विभक्ती व त्याचे प्रकार


विभक्ती :
विभक्ती , विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ
प्रथमा
द्वितीया
तृतीया
चतुर्थी
पंचमी
षष्ठी
सप्तमी
संबोधन


महत्वाचे :
1)सप्तमी विभक्तीची प्रत्यये कोणती ?
2)करण म्हणजे काय ?
3) षष्ठी विभक्तीची प्रत्यये कोणती ?
4)गोपीने विभक्ती ओळखा ?
5) पुस्तके विभक्ती ओळखा ?


विभक्ती :
नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात , त्या विकरांना विभक्ती असे म्हणतात . लिंग , वचन , विभक्तीमुळे नामाच्या मूळ रूपात विकार होतात .
नामाचा / सर्वनामाचा क्रियापद किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविण्यासाठी जी गटवार विभागणी केली जाते त्यालाच विभक्ती असे म्हणतात .


विभक्ती , विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ
विभक्ती एकवचन अनेकवचन कारकार्थ
प्रथमा —— —— कर्ता
द्वितीया स , ला , ते स , ला , ना , ते कर्म
तृतीया ने , ए , शी नी ,शी , ई , ही करण ( साधन )
चतुर्थी स , ला , ते स , ला , ना , ते संप्रदान ( दान/भेट )
पंचमी ऊन , हून ऊन , हून अपादान ( दुरावा)
षष्ठी चा , ची , चे चे , ची , च्या संबंध
सप्तमी त , ई , आ त , ई , आ अधिकरण (स्थळ / वेळ )
संबोधन —— नो हाक
अधिक वाचा मराठी नाम व नामाचे प्रकार
प्रथमा
रावण राक्षस होता .
रामरावांनी पाच पोती धान्य पिकविले .
मी चार मैल चालतो .
दूध वीस रुपये लिटर मिळते .
बंटी गाय बांधतो .


द्वितीया
राजाने प्रधानाला बोलावले .
पोलिसाने चोरास पकडले .
मी सहलीला चाललो .
शेतकरी म्हैशीला बांधतो .
राम रावणाला मारतो .
अधिक वाचा 100+ समानार्थी शब्द मराठी

| .
तृतीया
ती तोऱ्याने चालते .
घर पावसाने पडले .
तो कानाने बहिरा आहे .
साखर किलोने मिळते .
ती चार इंचानी कमी भरते .
कुत्रा पायथ्याशी बसला .
काका चार वर्षांनी येतात .
आम्ही शेताच्या कडेने झाडे लावली .
कृष्णाने जरासंधास मारले .
महेश लेखणीने लिहितो .


चतुर्थी
मुलगी लग्नाला आली .
तो बालपणीस आईस मुकला .
तात्याला मोटार आहे .
त्याच्या डोळ्याला धार लागली .
तो रेल्वेस लटकून गेला .
त्याच्या डोक्याला रुमाल आहे .
नदी सागराला भेटते .
मी खेळायला जातो .
दुधासाठी लिटरला दहा रुपये पडतात .
त्याला मुलगा आहे .


पंचमी
पुण्याहून सातारा 110 कि. मी. आहे .
खेड्याहून शहर मोठे असते .
घोड्याहून खेचर दिसायला वेगळे आहे .
साप बिळातून बाहेर गेला .
फक्त त्याच्या हातून हे काम होऊ शकते .
अधिक वाचा 100+ विरुद्धार्थी शब्द मराठी |


षष्ठी
तमाशाला गावच्या गाव लोटला .
मला घोड्याची गाडी आवडते .
तो रामचा भाऊ आहे .
ती लग्नाची मुलगी आहे .
ती काकांची मोटार आहे .
ती मुलाची आई आहे .
ती तांब्याची मूर्ती आहे .
मी रुपयाची भाजी आणली .
बर्फाचे पाणी झाले .
जेवायची खोली बंद आहे .


सप्तमी
दारूपायी त्याने घरदार विकले .
तो गणितात कच्चा आहे .
त्याने वाद्यात ठेका धरला .
त्याची बायको लाखात देखणी आहे .
तो गावी गेला .
मी संध्याकाळी अभ्यास करतो .
माझ्या घरात चार माणसे आहेत .
मी पायी शाळेत जातो .


संबोधन
ज्या नामाने हाक मारली जाते त्याला संबोधन असे म्हणतात . संबोधनाला अनेकवचनात प्रत्यय लागतात . त्याचबरोबर त्यांचा विकारही होतो . सर्वनामांना हाक मारता येत नाही , त्यामुळे त्यांची संबोधन विभक्ती होत नाही .

मुलांनो रांगेत उभे रहा .
रामा , पाणी आण


महत्वाचे :
ज्याही एकवचनी / अनेकवचनी नामाला प्रत्यय नाही त्याची विभक्ती प्रथमा असते .
द्वितीया व चतुर्थी यांचे प्रत्यय सारखेच आहे .
तृतीयेला फक्त अनेकवचनात ई प्रत्यय आहे ; परंतु सप्तमीला मात्र दोन्ही वचनात ई प्रत्यय आहे .
फक्त अनेकवचनात प्रत्यय असणारी विभक्ती संबोधन आहे .


1)सप्तमी विभक्तीची प्रत्यये कोणती ?
Ans. त , ई , आ

2)करण म्हणजे काय ?
Ans. क्रियेचे साधन किंवा वाहन

3) षष्ठी विभक्तीची प्रत्यये कोणती ?
Ans. चा , ची , चे

4)गोपीने विभक्ती ओळखा ?
Ans. तृतीया

5) पुस्तके विभक्ती ओळखा ?
Ans. प्रथमा

Leave a Comment

error: Content is protected !!