतोय
तरी काय…..इतका कसा सुधारला….एखाद्या भुताने पछाडल
की काय…..पण त्यांना माहीत नव्हतं की मला प्रेम
नावाचा भुताने पछाडलेल…….खूप वेळा कमावरून
घरी आलो की खूप वैताग यायचा…..पॉलिसी काढायच काम
असायचं पण जाऊ वाटत नसायच…..अशावेळी मी डोळे झाकून
तिचा चेहरा डोळ्या समोर आणायचो……तिला मिळवायचच उठून
लगेच कपडे बदलून कामाला लागायचो……दिवसातील वीस वीस
तास काम केल…….
एक दिवस सहज घराकडे पाहिलं आणि मनात विचार आला…..निलू
या छोट्या घरात कशी राहणार……माझा जवळ काही पैसे
शिल्लक होते…..सर्व पैसे गवंडीला दिले….त्याचाकडे आधी काम
केलच होत मी…..त्याला सांगितलं की मला चांगलं घर बांधून
हवय……मग आम्ही आहे ते घर पाडून त्या जागी एक मोठ घर
बांधलं…..बस…..माझा मनासारखं घरट तयार झाल होत………
निलू पण खूप खुश होती…….पण एक दिवस तिने मला सांगितलं
की तिचा घरचे तिचासाठी स्थल बघत आहेत……मी माझा आई
बाबा कडून तिला मागणी घातली……
पण तिचा घरचांनी नकार दिला……का…?? तर त्यांचा नजरेत
अजूनही आम्ही गरीब होतो….खूप प्रयत्न केला….पण त्यांचं मन
काही बदललं नाही……..
आणि मुंबई मधीलच एक
नोकरी करणारा मुलगा त्यांनी तिचासाठी पाहिला……तिचा लग्नाची तारीख
ठरली…..
आणि एक दिवस ती गावी आली……माझा घरी आली…..
आईने चहा दिला तिला…..
मी बाहेर
उभा होतो…..भिंतीला टेकून……ती निघाली आणि बोलली….,”छान
बांधलस घर,,,,”
माझा गळा दाटून आला होता तरी स्वत:ला सावरत
बोललो……,”कुठल आणि कसलं घर,….तुझाशिवाय सर्व
काही अपूर्णच आहे…..फक्त सीमेंट आणि विटाचा भिंती आहेत…..”
“अस नको रे बोलूस….झालच तर मला माफ कर…..मी काहीच करू
शकले नाही…..” तिचा डोळ्याचा कडा ओल्या झाल्या होत्या……
ती जाऊ लागली आणि जाता जाता मागे वळून पहिलं
आणि बोलली….,”विसरणार तर नाही ना रे मला….”
ती रडत रडत निघून गेली……
मी आतल्या खोलीत येऊन खूप रडलो…….
याचवर्षी मे मध्ये तीच लग्न झाल……..
माझ आयुष्य जणूकाही उध्वस्त झाल……..
का आणि कशासाठी जगायच हेच कळलं नाही…..जॉब साठी म्हणून
पुण्यात निघून आलो……
बस आता तिचा आठवणीत जगायच…….
माझे मित्र मला बोलतात की तिने मला फसवल…..पण तिने तर
खूप आधी मला सांगितलं होत….आई बाबांचा शब्दाबाहेर जाणार
नाही म्हणून…..माझा सोबत पळून येऊन आई बाबांची अब्रू
तिला धुळीस मिळवायची नव्हती…….
काहीजण बोलतात तिने माझा सोबत टाइम पास केला….पण
माझासाठी तो बेस्ट टाइम होता…..तिचाशी बोललेला एक एक
शब्द माझासाठी अविस्मरणीय होता……..
तिला वाईट बोलणार प्रतेकजण मला माझा दुश्मन वाटतो……..
ती जर माझा आयुष्यात आली नसती तर मी आजही दहावी पास
आणि सिमेंट मध्ये काम करणारा मजूर असतो……आणि त्याच
छोट्या घरात कर्जबाजारी म्हणून राहिलो असतो…….
माझासाठी खूप काही केल तिने……कसलीच अपेक्षा न ठेवता….
मी सर्व देवांचा मंदिरात जाऊन आलो……प्रतेक मंदिरात जाऊन
हात जोडून
फक्त आणि फक्त तिला मागितल…..पण
एकही देवाला माझी दया नाही आली….
आजही मी मंदिरात
जातो आणि तिचा सुखी जीवनासाठी प्रार्थना करतो…………”
बोलता बोलता त्याचा डोळ्यातून पाणी येऊ लागलं
होत……..नकळत माझे पण डोळे पाणावले होते……
प्रेम यशस्वी नाही झाल म्हणून मुलींना शिव्या घालणारे खूप जन
पहिले होते……पण मनापासून प्रेम
करणारा आणि त्या मुलीचा सुखासाठी प्रार्थना करणारा मुलगा पहिल्यांदा पाहत
होतो…….
…………………………………हासीम…………………………